जर तुम्ही 100 काळ्या मुंग्या , आणि 100 तांबड्या मुंग्या घेतल्या व एका काचेच्या जार मध्ये सोडल्या तर काही घडणार नाही.मुंग्या एकमेकांत मिसळून जातील...
पण जर तुम्ही काचेचा जार कसलीही दया माया न दाखवता जोरजोरात हलवलात, आणि टेबलावर ठेवलात...तर तुम्हाला दिसेल की दोन्ही मुंग्या एकमेकाला मारायला सुरूवात करतात.
काळ्या मुंग्यांना वाटते की, तांबड्या मुंग्यामुळे आपला जीव धोक्यात आहे.
तसेच तांबड्या मुंग्यानाही वाटते की काळ्या मुंग्या आपल्या जीवावर उठलेत.
काळ्या आणि तांबड्या मुंग्या एक दुसऱ्याला शत्रू समजायला लागतात..!
जार हिंस्रपणे हलवणारे हात त्यांच्या लक्षातच येत नाहीत...!
हेच आपल्या समाजात घडते आहे...!
समाज नेहमीच शांत समंजस असतो.!
राजकारणी हिंस्र हातांनी ढवळून काढलेला समाज आपल्या लक्षातच येत नाही.
मग लिंग, जाती, धर्म यांनी बनलेला समाज एकमेकांच्या विरोधात उभा टाकतो.
एकमेकाला शत्रू मानायला लागतो.
आपण हे हात ओळखायला शिकलं पाहिजे.
अन्यथा एकमेकांत लढून मरणे हेच आपले दुर्दैव असेल..!
उघडा डोळे...!! बघा नीट..!!!🙏
Post a Comment