कोरोना प्रादुर्भावामुळे इयत्ता १० वी च्या परीक्षा रद्द करण्यात आलेल्या आहेत, इयत्ता ११ वी च्या वर्गात प्रवेशासाठी गुण देण्यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत एक स्वतंत्र CET (common Entrance Test) परीक्षा घ्यावी काय?
सदरची CET परीक्षा राज्यातील सर्व इच्छुक इयत्ता १० वी चे विद्यार्थी देऊ शकतील. सदरच्या CET परीक्षेचे स्वरूप हे साधारणत: OMR पद्धतीनुसार असावी, सर्व विषयांचा मिळून एकत्रित एक पेपर असावा,सदरच्या पेपर साठी सुमारे २ तासांचा वेळ देण्यात येईल.
सदरची परीक्षा साधारणत: जुलै महिन्यामध्ये किंवा कोरोना चा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर प्रत्येक शाळेच्या ठिकाणी घेण्यात यावी असे विचारात आहे. कोरोना विषयक सुरक्षेचे सर्व नियमांचे पालन करून या परीक्षेच्या गुणांच्या आधारावर इच्छुक विद्यार्थ्यांना गुणात्मक तत्वावर ११ वी मध्ये प्रवेश देता येईल. राज्यातील सर्व ११ वी ला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वसाधारणपणे १०० गुणांची ऑफलाईन (प्रत्यक्ष ) प्रवेश चाचणी घेणे प्रस्तावित आहे.
तरी सर्व बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी सदरच्या सर्वे लिंक मध्ये आपले स्पष्ट मत नोंदणी करावी.
सदर लिंक ही दि. ०९ मे २०२१ रोजी बंद होईल.
https://www.research.net/r/11thCETTEST
शालेय शिक्षण विभाग
मुंबई
Post a Comment