वाढदिवस 2021 : शुभेच्छा
माझं आयुष्य आणि भविष्य उज्वल असण्याचं सामर्थ्य मला आपल्या सारख्या अनेक जीवलग,सन्माननीय,आदरणीय ,गुरुतुल्य,स्नेही विद्यार्थी, पालक आणि पवित्र हृदयी लोकांमुळेच मिळते आहे..!
काल माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्वांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष दिलेल्या प्रेम:पुर्वक शुभेच्छा आणि सदिच्छा ह्या मला जगण्याला बळ देणाऱ्या आणि सामाजिक बांधिलकी जपत शैक्षणिक-सामाजिक सेवा कार्यात सदैव मार्गदर्शक आहेत...
शुभेच्छांच्या अक्षरशः पाऊसाने मन अगदी भारावुन गेलं, नि:स्वार्थ निरपेक्ष आणि प्रामाणिक कार्याची आपण सर्वांनी घेतलेली दखल आणि व्यक्त केलेला स्नेह हा अवर्णनीय आहे..
असंच प्रेम कायम असू द्या... कुठं चुकत असेल तर त्याची कल्पना नक्कीच द्या... आपणं सर्व आहात म्हणून आयुष्य आनंदी व समाधानी आहे... ही केवळ औपचारिकता नाही तर ह्रदयातून आलेली भावना ह्रदया पर्यत पोहचावी हीच इच्छा...
हार्दिक धन्यवाद..!🙏🏻
लॉकडाऊन काळातील मुक्त शिक्षण: एक शैक्षणिक प्रयोग
डॉ. ए.पी. जे.अब्दुल कलाम फाउंडेशन विद्यार्थी मित्र परिवाराने शाळा बंद असल्याने गेल्या दोन आठवड्यापासून इय्यता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी किमान 20 विद्यार्थ्यांसह दोन बॅचेस करत अगदी मोफ़त सर्व विषयांच्या पूर्वतयारीसाठी Doubt Sessions च्या माध्यमातून त्यांच्या अभ्यास पद्धती,कोरोनोत्तर काळातील त्यांच्या शैक्षणिक समस्या या संदर्भात एक मुक्त शैक्षणिक प्रयोग हाती घेतला आहे..
ह्या माध्यमातून त्यांच्यातील असलेल्या आरोग्याविषयी भावनिक सुरक्षितता , ऑनलाइन शिक्षणाचा यश-अपयश ,वेळ परिस्थितीप्रमाणे अभ्यास अनुकूलता साधताना गुणवत्तापूर्ण शैक्षणिक यश संपादन कसं करावं ह्या संदर्भात मुक्त चर्चेतुन त्यांचा आत्मविश्वास वाढीस निश्चितपणे मदत करण्याचा एक प्रामाणिक तळमळ आहे..
स्नेही पालक आणि प्रिय विद्यार्थी मित्रांनो आपण देतं असलेल्या सकारात्मक प्रतिसादास हार्दिक आभार..
Post a Comment