आजच्या प्रगत तंत्रज्ञान स्नेही युगात आजची सोशल मीडिया म्हणजे अत्य-आधुनिक समाजमाध्यमं दिवसेंदिवस अधिकाधिक शक्तीशाली बनत, आपल्या आयुष्याचा आणि जगण्याचा एक अविभाज्य भाग बनत चालली आहे.
आज प्रत्येकाला खूप घाई आहे, जगभरातल्या काना कोपऱ्यात राहणाऱ्या ओळखी-अनोळखी लोकांशी संवाद साधायला ,आपले विचार, भावना,फोटो, व्हिडीओ ई. पोस्टच्या माध्यमातून आपली आशय निर्मिती करून अख्ख्या जगाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याची एक ताकत देणारी ही आजची समाज माध्यमे अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल करतात.
समाज माध्यमांचा प्रभावी वापर कसा करावा..?
फेसबुक, ट्विटर , व्हाट्सअप आणि इतर सोशल नेटवर्किंग साईटवर व्यक्ती समूहाने राहत आहे यात सदस्यांच्या संख्येला मर्यादा नाहीत प्रत्येक सदस्य हे सारख्या विचारसरणीचे असेल असेही नाही.
समाज माध्यमे ही संपर्काची प्रभावी माध्यमे असून समाज मन घडविण्याची ताकद या माध्यमांमध्ये आहे. त्यामुळे समाज घडविण्यासाठी याचा वापर समाजातील प्रत्येक घटकांनी विधायक आणि सकारात्मक करणे काळाची गरज आहे.
प्रत्येक सदस्य मात्र शिक्षित असू शकतात, परंतु सुशिक्षित असेल असेही नाही सांगतात की प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात सकारात्मक व नकारात्मक. सकारात्मक गोष्ट शिकायला शिस्त व वेळ लागते, परंतु नकारात्मक गोष्टींसाठी तसं काही नाही.
आप आपल्या ग्रुपवरील विचारवंत, बुद्धिजीवी वेळोवेळी ग्रुपमधील सदस्यांना सूचना देत असतात विनंती करीत असतात,त्यांचेपालन करण्याचा प्रयत्न करा.
सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करून विवेकी समाज निर्माण करावा , परंतु सदस्य या सूचनेकडे पूर्ण दुर्लक्ष करतात, बरेचसे सदस्य अशा पोस्ट टाकतात की विचार पडतो की या सदस्यांनी आपली अक्कल तरी गहाण ठेवली आहे की काय?
साधा आणि थोडासा आपण विचार, तर्क केला तर खरे, खोटे किंवा अफवा यातील फरक लक्षात येतो. ठीक आहे, संपूर्ण जग आपल्या हातात आल्यासारखे झालंय.
वेळेबरोबर काळही बदलत असतो. जो काळाबरोबर बदलत असतो तोच समाजामध्ये टिकतो. सध्याच्या काळात सोशल मीडियाचा वापर अधिक होत आहे. याच सोशल मीडियाचा विवेकी पद्धतीने प्रभावी वापर केल्यास समाजाला उपयुक्त ठरेल.
चांगली गोष्ट विनोद , आपले आनंदाचे क्षण , आपल्या मनातील भावना सहज दुसऱ्यांपर्यंत पोहोचते, परंतु आपण असे स्वातंत्र्य मिळालं म्हणून त्याचा उपयोग समाजोपयोगी कामासाठी न करता समाजघातक कामासाठी करावा काय सोशल मीडिया नेमका कसा हाताळावा, त्यातून काय करावं आणि काय टाळावं हे जर अजूनही कळलेलं नसेल तर आपली गणना कोणत्या कॅटेगरीमध्ये करावी, हा प्रश्न पडतो.
समाज माध्यमांची सुरक्षितता :
ही समाज माध्यमे हाताळताना त्याच रीतसर ज्ञान, आकलन, जबाबदारी, सुरक्षितता आणि निययामावली ह्याचा दिवसेंदिवस अज्ञानही दिसून येत आहे..
दैनंदिन जीवनात चार चौघात ,मित्र-मंडळीत आपला वावर मुक्त असतो,पण सोशल मीडियावर प्रत्येक क्षण आणि क्षण ,आपला राग, शब्द, व्यक्त केलेल्या भावना, दुःख, आनंद, ऑनलाईन गप्पा-टप्प्या ,जीवन-चर्या, आवडी-निवडी, स्थान-वेळ,स्थिती,ऑनलाईन वर्तन ..ई.आदी सर्वच गोष्टी डिजिटल स्वरूपात लिखित नोंद होतात.. हे विसरू नका.
आजच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या काळात वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या गरजेनुसार आणि व्यवसायिक स्वरूपातील अनेक सोशल मीडिया अप्स आहेत, त्याचा कसा आणि किती वापर स्वतः साठी किंवा आपल्या व्यवसायासाठी करायचा हे आपल्याचं नियंत्रणात आहे..
आपली व्यक्तीगत आणि सामाजिक प्रतिमा आणि प्रतिभा समाजासमोर सोशल मीडिया च्या माध्यमातून मांडताना विवेकी विचार आपल्या कडे असणे गरजेचे आहे.
आपली प्रोफाइल किंवा अकाउंट किती सुरक्षित आहे हे ही अवश्य तपासून घेणे ही आपलीच जबाबदारी आहे.
सोशल मीडियावरील आजकल प्रतिबंधात्मक सुरक्षितता वेळीच समजून घेतली तर, पुढील अनावश्यक मानसिक त्रासापासून आपण वाचु शकतो.
भावी भविष्यातीळ विविध प्रकारच्या करिअरच्या संधीही ह्या क्षेत्रात निर्माण होणार आहे, नुकताच रिलायन्स जिओच्या वार्षिक अहवालात एक सूतोवाच करण्यात आलेलं आहे की,Data is a new fuel of Internet age..
जोपर्यंत एखादं अप्स पूर्णपणे समजत नाही, तोपर्यंत तिथं व्यक्त होण्याची लगीन घाई करू नये.
कोणत्याही अँप्स मधील सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य देत, Privacy Settings बारकाईने निरीक्षण करून त्यांत गरजेनुसार बदल अवश्य करावं.
सोशल मीडिया हे एक आभासी जग (Virtual World) असतं, त्यांतील आपले मित्र, Follower , Following,Fan ई. कोण आणि किती असावे ह्याबदल नेहमीच जागरूक असावे.
अनोळखी व्यक्ति कडून काही संशयास्पद Spam, Fishing, Fraud, Online Money Offer,Hacking,Fake Account Report , Marfing ई. काही आढळत असेल तर Cyber Crime ला अवश्य कळवा आणि त्याच्या नोंदी ही जपा.
आपला Password नियमितपणे बदलत रहा.त्यांत Capital Letter, Numbers, Special Character, Sign ई. मिश्रित असु द्या.
प्रत्येक सोशल मीडिया अकाउंट साठी वेगळं Password ठेवा. मित्र मैत्रिणी शी शेअर करताना त्याचा वेळ ही नोंद ठेवा किंवा काळजी घ्या.
‘तरुणांनी समाज माध्यमांच्या मदतीने करिअर, शिक्षण, व्यक्तीमत्व विकास यासारख्या क्षेत्रांचा अभ्यास करावा. स्वत:च्या प्रगतीसाठी समाज माध्यमांचा वापर केल्यास तरुणांची प्रगती होईल. त्यांना नवनवीन संधी उपलब्ध होतील’. ह्यात शंका नाही,म्हणून ह्याचा काळजीपूर्वक वापर आपल जगण हि समृद्ध करेल.
-लेखन, संकलन आणि संपादन:
©-विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख,
Mentor: Success Digital Media Career & Research Academy Parbhani.
Post a Comment