आत्मिक बळ एकवटण्याची संधी घालू नका मित्रांनो...!
ईकीगाई वाचल्यावर, डॉ. डेमिंग ( जपान) यांची एक गोष्ट इथं नमूद करतो...
"माणसाची अंगभूत प्रेरणा ही ऊर्जेचा अक्षय स्रोत असतें.."
हा एक मनोवैज्ञानिक संशोधनावर आधारीत शैक्षणिक चित्रपटाची एक क्लिप आहे.
म्हणून सकारात्मक व्हा. आपल्या आत्मविश्वासास प्रोत्साहित करा जेव्हा संधी मिळेल तेंव्हा इतरांना मदत करा. प्रोत्साहन हे तुमचे शब्द किंवा कृतीद्वारे असू शकते जे इतरांचे जीवन बदलू शकेल.
वेळ आणि विपरीत परिस्थितीत आपल्या सुप्त मनाशी एक पक्की खुणगाठ बांधून घ्या , कोणी साथ देऊ ना देवो ,आपणच आपलं आत्मिक बळ जोपर्यंत एकत्र करणार नाहीं तोपर्यंत त्या वेळेवर आणि परिस्थितीवर मात करू शकणार नाही..
वेळ सर्वत्र सारखीच आहे, खचू नका मित्रांनो, हीच योग्य वेळ आपणांस अजून सक्षम करणार आहे, गरज आहे हार न मानता ह्या संकटाशी सर्वोतोपरी मुकाबला करण्याची आणि यशश्री खेचून आणण्याची...
सलाम आपल्या सर्वोत्तम सहनशीलता आणि संयमाला..👏🏻
काळजी घ्या आपली आणि आपल्या परिवाराची..
Post a Comment