फार कमी दिवसांचं सुंदर आयुष्य निसर्गाने प्रत्येकाला दिलंय... याच भान असलं की,
जगण्याची अक्कल माणसाला आपोआप येते.
त्या अकलेत भर घालण्याच काम अनेकजण करत असतात.
शाळेतील पुस्तक फक्त माणसाला साक्षर करतील पण माणसांच्या रूपात मिळालेली पुस्तक कडू गोड अनुभवातून शिकवतच असतात. फेसबुकवर दिसणारी भेटणारी फक्त सुंदर चेहरे दाखवतील पण मनातलं " अबाउट " प्रत्येकाच्या 'प्रोफाइल' वर झळकत नाही.
कितीही व्हाट्सअप चे स्टेटस बदला पण कुठलीही वस्तुस्थिती आणि परिस्थिती 30 सेकंदात दाखवता येत नाही , आणि सुधारताही येत नाही. म्हणून या सुंदर छोट्याशा आयुष्यात जसं आहे तस राहायचे आणि जस आहे तस जगायचं..!
प्रत्येकाच्या वाट्याला जगणं थोडं पण त्या थोड्याश्या जगण्यासाठी प्रत्येकाची धडपड फार मोठी आहे..!
या सगळ्या धडपडीत आपलं कधीच कुणाच्याही मनावर कुठल्याही प्रकारच ओझं नसावं. कारण " मनावर झालेलं ओझं आपल्या प्रति असलेल्या अनेकांच्या मनातल्या आपलेपणा जिवंत ठेवणाऱ्या अनेक गोष्टी संपवत असतात त्यात प्रेम, विश्वास, काळजी, जिव्हाळा या गोष्टी आल्याच.
" जिथं प्रेम नाही तिथं नात कधीच शिल्लक राहत नाही. जिथं विश्वास नाही तिथं कधीच व्यवहार उरत नाही. जिथे काळजी नाही तिथे माणस कधीच जास्त काळ टिकत नाही.
" मग अर्थ उरत नाही या छोट्याशा सुंदर आयुष्यात जे निसर्ग विधात्याने आपल्या विनामूल्य आणि अमूल्य दिलय...!"
माणस जपता आली तर जिवापाड जपा तिथं प्रेम, विश्वास, जिव्हाळा, काळजी पेरा..
नव्याने उगवलेल नातं आभाळाशी स्पर्धा करायला 12 महिने 24 तास उभा असते.
उगाच कुणाचा द्वेष करून कोणी काय कमावलं याचा हिशोब आजवर कुणालाही ठेवता आला नाही.. ठीक आहे त्यांनी / तिने / त्याने ह्या / त्या गोष्टीत विश्वासघात केला म्हणून त्या व्यक्तीचा सदैव आपण फक्त द्वेष करावा हे म्हणजे आपल्या चांगुलपणाचा हा आपणच केलेला अपमान असतो.
सरते हे आयुष्य सतत दुसऱ्याचा द्वेष करत गेले की ते आपलं आयुष्य आपल्यासाठी उरत नाही.
का म्हणून जगावं बरं द्वेष करत कधीही कुणाचा ?
काय मिळालं आणि काय मिळत बरं द्वेष करून.
आपलं आयुष्य ना आपण बँकेसारखं करावं आणि आपण आपल्या आयुष्याच्या ब्रँच मधील असा मॅनेजर व्ह्यायच की आपल्या शाखेत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सुखाच खात आपल्या गोड शब्दांनी उघडता यावं. जो अनोळखी आपल्या संपर्कात येईल त्याला आपल्यात आपुलकीचा सुगधं यावा यासाठी आपण चंदनापरी झिजाव..!
आज ज्यांना आपण आपलं म्हणतो त्यांना देता यावं भरभरून प्रेम..!
त्या प्रेमाची आठवण ते त्यांच्या मनात एक उत्तम उदाहरण म्हणून जिवंत असावं असं प्रेम मग ते सोबत असो की नसो..! कुणाच्या आयुष्यात आपली हक्काची जागा असेल तर ती पक्की करावी तीला कधीच न जावी कुठल्याही अयोग्य गोष्टींची चिड..!
चांगली माणस जास्त आयुष्यात येत नाही, आणि जास्त वेळा चांगली समजलेली माणस नेहमी चांगली असतात अस नाही. म्हणून जी आहे ती चांगलीच आहे असं समजून त्यांच्यासाठी त्यांच्याशी चांगलं राहावं..!
ते स्वार्थी असेल आणि त्यांचा स्वार्थीपणा पूर्ण झाला म्हणून जर ते दूर झाले असेल तर ही आपली चांगली ओळख असते की, आपण अनेकांचे स्वार्थ न सांगता पूर्ण करतो.
आपण ठेवलेला विश्वास जर ती माणस तोडत असतील तर समजायचे की आपली पात्रता उंचीची आहे. त्यांनी आपल्या विश्वासाला तडा दिला तर त्यांनी त्यांची उंची किती खुजी आहे हे सिद्ध केले असते. म्हणून उगाच धोका धोका, स्वार्थी स्वार्थी म्हणून आपण त्यांना मोठं नाही करायचे.
आपण फक्त माफ करायचे आणि सोडून द्यायचे पण स्वीकार करणे म्हणजे स्वाभिमान गहाण ठेवणे असते.
बनयाच तर चांगलं बनयाच.. जगायचं तर आपल्यालाच आपला शेवटी चांगल्या गोष्टींचा अभिमानच वाटेल अस जगायच.
झिजायच तर चंदनापरी झिजायच कारण लोखंड फक्त घाव देतात नाहीतर गंज येऊन तशीच संपतात. सोन चांदी होणे म्हणजे सफल होता येत असे नाही तर कधी कधी ओल्या मातीसारखं सुवासिक होणंही सार्थकी असणं असते.
झळकने म्हणजे प्रत्येक वेळेस प्रसिद्धी नसते तर आपल्या लोकांच्या नजरेत सिद्धता होणे महत्वाची असते.
कोण आपलं कोण कस आणि कोण काय करेल ही वेळ ठरवेल आपण फक्त विश्वास ठेवायचा की आपण चांगलंच आयुष्य जगणार आणि तस चांगलं होण्यासाठी आपला आपल्यावर योग्य विश्वास बसण्यासाठी आपण खूप चांगला होण्याचा प्रयत्न करायचा मग वाईट काळ येवो की वेळ वाईट माणस येऊ की परिस्थिती आपण आपल्या जागेवर योग्य असलं की अयोग्य काही होत नाही हा माझा विश्वास...!
Post a Comment