प्रिय स्न्हेही नेट बंधुनो हार्दिक सुस्वागतंमं...!!.....विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख एक विद्यार्थी प्रिय प्रयोगशील शिक्षक व्यक्तिमत्व आणि मार्गदर्शक यांच्या ह्या अधिकृत संकेत स्थळ (वेबसाईट-पोर्टल) ला भेट दिल्याबद्दल हार्दिक धन्यवाद..

Sunday, September 10, 2017

..

करियर निवडण्यापूर्वी सावधान..!! एक संधी स्वतःसाठी..! स्वतःला ओळख..!


करियर निवडण्यापूर्वी सावधान..!!
स्वतःला ओळख..!
एक संधी स्वतःसाठी..!
                      दहावी-बारावीची परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला एक मोठा टप्पा. या परीक्षा पास झाल्यावर पुढे काय करायचं, करिअरसाठी कोणतं क्षेत्र निवडायचं, याचा निर्णय सगळ्याच विद्यार्थ्यांना घ्यावा लागतो. कोणी विद्यार्थी आपल्या मनाप्रमाणे तसेच आवडीप्रमाणे क्षेत्र निवडतात, तर कुणी पालकांची इच्छा म्हणून एखादा कोर्स निवडतो. काही विद्यार्थी तर केवळ मित्रमैत्रिणी करत आहेत म्हणून त्या कोर्सला प्रवेश घेतात. पण हळूहळू सत्यपरिस्थिती समोर येऊ लागते.
          सुरुवातीचे महिने सरतानाच आपण जो कोर्स करतोय, तो आपल्याला जमत नाही, हे वास्तव उघड होऊ लागतं. अनेक विद्यार्थ्यांना अशा परिस्थितीत नैराश्य येऊ लागतं. काहीजण आपण निवडलेलं क्षेत्र सोडून देण्याचा विचार करू लागतात.
        पण विद्यार्थी-मित्रानो, थांबा..! थोडं थांबा...!
तुम्ही प्रवेश घेतलेलं क्षेत्र असं मध्येच सोडून देण्यापूर्वी काही गोष्टींचा नीट विचार करा..!

            तुम्ही आता ज्या कोर्सला प्रवेश घेतला आहे, तर तुम्हाला स्वत:ला एक संधी देणं आवश्यक आहे. अभ्यास न जमण्याचं नेमकं कारण शोधा. तुम्ही तुमच्या मनाचं ऐकून कोणताही निर्णय घेऊ नका. तर आपल्या मेंदूलाही विचार करण्याची एक संधी द्या आणि त्यानुसार अंमलबजावणी करा.
          तुम्ही ज्या कोर्सला प्रवेश घेतला आहे, तो कोर्स अर्धा झाला असेल किंवा काही वेळेस तर पूर्ण होत आला असेल; अशा वेळी आपण प्रवेश घेतलेला तो कोर्स पूर्ण करणं, हेच काय ते शहाणपणाचं ठरतं. सध्या तुम्ही घेतलेला हा कोर्स आधी पूर्ण करा आणि मग काय, ते क्षेत्र किंवा कोर्स बदलायचा विचार करा.
        एक लक्षात घ्या की, दिवसेंदिवस प्रत्येक क्षेत्रातील स्पर्धा वाढत आहे. निकालाची टक्केवारी वाढत असून त्या तुलनेत शैक्षणिक संस्थांमध्ये उपलब्ध असलेल्या जागा (Seats) मर्यादित प्रमाणात आहेत. त्यामुळे तुम्ही आता जो कोणता कोर्स करत आहात, तो मध्येच सोडून देणं शहाणपणाचं ठरणार नाही. विद्यार्थी एक गोष्ट विसरतात, ती म्हणजे फक्त दहावी-बारावीनंतरच करिअरचे पर्याय निवडता येतात.
           असं नाही, तर ग्रॅज्युएशननंतरही तुमच्याकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे आता ज्या कोर्सला प्रवेश घेतला आहे तो पूर्ण करणंच योग्य ठरेल..
           थोडा संयम बाळगा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. जोमाने अभ्यासाला लागा आणि आताचा अभ्यासक्रम पूर्ण करा. हा कोर्स तुम्ही यशस्वीपणे पूर्ण केलात, तर तुम्हाला ग्रॅज्युएशन नंतरही अनेक चांगले पर्याय शोधता येतील, निवडता येतील.

हा कोर्स सोडून दुसरा कोणता कोर्स करायचा याची माहिती घ्या, त्या कोर्सला प्रवेश घेण्यासंबंधित पूर्वतयारी करा आणि आपलं ध्येय साध्य करा. यामुळे केवळ तुमचा आत्मविश्वास दुणावेल असं नाही, तर तुमची कौशल्य विकसित होतील, तुमचं ज्ञान वाढेल. याचा फायदा तुमच्यासमोर संधींची अनेक कवाडं खुली होतील.

पुढील वाटचालीस आपणास हार्दिक सदिच्छा आणि शुभेच्छा..!

आपलाच स्नेहाकिंत शुभेच्छुक:
 विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख सर , परभणी.
🎓 _(Educator & Motivator)_
"Stop Dreaming, Start Doing."
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फौंडेशन.
Like My Facebook Page:


अशी करा स्पर्धा परीक्षेची तयारी, व्हाल यशस्वी!!!


                 स्पर्धा परीक्षा देणाऱ्याची संख्या वाढत चालली आहे. या परीक्षेत काहींना एक-दोन प्रयत्नातच यश मिळते. तर काही शेवटच्या संधीत पास होतात. खूप अभ्यास करुनही पेपर अवघड गेल्याचे विद्यार्थ्यांकडून ऐकायला मिळते. या सगळ्याचे गुपित तुमच्या अभ्यास करण्याच्या पद्धतीत दडले आहे. जर तुम्ही पुढील पद्धतीने अभ्यास केला तर नक्कीच स्पर्धा परीक्षेत पास व्हाल
              स्पर्धा परीक्षेची चांगली सुरुवात करणे म्हणजेच अर्धे काम फत्ते झाल्यासारखे असते. तुम्ही जशी सुरुवात करता तसाचा शेवट होतो. यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी शाळा-कॉलेज पासूनच करणे गरजेचे आहे. पुढे जाऊन एमपीएससी, यूपीएससी, बॅंकिंग आदी परीक्षा सोपी बनवायची असेल तर इंग्लीशकडे विशेष लक्ष द्यावे. शिक्षण घेत असतांना बातम्या पहाणे व वाचणे महत्त्वाचे आहे. देश-विदेशातील घडणाऱ्या घटनांचा होणारा परिणाम आणि प्रभाव अभ्यासणे आवश्‍यक आहे. विषयांमधून उमेदवारांचे सर्वंकष ज्ञान तपासले जाते, जे कुठल्याही शॉर्टकट किंवा फास्ट फॉरवर्ड अभ्यास पद्धतीने मिळत नाही. यामुळे लवकर तयारीला सुरुवात करणे योग्य आहे.

                          विविध पॅटर्न्सची आठवी ते बारावी पर्यंतची पुस्तके वाचणे फायद्याचे ठरेल. या पुस्तकांमधील मूलभूत माहिती खूप महत्त्वाची आहे ती एक प्रकारचा पायाच आहे. स्पर्धा परीक्षेत गणिताचा स्तर हा दहावीपर्यंतचा असतो. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळविणे खूप महत्त्वाचे आहे. इंग्रजी लिहिण्याची व बोलण्याची सवय केलीच पाहिजे. यासाठी ग्रामरकडे लक्ष दयावे, इंग्लिश वर्तमानपत्र वाचा नंतर हळूहळू लहान-मोठ्या पुस्तकांकडे मोर्चा वळवावा. इंग्रजी चॅनेल्स वरील विविध विषयांवरील कार्यक्रम, परिसंवाद व चर्चा ऐकण्याने आपले शब्दोच्चार, बोलण्याची शैली इत्यादी सुधारण्यास मदत होईल.
                   प्रत्येक गोष्टींसाठी वेळेचे योग्य नियोजन हवे. कुठला विषय अधिक व कुठला कमी महत्त्वाचा, कुठला सोपा व कुठला कठीण इत्यादी बाबी डोळ्यांसमोर ठेवून वेळेचे नियोजन करता आले पाहिजे. प्रशासकीय सेवा परीक्षांमध्ये यशस्वी व्हायचे असेल तर फेसबुक, ट्‌विट्टर इंटरनेटसारख्या वैज्ञानिक व इतर वेळखाऊ मोहांवर विजय मिळविता यायलाच हवा. बुद्धिमत्ता चाचणीवर भर शैक्षणिक वर्षांपासूनच द्यावा कारण कोणत्याही स्पर्धा परीक्षेतील एक अविभाज्य घटक म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी. यासाठी गतिमान आकडेमोड करणे, पाढे, वर्ग, घनसंख्या यांचे पाठांतर असावे. वाचनातूनच आजूबाजूच्या घटनांचा वेध घेता येतो, विचार प्रगल्भ होतात.
गणित हा कठीण वाटणारा विषय आहे. परंतु स्पर्धा परीक्षेत कलाटणी मिळवून देऊ शकतो.
               शाळेत असतानाच गणिताचा पाया मजबूत करायला हवा. यामधे काळ, काम, वेग, नाते संबंध, दिशा, तर्कशुद्ध युक्तिवाद आदी बाबींवर प्रश्न विचारले जातात.स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीकोनातून करिअर सापेक्ष विकास फार महत्त्वाचा आहे व तो केल्यास यश सहज साध्य आहे. करिअरशी निगडित अभ्यास आणि ज्ञान, करिअरसाठी आवश्‍यक गुणकौशल्ये, करिअरला पूरक अशा वृत्तीत बदल करणे उदा- पोलीस बनण्यासाठी तल्लख बुद्धिमत्ता, डिटेक्‍टिव्ह माइंड, तन्दरुस्त व चपळ शरीर असावे लागते. जर तुम्ही वरील पद्धतीने प्रामाणिपणे अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल.

1 comment:

Free Career Guide said...

Nice Post thanks for the information, good information & very helpful for others. For more information about Digitize India Registration On digitizeindia.gov.in | Sign Up For Data Entry Job Eligibility Criteria & Process of Digitize India Registration Click Here to Read More