🎓मी शिक्षक आहे.
मला धडा समजूनपण घ्यायचायं ,
मला तो समजावूनपण द्यायचायं.
मला पेपर काढायचायं ,
मला पेपर तपासायचायं.
बाजूला कितीही नकारात्मक परिस्थिती येवो ,
मला कितीही अडचणी येवोत ,
मला लढायचंय. मला सकारात्मक राहायचंय ,
कारण मला हसायचंय मला हसवायचंय .
भावी पिढीची जबाबदारी माझ्यावर आहे, याची मला जाणीव आहे.
हो ......... मला त्यांना घडवायचंय
आणि....... मला देश घडवायचाय.
कारण प्रिय पालकांनो ,तुम्ही....
आत्मविश्वासाने सोपविला आहे तुमचा बेटा.
मी HARDWARE वापरतोय ,
मी SOFTWARE शिकतोय ,
मी ZOOM , MEET वापरतोय ,
मी PPT तयार करतोय..
आणि मी CAMERA ADJUST करतोय .
मी मानलंच आहे , आव्हानांना संधी
आणि म्हणूनच मी आहे तुफान में आंधी.
मी SOUND SET करतो , LIGHT ADJUST करतो..
माझ्या घराचा कोपरा झाला आहे STUDIO ,
मीच SPOT BOY , माझाच चेहरा आणि माझाच AUDIO
माझ्याही पेक्षा अधिक ध्येयनिष्ठने जगतोयं .
जगाचा अन्न निर्माता आणि पेरतोय सृष्टीत विश्वासार्हता..
त्याची पेरणी मातीतली आणि माझी .......हो मुलांच्या मनातली .
त्याचे कष्ट देतात फळ आणि माझे जगण्यासाठी बळ.
असे सर्व घडत असताना तुम्हीही राहा सकारात्मक..
धडा ..... नक्की शिकवला जाईल ,
गणित....... नक्की समजेल ,
विज्ञान........नक्की भविष्य घडवेल ,
भूगोल...... नक्की करेल सृष्टी सुंदर ,
भाषा..... नक्की करतील आपल्यातील कमी अंतर
कारण .
माझा तुमच्यावर विश्वास आहे .
माझा निसर्गावर विश्वास आहे ,
माझा फुलांवर विश्वास आहे ,
माझा मुलांवर विश्वास आहे
आणि म्हणूनच माझा प्रत्येक संकटातील संधीवर पण विश्वास आहे .
कारण......
कारण मी शिक्षक आहे .आणि म्हणूनच मी जीवनभराचा विद्यार्थी आहे ,
जीवनभराचा विद्यार्थी आहे.
अभ्यासक्रम बदलतो आणि मीही बदलतो .
धडा बदलतो मग मीही बदलतो वर्ग बदलतो तेंव्हाही मी बदलतो .
वर्ष बदलते आणि नव्याने मीही बदलतो .नव्या विचारांनी सळसळून वर येतो,
खंबीरपणे बदलांना सामोरे जातो.
कारण.....
कारण मी शिक्षक आहे .
आणि म्हणूनच मी जीवनभराचा विद्यार्थी आहे
जीवनभराचा विद्यार्थी आहे.
सगळं काही झालंय SET.
Now two minutes wait ,
आत्ताच आणून ठेवतो पाण्याची बाटली कारण तात्पुरता नट झालोय ...तरी
स्वावलंबी व्हा , आत्मनिर्भर बनो ..!
हिच शिकवण गेली अनेक वर्ष वाटली.
मी शिकणार आहे, मी शिकवणारआहे.
Empowering Education and Creating Happiness
या PURPOSE प्रमाणे जगणार आहे ...कारण .......
कारण मी शिक्षक आहे .
आणि म्हणूनच मी जीवनभराचा विद्यार्थी आहे जीवनभराचा विद्यार्थी आहे.
कोणी लिहिली माहिती नाही, पण छान आहे...... आवडली म्हणून फॉरवर्ड केली.
संकलन आणि संपादन:
विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख,
🎓डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
Post a Comment