प्रिय स्न्हेही नेट बंधुनो हार्दिक सुस्वागतंमं...!!.....विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख एक विद्यार्थी प्रिय प्रयोगशील शिक्षक व्यक्तिमत्व आणि मार्गदर्शक यांच्या ह्या अधिकृत संकेत स्थळ (वेबसाईट-पोर्टल) ला भेट दिल्याबद्दल हार्दिक धन्यवाद..

Sunday, September 10, 2017

आजच्या जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या सर्वं मिंत्रानो खूप खूप हार्दीक शुभेच्छा ……!

" Be glad of life because it gives you the chance to love, to work, to play, and to look up at the stars." ...................Henry Van Dyke

आनंदी राहण्यासाठी ……!

आनंद हा मानसिक असतो. तो बाह्य गोष्टीत न शोधता आपल्यामध्ये शोधा…. 
प्रत्येक व्यक्तीची आनंदाची परिभाषा वेगळी असती त्याचा आदर करा……. 
जीवनात येनारया लहान सहान गोष्टीतून  आनंद शोधण्याचा प्रयत्न करा .……
सतत तणावाखाली राहून मानसिक संतुलन ढळू देऊ नका………
 

खेळ , करमणूक, गायन ,छंद ,पर्यटन ,वाचन आणि इतर गोष्टीसाठी थोडा  वेळ द्या ……… 
आपल्या दैनदिन कामाचे गुलाम बनून जीवनातील आनंद उपभोगण्याची इच्छा संपू देऊ नका……… 
आपल्याकडे जे आहे त्यावर संतुष्ट राहा,कारण सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडत नसतात………
आयुष्यात दुख ,त्रास होतच असतो,त्याचं प्रमाण कमी कसे करता येईल ते शोधून पहा आणि आयुष्या कडे सकारत्मक दृष्टीने पहा………
भविष्यात होणार्या बदलाची काळजी करत न बसता तो बदल स्वीकारण्याची तय्यारी करा, भविष्याच्या चिंतेने वर्तमान बिघडू देऊ नका……
 

आपल्या आवडीच्या कामात व्यस्त राहा………
 

आपल्या दुःखाचे भांडवल न करता दुसारच्ये दुख जाणून घेण्याचं प्रयत्न करा. आपोआप तुमचे दुःख कमी होईल……. 
इतरांशी आपली तुलना किंवा बरोबरी करत नशिबाला दोष न देता स्वत:ला भाग्यशाली  समजून जीवनाचा आनंद घ्या……
कुणाकडून फार अपेक्षा ठेऊ नका म्हणजे अपेक्षा भंगाचे दुःख होणार नाही ………
आपल्या चिंता ,आपले दुख आपल्या पुरते ठेवा ,त्याचा बाऊ करा नका……
प्रत्येक गोष्टीत प्रत्येक प्रसंगात प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या ....... 
आपल्यात असलेल्या क्षमता ओळखा . स्वतः वर विश्वास ठेवा……
परिणामाची चिंता न करता जे कराल ते कार्यक्षमतेणे ,मेहनतीने आणि आनंदाने करा…………
ज्या गोष्टी आवडत नाहीत ,त्याकडे दुर्लक्ष करा,इतरांच्या आनंदात आनंदी व्हा............
आपल्या आयुष्यात होणार्या चांगल्या , वाईट घटनांसाठी दुसर्याला जबाबदार धरू नका…......

जीवनात येउन गेलेल्या आंनदी क्षणाचा बायोस्कोप मनात फिरता ठेवा …...........
नातेवाईक आणि मित्रं मंडळी यांच्याबरोबर चे संबंध वाढदिवस ,घरगुती समारंभ अशा कार्यक्रमांतून दृढ ठेवा ………...
आपली नेहमीची दिनचर्या बाजूला ठेऊन कधी कधी नेहमीपेक्षा वेगळे काहीतरी करा
उदास वाटल्यास आपल्या आवडत्या व्यक्तीशी बोल किंवा शांत ठिकाणी किंवा आपल्या आवडत्या ठिकाणी एक फेरी मारून या. संगीत ऐका, वाचन करा……..
नेहमी उत्स्फूर्त आणि टवटवीत राहा,हसत राहा आनंदी राहा आणि आयुष्य जगण्याची मजा लुटा….    
पुन्हा एकदा जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या सर्वं मिंत्रानो खूप खूप हार्दीक शुभेच्छा ……! 

संकलन: प्रा. रफीक शेख सर
SK Life Foundation,Parbhani.
"Embrace the Light Within you "
http://sklifefoundation.blogspot.in/

Saturday, August 5, 2017

आयुष्यात शाश्वत यश काय असते…? हे जाणून घेण्यासाठी विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख सरांचा एक अप्रतिम आणि प्रेरणा देणारा लेख

आयुष्यात शाश्वत यश काय असते…?

हे जाणून घेण्यासाठी विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख सरांचा..
(The Founder of SK Life Foundation)

एक अप्रतिम आणि प्रेरणा देणारा लेख ....!
अवश्य वाचाच आणि आवडल्यास न विसरता आपल्या मित्रांना जशास तसा नक्कीच शेअर करा.

https://www.facebook.com/Shaikh-Rafikh-Sir-778985565562


“ Honesty is the first chapter in the book of wisdom.”
                                                                           ...Thomas Jefferson
प्रयत्नांना मोठे यश …… नक्कीच प्राप्त होते जेव्हा आपले प्रयत्न प्रामाणिक असेल तर…. !!”

" नवे पर्व ,नव्या दिशा ,नवे मार्ग नव्या आशा ……प्रत्येक नवी कल्पना ,प्रत्येक नवीन ध्येय ,प्रत्येक नवे स्वप्न ,मनात येणारा प्रत्येक चांगला विचार या सर्व गोष्टी प्रयत्नांवरच अवलंबून असतात. 


               प्रयत्नच जर प्रामाणिक नसतील तर कुठलीच गोष्ट शक्य नाही सर्वांचे मूळ हे शेवटी प्रयत्नांतच आहे . प्रयत्न म्हणजे नुसते करून पाहिले आणि झाले असे नसून प्रामाणिकता ठेऊन सतत कार्यरत राहणे आवश्यक आहे, तरच जीवनात निश्चीत आणि शाश्वत यशप्राप्ती होते.


       सातत्याने प्रामाणिक प्रयत्न करणे म्हणजे ख-या अर्थाने शाश्वत यशाकडे वाटचाल होय. म्हणूनच आपल्या जीवनात प्रामाणिक प्रयत्नांना मोठे आणि अढळ स्थान आहे.
त्यामुळेच मित्रानो प्रामणिक प्रयत्नांशिवाय या जगात कुठलीही अपेक्षा ठेऊ नका. 


          प्रामाणिक आणि सतत प्रयत्नांने आत्मविश्वास वाढतो हाच आत्मविश्वास आयुष्यात येणा-या अनंतअडचणींना तोंड देण्यास सक्षम करतो आणि ख-या अर्थाने आयुष्याला अर्थ प्राप्त होतो.
 

यश मिळवण्यासाठी नक्की कोणत्या मार्गाने जावे, हे मी सांगु शकणार नाही , कारण यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजुन तयार व्हायचा आहे.. ! 
                  पण स्वतःला ओळखून ,स्वतःला ,स्वतः साठी ,स्वतः कडून नेमके काय हवे; हे शोधणे आणि ते मिळवण्यासाठी सातत्याने प्रामाणिक प्रयत्न करणे म्हणजेच आयुष्यात शाश्वत यश प्राप्त करणे होय.
 

आवडीसोबत आत्मविश्वास आणि ते प्राप्त करण्याची धडपड प्रामाणिक असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाही.
             यशस्वी लोक वेगळ्या गोष्टी करीत नाहीत. आपण करतो त्याच गोष्टी वेगळेपनाणे करतात. ते जे करतात ,ते मनापासून प्रामाणिकता ठेऊन चिकाटीने प्रयत्न करतात म्हणून त्यांना यश प्राप्ती होते.


      आजकाल या जीवघेण्यां स्पर्धेच्या युगात श्वाश घेण्या इतकी जागा नसतांना मित्रानो प्रामाणिक प्रयत्नाशिवाय आयुष्यात निश्चित आणि शाश्वत यश शक्य नाही.


“ The foundation stones for a balanced success are honesty, character, integrity, faith, love and loyalty.”.... Zig Ziglar 

आपलाच एक स्नेहांकित शुभेच्छुक:

विद्यार्थी मित्र प्रा. रफीक शेख सर..🖋
( Educator & Motivator )

SK Life Foundation
Aspire Education Foundation
Dr. A.P.J. Abdul Kalam Vidhyarthi Foundation.

Like My Facebook Page :
https://www.facebook.com/Shaikh-Rafikh-Sir-778985565562164