टिक टॉक बंद हुवा तो क्या हुवा ...
मगर टॅलेंट जिंदा है साहेब..!😊
गेल्या काही वर्षांपासून भारतीय समाजमनावर विविध कलागुणांचा आणि क्रियाशिलतेचा मनोरंजनात्मक आरूढ झालेला एक लोकप्रिय चिनी बनावटीचं समाज-माध्यम अखेर प्लेस्टोर वरून काढुन टाकण्यात आला ह्याचा काहींनी जल्लोष केला ,काहींनी तर दुःख त रोष ही व्यक्त करत शेवटचा व्हिडिओ ही अपलोड करताना आपल्या भावना ही व्यक्त केल्या..
मी व्यक्तिगत पातळीवर कधीच टिकटॉक वापरलं नाही परंतु न वापरता ही दिवसेंदिवस वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याची जोरदार चर्चा, टीका आणि वेगळेपणा सातत्याने जाणवलं, म्हणून त्यासंदर्भात आपणाशी एक चिंतनात्मक विचार व्यक्त करायला नक्कीच आवडेल मित्रांनो..
अगदी खूप कमी वेळेत ह्या टिक टॉक ने भारतीय समाजातील प्रत्येकाला आपल्याकडे खेचून त्यांच्या कलागुणांना ग्लोबल प्लॅटफॉर्म देऊन अल्पावधीतच प्रसिद्धी देतांना त्यांच्या पारंपरिक कालातीत निकषांना तिलांजली देत त्यांची खरी गुणवत्ता जगासमोर रोखठोकपणे मांडली, ह्याचं करावं तेवढं कौतुक कमीचं..
उथळ टाईमपासची किंवा थिल्लरपणाची टीका सतत झेलणारं एक मनोरंजनात्मक अँप प्रत्यक्षात लाखो लोकांच्या दैनंदिन जगण्याचा इतका मोठा भाग झालं होतं, हे ते मागं उरणारं वास्तव आहे,परंतु टिक टॉकच्या यशा-अपयशात काही टिकात्मक सामाजिक आयाम ही आहेत..
टिक टॉक अगदी कमी वेळेत अफाट लोकप्रिय झालं, बॉलीवूड मधील काही आर्थिक गणितं पण बिघडलं म्हणे..!
कधीही न शिकलेलं ,शाळेत न जाता ही ,कोणत्याही प्रकारचे सो कॉल्ड प्रोफेशनल शिक्षण न घेताही विद्यमान समाज चौकटीच्या वेशीला पोटापूरता बांधलेला वर्ग , व्यक्ती ह्या सर्वांना टिक टॉक सारख्या अनेक ऍप्सने व्यासपीठ उपलब्ध करून दिलं..
आजची अत्याधुनिक समाजमाध्यमे ही आता विचार क्रांतीची माध्यमे झाली आहेत, याच समाजमाध्यमांच्या दबाव गटानेही सरकारला चिनी ॲप्सवर बंदी घालायला भाग पाडले,परन्तु हे बंद करतांना शासनाने फक्त चीन विरोध म्हणा किंवा त्याच्या वस्तूवर निर्बंध असा विचार केलेला दिसतो,त्याच्या 59 ऍप्स वर बंदी म्हणजे हे डिजिटल स्ट्राईक समजायचे का..?
ह्या सर्व गोष्टींना एक भक्कम भारतीय बनावटीचं दर्जेदार उत्पादन आपण जोपर्यंत दुसरा पर्यायी विकल्प जनतेला देत नाही तोपर्यंत हा सर्व प्रकार म्हणजे केवळ वेळ आणि परिस्थिती लक्षात घेऊन केलेला खटाटोप दिसतोय...
हे सर्व प्रकार अंमलात येण्यापुर्वी त्याची पूर्व तयारी, ईतर मार्ग, त्यांतून होणारे काही टीकात्मक परीक्षण, आपलं डिजिटल अवलंबुन असणारे पर्याय ह्यांचा विचार ह्या सर्व बाबींची पूर्वकल्पना दिली असती तर् सर्वांनी त्याचं स्वागतच केलं असतं..
जाऊ द्या राव, सरकारने आपल्या सर्वांच्या हिताचाही विचार केलेला आहे का नाही हे येणारा काळ अगदी चित्र स्पष्ट करेल यात शंका नाही..
टिक टॉक सारखी ऍप्स कोणत्या वैयक्तिक-सामाजिक उर्मीना आवाहन करतात ,कोणत्या मानसिकतेला उत्तेजन देतात ,अभिव्यक्तीच्या कोणत्या रुपाला प्राधान्य देतात याचा शोध ही या निमित्ताने घेणं गरजेचे आहे असं मला वाटतं.
जसे टिक टॉक सारख्या समाज माध्यमाचे जसे फायदे आहेत तसें काही नुकसान ही आहेत, ह्या सर्व गोष्टीचा विचार करून त्यांत आवश्यक त्या सूचना आणि मार्गदर्शक तत्वे ही संबंधित डिजिटल यंत्रणेने घालून दिल्यास एक नवा दर्जेदार भारतीय पर्याय लवकर उपलब्ध होईल याची आशा बाळगूया मित्रांनो.
ईतर पर्यायी मार्ग ही लवकरच निघतील ,पण टिक टॉकच्या माध्यमातून जी जन प्रतिभा सर्व सामान्य माणसाच्या आणि वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर समोर आली त्याला एक सकारात्मक वळण समाजाच्या पर्यायाने देशाच्या कला साहित्य चळवळीत नक्कीच भर पाडतील अशी अपेक्षा ठेवूया...
टिक टॉक बंद हुवा तो क्या हुवा ...
मगर टॅलेंट जिंदा है साहेब..!
©-विद्यार्थी मित्र रफीक शेख.
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
Post a Comment