प्रिय स्न्हेही नेट बंधुनो हार्दिक सुस्वागतंमं...!!.....विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख एक विद्यार्थी प्रिय प्रयोगशील शिक्षक व्यक्तिमत्व आणि मार्गदर्शक यांच्या ह्या अधिकृत संकेत स्थळ (वेबसाईट-पोर्टल) ला भेट दिल्याबद्दल हार्दिक धन्यवाद..

Saturday, May 8, 2021

राज्यातील इ.१० वीच्या विद्यार्थ्यांना इ.११ वी प्रवेशासाठी CET घेण्याबाबत सर्वेक्षण

कोरोना प्रादुर्भावामुळे इयत्ता १० वी च्या परीक्षा रद्द करण्यात आलेल्या आहेत, इयत्ता ११ वी च्या वर्गात  प्रवेशासाठी गुण देण्यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत एक स्वतंत्र CET (common Entrance Test) परीक्षा घ्यावी काय?

     सदरची CET  परीक्षा राज्यातील सर्व इच्छुक इयत्ता १० वी चे विद्यार्थी देऊ शकतील. सदरच्या CET परीक्षेचे स्वरूप हे साधारणत: OMR पद्धतीनुसार असावी, सर्व विषयांचा मिळून एकत्रित एक पेपर असावा,सदरच्या पेपर साठी सुमारे २ तासांचा वेळ देण्यात येईल. 

सदरची परीक्षा साधारणत: जुलै महिन्यामध्ये किंवा कोरोना चा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर प्रत्येक शाळेच्या ठिकाणी घेण्यात यावी असे विचारात आहे. कोरोना विषयक सुरक्षेचे सर्व नियमांचे पालन करून या परीक्षेच्या गुणांच्या आधारावर इच्छुक विद्यार्थ्यांना गुणात्मक तत्वावर  ११ वी मध्ये प्रवेश देता येईल. राज्यातील सर्व ११ वी ला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वसाधारणपणे १०० गुणांची ऑफलाईन (प्रत्यक्ष ) प्रवेश चाचणी घेणे प्रस्तावित आहे. 
 
     तरी सर्व बोर्डाच्या  विद्यार्थ्यांनी सदरच्या सर्वे लिंक मध्ये आपले स्पष्ट मत नोंदणी करावी.

सदर लिंक ही दि. ०९ मे २०२१ रोजी बंद होईल.

https://www.research.net/r/11thCETTEST

शालेय शिक्षण विभाग
मुंबई

Friday, May 7, 2021

🎓 कोरोना काळातील शिक्षणाचं मूल्यांकन-एक विचित्र पेच..?🤔

कोरोनाच्या संसर्गामुळे उद्योगधंदे आणि अर्थव्यवस्थेचे प्रचंड नुकसान झाले आहेत मात्र त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे अतोनात हाल  झाले आहेत..या महामारीने जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रावर विपरीत दुरागामी परिणाम केले आहे, ह्याची भविष्यकालीन दाहकता न विचार केलेली बरी...!😢

यंदा पहिलीत असलेले विद्यार्थी तर शाळेत गेलेच नाहीत आणि शिक्षकांना थेट न भेटताच दुसऱ्या इयत्तेत गेले आहेत..!😱

पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेताना मोठ्या त्रासाला तोंड द्यावे लागले आहे, गणितासारख्या विषयातील संकल्पना ऑनलाइन समजून घेताना त्यांना त्रास झाला आहे व त्यामुळे या विषयात ते भविष्यात मागे पडण्याची भीती शिक्षण प्रेमी  व्यक्त करीत आहेत...🥴

दहावी व बारावीच्या परीक्षा केंद्रीय बोर्डाने (CBSE) रद्द केल्या आहेत व आता महाराष्ट्रातही दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे ...

परीक्षा होणार अथवा नाही ह्या संदर्भात संदिग्धता असल्याने विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासा विषयी प्रचंड गोंधळाची स्थिती होती..

त्याहीपेक्षा विचित्र अवस्था सरसकट परीक्षा न देता सगळयांना पास धोरणामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या गुणवान आणि  गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांनावर होणार आहे..

सगळयांनाच पास करतांना त्यांच्या अंतर्गत मूल्यांकनांचा निकष लावताना शाळेची मनमानी विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी ठरेल, शिक्षण मंडळाने त्यांच्या योग्य मूल्यांकनासंदर्भात सर्वांना समान न्याय मिळेल असे धोरण निश्चित करूनच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याचा मार्ग सुकर करावा..

केंद्रीय परीक्षा मंडळाने 'सातत्य पूर्ण अंतर्गत मूल्यमापनाच्या ' आधारे विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेतला आहे,त्यांची व्याप्ती, स्वरूप ,मूल्यांकन पद्धत भिन्न असली तरी, राज्य-परीक्षा मंडळाने सर्वच पर्यायाचा खुला वापर करीत विद्यार्थ्यांच्या माथी 'कोविड बॅच चा' विद्यार्थी असा नकारत्मक शिक्का भविष्यात बसणार  नाही ह्याचा पुनर्विचार करणे गरजेचं आहे..😊

बारावीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास किती करावा तो कधी पूर्ण करावा व सराव कधी करावा याबद्दलही त्यांच्या मनात संभ्रम अवस्था आहे...

पदवी मिळवूनही कोरोना काळातील परीक्षा ऑनलाइन देऊन पास झालेला उमेदवार म्हणून भविष्यात नोकरी मिळवण्यात अडचणी येण्याची भीती या विद्यार्थ्यांना आहेत..

वर्षभरात झालेले नुकसान प्रचंड मोठे असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसाना बरोबरच त्यांचे मोठे मानसिक नुकसान झाले आहे..

कोरोनाच्या संसर्गाचा वाढता धोका पाहता यंदाचे सलग दुसरे शैक्षणिक वर्ष कसे सुरु होईल व ते कसे पुढे सरकेल याबद्दल अद्यापही अनिश्चितता कायम असताना येणाऱ्या काळात सातत्यपूर्ण अंतर्गत मूल्यमापन, स्वयं-अध्ययनाला प्रोत्साहन, शैक्षणिक लवचिकता, स्वायत्तता, मेंटार पद्धत,मुक्त-शिक्षण प्रणालीचा स्वीकार,ऑनलाइन आणि दूरस्थ शिक्षण, Open Schooling,  ई. आदी पर्यायांचा अग्रक्रमाने विचार करणे गरजेचे राहील असं मला वाटतं..

धन्यवाद..🙏🏻🙏🏻

🙏🏻 एक शिक्षण प्रेमी..
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख,
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.

https://www.vidhyarthimitra.com/?m=1

🙏🏻🎓🙏🏻🎓🙏🏻🎓🙏🏻🎓

😡 दहावीच्या परीक्षा रद्द..!


एक सुसंवाद- दहावीच्या विद्यार्थ्यांशी  परीक्षा रद्द झाल्याचा पार्श्वभूमीवर...


🎓 प्रिय विद्यार्थी मित्रांनो,

अनपेक्षितपणे यंदा राज्य सरकारने ईतर राज्याच्या अपेक्षित निकालाप्रमाणे आपली ही दहावीची  परीक्षा रद्द करून अनेक विद्यार्थ्यांच्या भावी भविष्यावर एक घातच केला आहे...

ह्या निर्णयाने मात्र गुणवान आणि गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांवर एक अन्यायचं होणार आहे..

सर्वसामान्यपणे सर्वांना पास निकष लावताना त्यांच योग्य मूल्यांकन होईलचं असं ही नाही.

वर्षंभर ह्या महामारीत प्रचंड दबावात ,अनिश्चिततेच्या सावटात,शाळा किंवा क्लासेस नियमितपणे नसतांनाही आपण सर्वांनी जे काही प्रयत्नपूर्वक चांगला अभ्यास केला त्याला अगदी मनापासून सलाम...

आपण ह्या विपरीत परिस्थितीत जो काही संघर्ष केला तो कुठंही वाया जाणार नाही, गरज आहे ते अर्जित केलेलं ज्ञान आपल्या आयुष्यात योग्य ते परीने त्याचा सुयोग्य वापर करून आपलं भावी भविष्य उज्ज्वल करा..🌹

दहावीची ही एक नाममात्र परीक्षा आपलं आयुष्य निश्चित करणार नाही, आयुष्याच्या जिवन-प्रवासांत आपणांस अश्या अनेक परीक्षाना तोंड द्यावं लागणार आहे हे विसरून कसं चालणार विद्यार्थी मित्रांनो...

आयुष्यात आपल्या प्रामाणिक आणि जिवापाड अथक प्रयत्नांना यशाचा सुंगध येण्यासाठी नव- नविन जीवन कौशल्य आत्मसात करण्यासाठी आपली धडपड नेहमीच कौतुकास्पद असेल ह्यात शंका नाही..

कोणत्याही प्रकारची परीक्षा आपली अंतिम गुणवत्ता सिद्ध करू शकणार नाही ,दहावी तर ट्रेलर आहे खऱ्या जीवनाचं पिक्चर अभी बाकी हैं..

आपणा सर्वांना पुढील  भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा आणि सदिच्छा..🌹

🙏🏻 आपलाच स्नेहाकिंत शुभेच्छुक:
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख,
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
https://www.vidhyarthimitra.com/?m=1

🙏🏻🎓🙏🏻🎓🙏🏻🎓🙏🏻🎓

"पुस्तके ही काळाच्या विशाल सागरातून आपणास घेऊन जाणारी जहाजे होत."


🌹 “पुस्तकांच्या सहवासात शांत आयुष्य वेचण्यासारखा दुसरा आनंद नाही.”_📚

📚 डोळ्यांनी दिसतं आहे तो पर्यत वाचत राहायचं,जे वाक्य समजलं नाही तो परत वाचायचं,वाचलेलं अक्षरशः जगायचं,पुस्तकातील पात्राला स्वतःशीच रिलेट करायचं, जणू तो पात्र आपणच आहोत,पुस्तकातील सुखा दुःखाच्या प्रसंगात आपण सुद्धा सहभागी व्हायचं.

पुस्तक वाचणे म्हणजे एका भन्नाट अफलातून प्रवासाला जाणे होय त्यामुळे आपण ज्याप्रकारे एखाद्या प्रवासात इतर ठिकाणाचा अनुभव घेतो तसंच अनुभव पुस्तकात घेत राहायचं.


ज्याकाळातील आपण पुस्तक वाचतोय मनाने त्या काळात जाऊन यायचं जणू आपण त्याकाळात वावरतोय अशी भावना मनात आणायची.आपल्या कल्पनेने पुस्तकातील तो विश्व आपल्या आजूबाजूला निर्माण करायचं,पुस्तक वाचत असताना पूर्णपणे त्यामध्ये हरवून जायचं,आजूबाजूचं भान विसरून वाचत राहायचं.वाचताना कोणताही पूर्वग्रह मनात ठेवायचं नाही त्या पुस्तकातून जास्तीत जास्त चांगलं काय घेता येईल हे बघायचं.

वाचन झाल्यानंतर त्यावर विचार करायचं, आपण वाचलेलं इतरांना सांगायचं,समाजाशी रिलेट करायचं आणि वाचलेलं,समजलेलं ते ते समाजात शोधायचं प्रयत्न करायचं.

"पुस्तके ही काळाच्या विशाल सागरातून आपणास घेऊन जाणारी जहाजे होत."

याप्रकारे वाचन मी करत असतो तुम्ही सुद्धा एकदा करून बघा वाचनाचा जबरदस्त आनंद येईल...

#वाचत_रहा...
#काळजी_घ्या ...
#सुरक्षित रहा...


📚 एक पुस्तक प्रेमी आणि वाचक
#विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
https://www.vidhyarthimitra.com/?m=1

🙏🏻📚🙏🏻📚🙏🏻📚🙏🏻📚🙏🏻

Friday, January 3, 2020

आनंदोत्सव : शिरपेचात मानाचा एक नवीन तुरा...!


"मेरा वजूद नहीं किसी तलवार
और तख़्त ओ ताज का मोहताज,
में अपने हुनर और होंठो की हंसी
से लोगो के दिल पे राज करता हुं..!"

🎓 प्रिय स्नेही नेट बंधुनो,

आयुष्यात 'धन' आणि 'ऋण' या चीन्हांशी गट्टी जमवत तडजोडीची आकडेमोड करून आयुष्याचं गणित मांडताना 'ध्यास' जडला तो माणसं जोडण्याचा ..!या वेड्या ध्यासां मुळे अनेक स्नेही मित्र, विद्यार्थी मित्र, स्नेही पालक, प्रतिस्पर्धी , सहकारी तसेच जिवलग मित्र या सर्वांचा विविध माध्यमांद्वारे स्नेह मेळावा रंगत रंगत त्यातून आपुलकी ,स्नेह , विचारांची देवाण-घेवाण आणि व्यासायिक उपक्रम आदान प्रदान च्या Exchange मुळे आज मी स्वत:ला खूप भाग्यवान तसेच सर्वोत्तम मित्र संपती असल्याचा अभिमान बाळगतो.        मी प्रा. रफीक शेख (परभणी),SK Coaching Classes, SK Life Foundation , Dr.A. P.J.Abdul Kalam Vidhyarthi Foundation आणि Aspire Education Foundation च्या माध्यमातुन माझ्या अवती -भोवती ,प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ,ओळखी-अनोळखी व्यक्तींच्या सहवासातून इंटरनेट जनसंपर्क च्या सर्वच प्रकारच्या Social Media च्या माध्यमातून सदैव चांगल्या गोष्टी शेअर करून प्रेरणा देण्याचे कार्य नि:स्वार्थ पणे करतो.

"प्रामाणिक प्रयत्न आणि आपल्या कार्यावर नितांत प्रेम आणि त्यातून मिळणारा समाधानाचा आनंदाच्या स्वरूपात आयुष्यात दरदिवशी मिळणारा खरा पुरस्कार होय.."       आजपर्यँत गेल्या दोन दशकांच्या सामजिक तसेच शैक्षणिक व्यवसायिक प्रवासांत वेगवेगळ्या संस्थांनी, व्यासपीठांनी आणि व्यक्तिंनी माझ्या शैक्षणिक -सामाजिक कार्याची सदैव दखल घेऊन गौरव आणि सन्मान केला आहे.

नुकताच ( दिनांक 25 डिसेंबर 2019 रोजी) महात्मा ज्योतीराव फुले शिक्षण परिषद या सामाजिक संस्थेने 'जिल्हा स्तरीय आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार' हा सन्मान वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू माननीय श्री. अशोक ढवण सरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले आहे व माझ्या पुरस्कारचा शतक महोत्सव आपल्या सर्वांच्या प्रेम- आशीर्वादाने आणि स्नेहांन पूर्ण झालं.

त्याबद्दल मी सर्वं स्नेही विद्यार्थी , सन्माननीय पालक तसेच आदरणीय प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष माझे शिक्षक बंधू आणि माझें आई-वडील व सदैव माझ्या पाठीशी खंबीर पणे राहणारी माझी अर्धांगिनी यांचा ऋण निर्देश व्यक्त करीत आपणं सर्वांना समर्पित करतो.

दिवसेंदिवस मिळणारा आपला सकारत्मक प्रतिसाद आणि प्रोत्साहन तसेच शुभेछ्या वेळोवेळी माझ्या उत्साहात आणि कार्यात नक्कीच दीप स्तंभा सारखे दिशा दर्शक आणि मार्गदर्शक ठरेल यांची आशा बाळगतो.


💖 आपलाच स्नेहाकिंत आभारी:

🔰 विद्यार्थी मित्र प्रा. रफीक शेख,परभणी.

🎓 _(Educator & Motivator)_

"Stay Hungry & Stay Foolish."

🎓 *डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन.*

_"Nurturing Potential Through Education"

_The educational revolution movement Initiatives By SK Rafikh Sir...

🔰 *A Foundation For Education , Knowledge and Development*✍🏻

📡 *अधिक माहितीसाठी खालील संकेत स्थळ ला एकदा अवश्य भेट द्या:*

👍🏻 *Like My Facebook Page:*https://www.facebook.com/VidhyarthimitraShaikhRafikhSir

Monday, April 1, 2019

दहावी , बारावी परीक्षा संपल्या..!! सुट्यात काय काय करणार आणि कसं..?

दहावी , बारावी परीक्षा संपल्या..!! सुट्यात काय काय करणार आणि कसं..?

*दहावी,बारावी परीक्षा संपल्या..!! सुट्यात काय काय करणार आणि कसं..?*

*विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाच्या बोर्ड परीक्षा संपल्यानंतर निकाल येईपर्यंत उन्हाळी सुट्यांच आपल्या भावी करिअरच्या दृष्टीने अतिशय विचारपुर्वक योग्य मार्गदर्शकांच्या मदतीने आणि मार्गदर्शनातूच योग्य निर्णय योग्य वेळी घेऊन ह्या सुट्यांचा सदुपयोग करण्याचा प्रयत्न नक्कीच करा मित्रांनो आणि आपलं भवितव्य उज्ज्वल करा.*

*खालील सूचित केलेल्या काही गोष्टी पालकांनी, शिक्षकांनी तसेंच मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांना नक्कीच सुचवा त्यांना करायला आवडेल ही खात्री बाळगतो.*

🖥 *1) संगणक शिक्षण :*

संगणकाचे ज्ञान असणे ही काळाची गरज बनली आहे..!
२१ वे शतक हे तंत्रज्ञानाचे शतक मानले गेले आहे..! 
संगणक ही तंत्रज्ञानाचा एक अविष्कार आहे..!

आज प्रत्येक क्षेत्रात संगणकाचा मुक्त वापर होतांना दिसतो..! 
संगणकाच्या वापरामुळे अनेक अवघड आणि वेळखाऊ कामे सुलभ झाली आहेत..!

आपल्या दैनदिन व्यवहारात,रेल्वे बस आरक्षण, हॉस्पिटल, शाळा, बँका, हॉटेल्स, व्यापारी प्रतिष्ठाने, कारखाने, सेवा क्षेत्र, कृषी क्षेत्र, रुग्णालये, सरकारी-खाजगी कार्यालये सगळीकडे संगणकाचा वापर केला जातो. बऱ्याचदा आपल्याला हवी असलेली माहिती व कागदपत्रे संबधित कार्यालयात व्यक्तीशः न जाता इंटरनेटच्या माध्यमातून संगणकावर सहज उपलब्ध होतात. परीक्षेचे व नोकरीचे अर्ज भरण्यापासून त्याच्या निकालापर्यंत सर्व गोष्टी इंटरनेटवर उपलब्ध होत असतात. 

              याकरिता संगणकाचे शिक्षण घेणे अतिशय महत्वाचे आहे. पूर्वी ज्याला अक्षर कळत नसे त्यालाच निरक्षर म्हटले जाई, आता मात्र ज्याला संगणक वापरता येत नाही त्यालाही निरक्षरच मानले जाते, इतका संगणकाचा प्रभाव वाढला आहे. संगणकाचे शिक्षण घेऊन त्याचा व्यवसाय वा नोकरी म्हणून निवड केलेले कित्येक लोक कमालीचे यशस्वी झालेले आढळतात. अनेकांनी देश-विदेशात ‘तगड्या’ पगाराच्या नोकऱ्यादेखील मिळविल्या आहेत. म्हणूनच संगणकाचे ज्ञान असणे ही काळाची गरज बनली आहे.

     आजच्या काळात संगणकीय शिक्षण तेही व्यावसाईक पातळीवर विद्यार्थ्यांनी आत्मसात करून वेळीच तंत्रकौशल्य हस्तगत करून पुढील करीअर साठी खूपच उपयुक्त आहे.

आज संगणकाविना कुणाचेही पान हलत नाही. सध्याच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या काळात सर्वच क्षेत्रात संगणकाचा वापर सुरु झाला आहे . संगणकाबरोबरच नवीन प्रगत तंत्रज्ञानाची माहिती.

राष्ट्रीय पातळीवरील केंद्र सरकारच्या NIELT या संस्थेने विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असा दर्जेदार प्रमाणपत्र अभ्यासक्रम CCC तयार केला आहे तो ईतर कोर्सेस पेक्षा राष्ट्रीय स्तरांवर एकमेव कोर्स आहे तो 2-3 महिन्यात पूर्ण करता येऊ शकतो.

MKCL चा *MS-CIT* कोर्स ही राज्यातील सर्वच प्रकाराच्या स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त कोर्स तो अगदी 2 महिन्यात आपल्या गतीप्रमाणे पूर्ण करता येऊ शकतो.

🎓 *2) इंग्रजी भाषेवर प्रभुत्व प्राप्त करणे :*

जागतिक ज्ञान तसेच Internet वर अधिकृत प्रमाण भाषा स्वीकारताना आपल्या व्यावसाईक तसेच सामजिक जीवनात इंग्रजी भाषा हे प्रतिष्ठेचं मानबिंदू मानला जातो, यासाठी या सुट्यांत आपल्या आर्थिक स्थिती नुसार *English Spoken* क्लासेस Join करणे किंवा घरीच *YouTube* च्या मदतीने अभ्यास करून आपण आपल्या सुट्यांचा योग्य सदुपयोग करू शकतो.

🔰 *3) Foundation Batches करणे :*

दहावीच्या विद्यार्थ्यांनी या सुट्यात वैद्यकीय क्षेत्रातील करिअर साठी NEET Foundation ची पूर्वतयारी करून घेणारे क्लासेस Join करणे.

ज्या विद्यार्थ्यांना Engineering क्षेत्रात करिअर करायचंय असेल तर त्यांनी हमखास IIT-JEE Foundation क्लासेस Join करताना Mathematics, Physics व Chemistry कडे विशेष लक्ष देणे.

✔ *बारावी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे करिअर जर स्पर्धा परीक्षा निश्चित असेल तर त्यांनी Internet च्या माध्यमातून वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची माहिती घेऊन अभ्यासक्रमाच्या Print out काढावी व उपयुक्त संदर्भ ग्रंथाचे आणि काही पायाभूत संकल्पनांची योग्य तयारी करून पुढील कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी सुसज्ज होणे.*

शक्य झाल्यास क्लासेसही Join करू शकता.

📚 *4) जास्तीत जास्त पुस्तके वाचणे*

शालेय तसेच कनिष्ठ महाविद्यालय परीक्षा संपल्यानंतर आपल्या सुट्यांचा सदुपयोग करणाऱ्या महत्त्वपूर्ण गोष्टीत जास्तीत जास्त पुस्तक वाचणे यांस अग्रक्रम देणें.

😊 *पुस्तकासारखा दुसरा अन्य कोणताच श्रेष्ठ मित्र नाही*✔

पुस्तक वाचनातून आपलं मस्तक सुधारतं आणि तेंच मस्तक कोणापुढेही नतमस्तक होत नाही मित्रांनो,म्हणून जास्तीत प्रेरणा दाई पुस्तके वाचा आणि आपल्या *मन व मस्तिष्कला योग्य दिशा द्या आणि आयुष्यात उज्ज्वल यश संपादन करा.*

*मार्गदर्शक , पालक , शिक्षक, काही यशस्वी विद्यार्थ्यांनी,समाजातील काही थोर माणसांनी विद्यार्थ्यांना काही पुस्तके सुचवली आहे ती अगदी सर्वत्र विनामूल्य ई-बुक pdf स्वरूपात ईथे आम्ही देण्याचा प्रयत्न करीत आहे,कृपया याचा आपण सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा ही नम्र विनंती.*

👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

Click here to download Free E-Books For Students..📰 *5) नियमितपणे वर्तमानपत्र वाचणे:*

आजच्या काळात आपल्या अवती भवती घडणाऱ्या सर्वच प्रकारच्या घटनांचा आपणास वेध घेता येणं आवश्यक आहे मित्रांनो,म्हणून आपल्या घरी येणाऱ्या काही दर्जेदार वर्तमानपत्रात *दैनिक लोकसत्ता,* The Hindu,सकाळ, पुढारी, दैनिक लोकमत, पुण्यनगरी , *The Times of India* ई. आदी वर्तमानपत्रातील संपादकीय लेख अवश्य वाचा.

*शक्य असल्यास काही मासिकेही वाचा.*

🏖 *5) पर्यटन स्थळाला भेट देणें:*

निसर्गाच्या सहवासात आनंदाचे क्षण घालविण्याची आणि नवनवीन कला, संस्कृतीविषयी जाणून घेण्याची माणसाची मुलभूत प्रवृत्ती पर्यटनाचा मूळ आधार आहे. धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटनाला तेवढेच महत्व आहे. आज वेगवान दळणवळणाच्या साधनाने जग जवळ आले असताना देशाबरोबरच बाहेरचे जग जाणून घेण्याच्या माणसाच्या ओढीने हे आपण प्रेक्षणीय स्थळे अवश्य पाहावीत
सुट्यात विशेष बाब म्हणजे हवा पालटासाठी एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी, ऐतिहासिक स्थळांना ग्रुप करून भेट देणे आणि आयुष्याच्या जीवनप्रवासाचा आनंद घेण्यासाठी सक्षम बनणे.

💪🏻 *6) व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रयत्न करणे:*

कौटुंबिक -सामाजिक मूल्य , समाज -संस्कृती यांचं देहभान ठेऊनच विद्यार्थ्यांची देहबोली , आचरण ,विचरणं , वेशभूषा , attitude ई. महत्त्वपूर्ण घटक विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासात भर टाकतात , आपण सर्वांनी याचा विचार अवश्य करावा.

*7) छंद जोपासणे*
*8) आवडता खेळ सवडीने खेळणे*
*9) आणि 10)* ई. आदी योग्य आणि सकारात्मक बाबी.

_आजच्या या स्मार्ट काळात प्रत्येक जण सुज्ञ आहे ,आपल्या निर्णय क्षमतेच्या कुंवती प्रमाणे काळानुसार योग्य पाऊले उचलण्यास सक्षम आहे, आपणास वर दिलेल्या बाबी ह्या सर्वांना अपेक्षित लागू होतीलच याची शास्वती कोणी देऊ शकणार नाही मित्रानो परन्तु याहीपेक्षा अजून बऱ्याच चांगल्या गोष्टी आपण करू शकता याचा मला पूर्ण विश्वास आहे, तरी आपल्या या सुट्यांचा आपण आपल्या भावी करिअरच्या दृष्टीने निश्चितच सदुपयोग कराल अशा शुभेच्छसह अनेक आशिर्वाद आपणांस._

😊 *आपल्या भावी उज्ज्वल करिअर साठी हार्दिक शुभेच्छा आणि सदिच्छा..*

🙏🏻 *आपलाच स्नेहाकिंत शुभेच्छुक :*🙏🏻

🎓 *विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख ,परभणी.*
🔰 *Mentor | Educator | Motivator | Guide*
"Stay Hungry and Stay Foolish."
🎓 *डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन.*
_"Nurturing Potential Through Education"_
🔰 *A Foundation For Education , Knowledge and Development*✍🏻

📡 *अधिक माहितीसाठी खालील संकेत स्थळ ला एकदा अवश्य भेट द्या:*

https://www.facebook.com/VidhyarthimitraShaikhRafikhSir


🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻Tuesday, January 9, 2018

करिअर कट्टा: करिअर मार्गदर्शन समुपदेशन लेखमालिका
करिअर कट्टा: करिअर मार्गदर्शन समुपदेशन लेखमालिका

प्रिय विद्यार्थी मित्रांनो;
विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख सर लेखन-संपादित करिअर लेखमाला आपल्या सर्वांच्या सेवेत:
भारतात दर तासाला किमान एक विद्यार्थी आत्महत्या करतो . . . दर वर्षी हि संख्या हजारोंच्या घरात असते . . . ६० टक्के इंजिनिअर्स हे बेरोजगार आहेत . . . तर त्यातील केवळ ७ टक्के ग्रॅज्युएट्सकडे नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक स्किल्स असतात. या सगळ्यामागचं महत्वाचं कारण म्हणजे चुकीच्या करिअर ऑप्शनची केलेली निवड !

आज बदलत्या टेक्नॉलॉजीमुळे करिअर्सच्या उत्तम संधी असतानादेखील, विद्यार्थी आणि त्यांचे पालक, हे करिअरचा पर्याय निवडताना अनेक चुकीच्या मापदंडाचा वापर करत “एखादं” करिअर निवडतात आणि मग विद्यार्थ्यांची शिक्षण पूर्ण करण्यापासून नोकरी मिळवण्यापर्यंत सगळीकडे घुसमट होते.

योग्य करिअर नेमकं निवडायचं कसं, या लाखो विदयार्थी आणि त्यांच्या पालकांच्या मनातील प्रश्नाला योग्य मार्गदर्शन मिळावं यासाठी हा ऑनलाईन करिअर कट्टा लेखमाला आणि समुपदेशन सुरु केला आहे. करिअर निवडताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत आणि विविध पर्यायांचा विचार कशा प्रकारे केला पाहिजे यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तर तुम्हाला या व्यासपिठावर मिळतील.

करिअर कट्टा हा विद्यार्थी आणि पालक करिअरची निवड करताना दोघानांही एकमेकांशी योग्यरीत्या सुसंवाद करण्याचे उत्तम कार्य करेल यात शंकाच नाही...!

विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन आणि समुपदेशन लेखमाला तसेच समुपदेशन ..

🎓 करिअर म्हणजे काय..?
🎓 करिअर चे महत्व काय..?
🎓 करिअर कसे निवडावं..?
🎓 आपण करिअर निवडतांना काय विचार करतो..?
🎓 करिअर बाबत स्वतःला व इतरांना काय विचारावे.?
🎓 स्वतःला कसे ओळखावे.?
🎓 करिअर कसं घडवावं..?
🎓 शिक्षण कसे घ्यावे..?
🎓 अभ्यास होत नाही..?
🎓 आयुष्याची दिशा सापडत नाही..?
🎓 आपल्या पालकांना आपलं 
🎓 करिअर कसं समजुन सांगावं..?
🎓 करिअर चे मार्गदर्शन कसे घ्यावे..?
🎓 आयुष्यात यश कसं प्राप्त करावे..?

ह्या आणि अशा साऱ्या प्रश्नांवर 🤔

आपल्याला एकच उत्तर ...!
या आणि सहभागी व्हा..!

करिअर मार्गदर्शन समुपदेशन लेखमालिकेत ..

करिअर लेख-चर्चा संवाद आणि निर्णय या सर्व अपडेट्स साठी Like आणि Share करा


https://www.facebook.com/करिअर-कट्टा-156295545093381


Thursday, September 14, 2017

ईयत्ता दहावी च्या विद्यार्थ्यासाठी प्रथम सत्र परीक्षेच्या पुर्व तयारी साठी विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख सर संपादित विशेष मार्गदर्शिका-2017


दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत करिअर समुपदेशन आणि मार्गदर्शन मेळावा दहावी साठी मोफत करिअर मार्गदर्शन मेळावा

“The opportunity to explore and choose the right career path for you”

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत करिअर समुपदेशन आणि मार्गदर्शन मेळावा दहावी साठी मोफत करिअर मार्गदर्शन मेळावा
“The opportunity to explore and choose the right career path for you”


एसके कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून गेल्या 17-18 वर्षांपासून विध्यार्थ्यांच्या अविरत सेवेत दिवसागणिक वेगवेगळे शैक्षणिक अभिनव प्रयोग करून विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लावत त्यांना आपल्या जीवापाड प्रयत्नाला यशाचा सुगंध देत भावी आयुष्यातील असणा-या करीयरच्या संधी आणि व्यक्तिमत्व विकासाच्या माध्यमातून हा एक सुंदर संकल्प आपल्या यशाचा राजमार्ग तयार करण्याचा ठाम निर्धार-मार्गदर्शन मेळावा आपल्या पुढील वाटचालीस एक ‘दीपस्तंभ’ ठरेल याची आम्ही खात्री बाळगतो.

ज्ञान आत्मसात करता-करता यशाची नवनवीन उत्तुंग शिखरे ‘सर’ करण्याची जी विलक्षण जिद्द तुमच्यात दिसतंय त्या जिद्दीला मनापासून सलाम..!

शालेय किंवा महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच मी पुढे कोण होणार.? असं प्रश्नचिन्ह तुमच्या मनात सतत उमटत असे ज्याला तुम्ही स्वतःच्या आवडी-निवडी ,छंद,कल, वातावरण,कौटुंबिक व्यावसायिक पार्श्वभूमी, पालकांच्या किमान अपेक्षा आणि आपल्या क्षमता कौशल्यानुसार उत्तरे देत असता,पण काही उत्तरे आपलं पूर्ण समाधान करतात का? किंबहुना विश्वासवार्ह असतात ? 

मित्रांनो , हे माहिती-तंत्रज्ञानाच आधुनिक सुसज्ज युग आहे. माहितीची विस्तीर्णता आणि तंत्रज्ञानाची सखोलता हे आजची वास्तविकता, त्यामुळे अशा युगात शिकणा-याकडे अधिकाधिक गोष्टी आणि कौशल्य असावेत. अशावेळी अनेक मार्गदर्शकाचं सहकार्य आणि हातभार लागतो.
आम्ही हाच प्रयत्न मोफत करिअर मार्गदर्शन मेळाव्यातून करणार आहोत.
एखादे करिअर कसे निवडावे ? आपल्या क्षमता आणि कल कसा ओळखावा ? करिअरचे स्वरूप कसे ? इच्छित करिअर साठी लागणारी शैक्षणिक पात्रता , व्यक्तिमत्व,शिक्षण आणि वेळ-अनुकूलता ई.सर्व गोष्टी या करीअरच्या विशाल सागरातून मार्गदर्शनाचे मोती देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आणि संकल्प आपल्या सर्वांच्या सहकार्यातून पूर्ण व्हावं अशी किमान अपेक्षा ठेवतो.

करिअर म्हणजे काय..?
करिअर चे महत्व काय..?
करिअर कसे निवडावं..?
आपण करिअर निवडतांना काय विचार करतो..?
करिअर बाबत स्वतःला व इतरांना काय विचारावे.?
स्वतःला कसे ओळखावे.?
करिअर कसं घडवावं..?
शिक्षण कसे घ्यावे..?
अभ्यास होत नाही..?
आयुष्याची दिशा सापडत नाही..?
आपल्या पालकांना आपलं करिअर कसं समजुन सांगावं..?
करिअर चे मार्गदर्शन कसे घ्यावे..?
आयुष्यात यश कसं प्राप्त करावे..?

ह्या आणि अशा साऱ्या प्रश्नांवर आपल्याला एकच उत्तर ...!
या आणि सहभागी व्हा..!
मोफत करिअर मार्गदर्शन समुपदेशन मेळाव्यात..

करिअर म्हणजे काय..? 
“ आपणच आहोत आपल्या जीवनाचे खरे शिल्पकार ,वेळ आलेली आहे स्वतःला ओळखून झोकून देऊन , भव्य-दिव्यता निर्माण करून स्वतःच्या आणि इतरांचा विकास घडवणे.”
 ‘करिअर’ म्हणजे ‘प्रोफेशन’ व्यवसाय होय.
 ज्या विषयाचा किंवा एखाद्या गोष्टींचा आपण सखोल अभ्यास केला आहे,त्यात आपला खरा रस आहे,रुची आहे अशा विषयांशी निगडीत कायम स्वरूपी काम करून त्यातून आंनद आणि समाधान प्राप्त करणे म्हणजे करिअर आणि व्यवसाय होय.
आयुष्यात पद,प्रतिष्ठा , मान-मरातब, पैसा ,प्रसिद्धी मिळवणे म्हणजे करिअर.
आवडत असलेल्या गोष्टींचा जन्मभर अभ्यास आणि त्यातून मिळणारा आनंदासोबत अर्थप्राप्ती म्हणजे करियर होय.
आपल्या उपजत क्षमता, आवड आणि बुद्धिमत्ता कल यानुसार एखादा व्यवसाय अर्थप्राप्तीसाठी निवडणे आणि त्यात आयुष्य वेचणे म्हणजे करिअर.
कधी-कधी आपला छंद ही करिअर होऊ शकते..!!
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी इच्छित असलेला मार्ग निवडणे म्हणजे करिअर
स्वतःच्या क्षमता ओळखून जग जिंकण्याची अभिलाषा बाळगण्याच्या प्रयत्नांना करिअर म्हणता येईल.
स्वत:च्या स्वाभाविक कलांना अनुसरून आणि अंगी असलेल्या विविध क्षमता व कौशल्य यांचा विचार करून योग्य शिक्षण घेऊन त्यात अथर्जन करणे म्हणजे करिअर होय.
मला काय आवडते ? मला काय जमते ? समाजाला कशाची गरज आहे ? माझं अस्तिव काय आहे ? माझ्या आयुष्याचं ध्येय काय आहे ? या सर्व प्रश्नांची उत्तरे म्हणजे करिअर असू शकत .
करिअर कसं निवडावं..?
“ Successful people tend to become more successful because they are always thinking about their success ”
 स्वतःच्या क्षमता , आवड , कल आणि बुद्धिमत्ता यानुसार करिअर निवडावे.
आयुष्यातील प्राधान्यक्रम कशाला ? यानुसार करिअर निवडावे ?
आपल्या बुद्धीला झेपणारे , नीट आकलन करण्याची क्षमता आपल्यात असणारे , आपल्या आवडीचे आपल्या , आपल्या व्यक्तिमत्वाला शोभणारे व्यवसाय / काम ज्यांमुळे आयुष्याला योग्य दिशा मिळवू शकते याचा विचार करणे म्हणजे करिअर निवडणे होय.
आयुष्यातील इच्छित यशाच्या गाडीला दोन चाके असतात- 
एक म्हणजे क्षमता ( Ability) आणि दुसरे म्हणजे इच्छा ( Willingness ) यांतले एक चाक जरी गळून पडले तर, यशाची गाडी सुरळीतपणे पुढे जाऊ शकणार नाही, त्यामुळे आपण क्षमता आणि आवड यांची सांगड घालून आत्मविश्वासाने सतत प्रयत्न करून निश्चित आणि शाश्वत यश प्राप्त करणे म्हणजे करिअर निवडणे होय.
आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी , छंद ,बुद्धिमत्ता , शिक्षण , व्यक्तिमत्व विकास, कौटुंबिक पार्श्वभूमी, वातावरण , आर्थिक-स्थिती , आपले प्रयत्न यासर्व बाबींना विचारात घेऊन करिअर निवडावं.
जीवनाचा विकास साधण्याचा असेल तर प्रत्येकाने आपली बुद्धी कोणत्या क्षेत्रात चालते ते ओळखून तसे क्षेत्र निवडावे, त्या निवडलेल्या क्षेत्रात उत्तमता आणि प्रतिभा साध्य करावी .
आत्मपरीक्षण, रुची असलेल्या क्षेत्राची निवड आणि निवडलेल्या क्षेत्रात उत्तमता आणि प्रतिभा मिळवणे हि सर्वात महत्वाची त्रिसूत्री आहे .
करिअरला आवश्यक गुणसंपदा तुमच्या व्यक्तीमत्वांत असेल तर तुम्हांला त्या करिअरमध्ये ‘स्कोप’ आहे. ‘स्कोप’ करिअरला नसतो व्यक्तीला असतो.
अधिक माहितीसाठी संपर्क:

विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख सर ,परभणी.
🎓 _(Educator & Motivator)_
"Stop Dreaming, Start Doing."
https://shaikhrafikhsir.blogspot.in
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फौंडेशन.
SK COACHING CLASSES PARBHANI
अधिक माहितीसाठी खालील संकेत स्थळ ला एकदा अवश्य भेट द्या:
http://www.skcoachingclasses.in
________________________________________________________________________________ईयत्ता दहावी च्या विद्यार्थ्यासाठी  प्रथम सत्र परीक्षेच्या पुर्व तयारी साठी विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख सर संपादित विशेष मार्गदर्शिका-2017
ईयत्ता दहावी च्या विद्यार्थ्यासाठी  प्रथम सत्र परीक्षेच्या पुर्व तयारी साठी विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख सर संपादित विशेष मार्गदर्शिका-2017

Sunday, September 10, 2017

..

करियर निवडण्यापूर्वी सावधान..!! एक संधी स्वतःसाठी..! स्वतःला ओळख..!


करियर निवडण्यापूर्वी सावधान..!!
स्वतःला ओळख..!
एक संधी स्वतःसाठी..!
                      दहावी-बारावीची परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला एक मोठा टप्पा. या परीक्षा पास झाल्यावर पुढे काय करायचं, करिअरसाठी कोणतं क्षेत्र निवडायचं, याचा निर्णय सगळ्याच विद्यार्थ्यांना घ्यावा लागतो. कोणी विद्यार्थी आपल्या मनाप्रमाणे तसेच आवडीप्रमाणे क्षेत्र निवडतात, तर कुणी पालकांची इच्छा म्हणून एखादा कोर्स निवडतो. काही विद्यार्थी तर केवळ मित्रमैत्रिणी करत आहेत म्हणून त्या कोर्सला प्रवेश घेतात. पण हळूहळू सत्यपरिस्थिती समोर येऊ लागते.
          सुरुवातीचे महिने सरतानाच आपण जो कोर्स करतोय, तो आपल्याला जमत नाही, हे वास्तव उघड होऊ लागतं. अनेक विद्यार्थ्यांना अशा परिस्थितीत नैराश्य येऊ लागतं. काहीजण आपण निवडलेलं क्षेत्र सोडून देण्याचा विचार करू लागतात.
        पण विद्यार्थी-मित्रानो, थांबा..! थोडं थांबा...!
तुम्ही प्रवेश घेतलेलं क्षेत्र असं मध्येच सोडून देण्यापूर्वी काही गोष्टींचा नीट विचार करा..!

            तुम्ही आता ज्या कोर्सला प्रवेश घेतला आहे, तर तुम्हाला स्वत:ला एक संधी देणं आवश्यक आहे. अभ्यास न जमण्याचं नेमकं कारण शोधा. तुम्ही तुमच्या मनाचं ऐकून कोणताही निर्णय घेऊ नका. तर आपल्या मेंदूलाही विचार करण्याची एक संधी द्या आणि त्यानुसार अंमलबजावणी करा.
          तुम्ही ज्या कोर्सला प्रवेश घेतला आहे, तो कोर्स अर्धा झाला असेल किंवा काही वेळेस तर पूर्ण होत आला असेल; अशा वेळी आपण प्रवेश घेतलेला तो कोर्स पूर्ण करणं, हेच काय ते शहाणपणाचं ठरतं. सध्या तुम्ही घेतलेला हा कोर्स आधी पूर्ण करा आणि मग काय, ते क्षेत्र किंवा कोर्स बदलायचा विचार करा.
        एक लक्षात घ्या की, दिवसेंदिवस प्रत्येक क्षेत्रातील स्पर्धा वाढत आहे. निकालाची टक्केवारी वाढत असून त्या तुलनेत शैक्षणिक संस्थांमध्ये उपलब्ध असलेल्या जागा (Seats) मर्यादित प्रमाणात आहेत. त्यामुळे तुम्ही आता जो कोणता कोर्स करत आहात, तो मध्येच सोडून देणं शहाणपणाचं ठरणार नाही. विद्यार्थी एक गोष्ट विसरतात, ती म्हणजे फक्त दहावी-बारावीनंतरच करिअरचे पर्याय निवडता येतात.
           असं नाही, तर ग्रॅज्युएशननंतरही तुमच्याकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे आता ज्या कोर्सला प्रवेश घेतला आहे तो पूर्ण करणंच योग्य ठरेल..
           थोडा संयम बाळगा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. जोमाने अभ्यासाला लागा आणि आताचा अभ्यासक्रम पूर्ण करा. हा कोर्स तुम्ही यशस्वीपणे पूर्ण केलात, तर तुम्हाला ग्रॅज्युएशन नंतरही अनेक चांगले पर्याय शोधता येतील, निवडता येतील.

हा कोर्स सोडून दुसरा कोणता कोर्स करायचा याची माहिती घ्या, त्या कोर्सला प्रवेश घेण्यासंबंधित पूर्वतयारी करा आणि आपलं ध्येय साध्य करा. यामुळे केवळ तुमचा आत्मविश्वास दुणावेल असं नाही, तर तुमची कौशल्य विकसित होतील, तुमचं ज्ञान वाढेल. याचा फायदा तुमच्यासमोर संधींची अनेक कवाडं खुली होतील.

पुढील वाटचालीस आपणास हार्दिक सदिच्छा आणि शुभेच्छा..!

आपलाच स्नेहाकिंत शुभेच्छुक:
 विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख सर , परभणी.
🎓 _(Educator & Motivator)_
"Stop Dreaming, Start Doing."
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फौंडेशन.
Like My Facebook Page:


अशी करा स्पर्धा परीक्षेची तयारी, व्हाल यशस्वी!!!


                 स्पर्धा परीक्षा देणाऱ्याची संख्या वाढत चालली आहे. या परीक्षेत काहींना एक-दोन प्रयत्नातच यश मिळते. तर काही शेवटच्या संधीत पास होतात. खूप अभ्यास करुनही पेपर अवघड गेल्याचे विद्यार्थ्यांकडून ऐकायला मिळते. या सगळ्याचे गुपित तुमच्या अभ्यास करण्याच्या पद्धतीत दडले आहे. जर तुम्ही पुढील पद्धतीने अभ्यास केला तर नक्कीच स्पर्धा परीक्षेत पास व्हाल
              स्पर्धा परीक्षेची चांगली सुरुवात करणे म्हणजेच अर्धे काम फत्ते झाल्यासारखे असते. तुम्ही जशी सुरुवात करता तसाचा शेवट होतो. यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी शाळा-कॉलेज पासूनच करणे गरजेचे आहे. पुढे जाऊन एमपीएससी, यूपीएससी, बॅंकिंग आदी परीक्षा सोपी बनवायची असेल तर इंग्लीशकडे विशेष लक्ष द्यावे. शिक्षण घेत असतांना बातम्या पहाणे व वाचणे महत्त्वाचे आहे. देश-विदेशातील घडणाऱ्या घटनांचा होणारा परिणाम आणि प्रभाव अभ्यासणे आवश्‍यक आहे. विषयांमधून उमेदवारांचे सर्वंकष ज्ञान तपासले जाते, जे कुठल्याही शॉर्टकट किंवा फास्ट फॉरवर्ड अभ्यास पद्धतीने मिळत नाही. यामुळे लवकर तयारीला सुरुवात करणे योग्य आहे.

                          विविध पॅटर्न्सची आठवी ते बारावी पर्यंतची पुस्तके वाचणे फायद्याचे ठरेल. या पुस्तकांमधील मूलभूत माहिती खूप महत्त्वाची आहे ती एक प्रकारचा पायाच आहे. स्पर्धा परीक्षेत गणिताचा स्तर हा दहावीपर्यंतचा असतो. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळविणे खूप महत्त्वाचे आहे. इंग्रजी लिहिण्याची व बोलण्याची सवय केलीच पाहिजे. यासाठी ग्रामरकडे लक्ष दयावे, इंग्लिश वर्तमानपत्र वाचा नंतर हळूहळू लहान-मोठ्या पुस्तकांकडे मोर्चा वळवावा. इंग्रजी चॅनेल्स वरील विविध विषयांवरील कार्यक्रम, परिसंवाद व चर्चा ऐकण्याने आपले शब्दोच्चार, बोलण्याची शैली इत्यादी सुधारण्यास मदत होईल.
                   प्रत्येक गोष्टींसाठी वेळेचे योग्य नियोजन हवे. कुठला विषय अधिक व कुठला कमी महत्त्वाचा, कुठला सोपा व कुठला कठीण इत्यादी बाबी डोळ्यांसमोर ठेवून वेळेचे नियोजन करता आले पाहिजे. प्रशासकीय सेवा परीक्षांमध्ये यशस्वी व्हायचे असेल तर फेसबुक, ट्‌विट्टर इंटरनेटसारख्या वैज्ञानिक व इतर वेळखाऊ मोहांवर विजय मिळविता यायलाच हवा. बुद्धिमत्ता चाचणीवर भर शैक्षणिक वर्षांपासूनच द्यावा कारण कोणत्याही स्पर्धा परीक्षेतील एक अविभाज्य घटक म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी. यासाठी गतिमान आकडेमोड करणे, पाढे, वर्ग, घनसंख्या यांचे पाठांतर असावे. वाचनातूनच आजूबाजूच्या घटनांचा वेध घेता येतो, विचार प्रगल्भ होतात.
गणित हा कठीण वाटणारा विषय आहे. परंतु स्पर्धा परीक्षेत कलाटणी मिळवून देऊ शकतो.
               शाळेत असतानाच गणिताचा पाया मजबूत करायला हवा. यामधे काळ, काम, वेग, नाते संबंध, दिशा, तर्कशुद्ध युक्तिवाद आदी बाबींवर प्रश्न विचारले जातात.स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीकोनातून करिअर सापेक्ष विकास फार महत्त्वाचा आहे व तो केल्यास यश सहज साध्य आहे. करिअरशी निगडित अभ्यास आणि ज्ञान, करिअरसाठी आवश्‍यक गुणकौशल्ये, करिअरला पूरक अशा वृत्तीत बदल करणे उदा- पोलीस बनण्यासाठी तल्लख बुद्धिमत्ता, डिटेक्‍टिव्ह माइंड, तन्दरुस्त व चपळ शरीर असावे लागते. जर तुम्ही वरील पद्धतीने प्रामाणिपणे अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल.