पुस्तक समीक्षा: Sapiens: A Brief History of Humankind
सेपिअन्स-मानव जातीचा अनोखा इतिहास..
मूळ लेखक: युव्हाल नोआ हरारी
मराठी अनुवाद: वासंती फडके
प्रकाशक: डायमंड पब्लिकेशन्स, पुणे.
समीक्षक: विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख, परभणी.
मानव जातीच्या इतिहासाची मर्मभेदी मांडणी करणारं आणि भविष्यातल्या थरारक शक्यतांचं भाकीत करणारं इंटरनँशनल बेस्ट सेलर पुस्तक म्हणजे सेपिअन्स..
एक लाख वर्षापूर्वी माणसाच्या कमीत कमी सहा जाती पृथ्विवर राहत होत्या ,आज फक्त एकच शिल्लक आहे म्हणजे आपण 'होमो सेपिअन्स'..
आपण पृथ्वीवर अधिसत्ता कशी स्थापन केली?,आपल्या भटक्या पुर्वजांनी एकत्र येऊन शहरं आणि राज्यं कशी स्थापन केली ? देव,राजे आणि मानवी हक्क अशा गोष्टींवर आपण कसा विश्वास ठेवायला लागलो? आणि येणाऱ्या सहस्रकांमध्ये आपलं जग ,इथले मानव त्याची सभ्यता ,संस्कृती , व्यवहार कसं असेल ?
माणसाची विचारपद्धती ,त्यांचं वर्तन, त्याची बलस्थानं आणि त्याचा भविष्यकाळ यांबदलच्या आपल्या सगळ्या समजुतीना आव्हानं देणारं विचार प्रवर्तक पुस्तक म्हणजे सेपिअन्स -मानव जातीचा एक अनोखा इतिहास..
इस्राईल येथील 'हिब्रू' विद्यापीठात 'जागतिक इतिहास' ह्या विषयाचा प्राध्यापक ज्याने ऑक्सफर्ड विद्यापीठातून 'इतिहास' ह्या विषयांत पीएच.डी प्राप्त करणारा जागतिक कीर्तीचा विचारवंत ज्याची तुलना 19 व्या शतकातील कार्ल-मार्क्स, हेगेल,जॉर्ज आर्व्हेल,चार्ल्स डिक्सन,हेनरी डेव्हिड थोरो,ई.. आदी ऐतिहासिक आणि राजकीय प्रभावी विचारवंताशी करीत जागतिक व्यासपीठावर इतिहासाच स्पष्ट आणि रोखठोक विश्लेषण करून भावी पिढीला एक नवी दिशा देणारं कर्तृत्व म्हणजे 'डॉ. युव्हाल नोआ हरारी.'
आपल्या दीर्घ चिंतन, लेखन आणि संशोधनातून मानवी जीवनाला भूतकाळातून वर्तमानांत व पुढे भविष्यकाळात असलेल्या मानवी समाजाचं वर्तन ,त्याची जडण घडण आणि व्यवहार यांवरून इतिहास निर्मिती होतांना न्यायी बाजू,भौतिक संकल्पना-विकास त्याचा होणारा दुरागामी परिणाम , इतिहास आणि जीवविज्ञान यांच्या परस्पर संबंधातून इतिहासात तार्किक न्याय शक्य झाल्यास मानवी जीवन अधिकाधिक सुखी होईल तसेच आदिम साम्यवाद , सरजांमशाही,हुकूमशाही, समाजवाद,लोकशाही, प्रगत तंत्रज्ञानावार आधारित एकाधीरशाही, प्रखर राष्ट्रवाद, धार्मिक दांभिकतेतून निर्माण झालेल्या प्रादेशिक अस्मित्यांचे संकोचीत राजकारण या सर्वांच्या पुढे निधर्मी लोकांचा प्रगत आणि स्पर्धात्मक तंत्रज्ञान युक्त नवं उदारमतवाद कसा निर्माण होईल ई.. व्यापक प्रश्नांची विस्तृतपणे आणि तर्कशुद्ध मांडणी करून येणाऱ्या काळात मानवी जीवनाला एक नवी दिशा देण्याचं सूतोवाच ह्या पुस्तकांतून त्यांनी केलंय..
आजच्या काळात प्रत्येक महाविद्यालयीन विद्यार्थी , शिक्षक, राजकारणी नेते, नवं-लेखक, नवं-उद्योजक, पत्रकार, संपादक, समीक्षक,तज्ञ, धोरणकर्ते, अभ्यासक,ज्यांना भविष्यकालीन दीर्घ योजना आखायच्या आहेत ई.. नी ह्या पुस्तकाचा निश्चित अभ्यास करावा व त्यांतून मानवी गरजा, भविष्य दृष्टी ह्यातून आपल्या विचारांना दिशा घेत सकारत्मक उर्जेतून भावी समाजाची रचनात्मक बांधणीसाठी आप-आपला मोलाचा वाटा सिद्ध करावा असं मला वाटतं..
समाजविज्ञान शास्त्राच्या क्षेत्रांत विपुल लेखन आणि अभ्यास- संशोधन करणाऱ्या भारतीय उपखंडातील लेखकांपेक्षा मध्यपूर्व आशियात धगधगत्या प्रचंड धार्मिक आणि नागरी युद्धाच्या रणभूमीत युव्हाल नोहा हरारी आपलं प्राच्य विद्ववतेच्या लौकिकतेने जागतिक पातळीवर विविध माध्यमांवर तंत्रस्नेही तरुणांना इतिहासातून प्रेरणा घेत मानवी जगण्याचं भावी भविष्याचा वेध घेत त्यांच्या अस्तित्वाच्या संघर्षाला एक नवं-प्रभावी आकार देत धर्म-जात,वंश,मानसिक, आर्थिक, सामाजिक, वैचारिक गुलामगिरीतून मुक्त करण्याचं मार्ग दाखवीत ह्या सर्व सीमा रेषा, सर्वच भेदांच्या पलीकडे विवेकबुद्धी जागृत करून अखिल मानवजातीला एक नवा आकार देण्याचा आव्हान देणारं दिसतंय..
केवळ पुस्तकातूनचं सर्व सामाजिक आणि ज्ञान-विज्ञानाच्या प्रश्नाची उत्तरे अपेक्षित मिळाली असती तर आजच्या काळात जग 'बुकींश' झाल्यासारखं दिसलं असतं परंतु भूतकाळातील घडलेला जन-संघर्ष अस्तित्वाच्या पलीकडे आपलं कर्तृत्व -नेतृत्वातुन साकार झालेलं मूल्यही प्रतिपादित करतं ,कदाचित त्यांतून भिन्न-भिन्न स्थानिक लोक-संस्कृतीच्या संस्करणातून भविष्यकाळाचा एक आशावाद निर्माण होऊ शकतं..
सेपिअन्स पुस्तकांत एकूण चार भाग असून प्रत्येक भाग हा उत्क्रांतीच्या टप्प्यातून पुढे सरकत आप आपलं महत्व सिद्ध करतो..
पहिल्या भागात बोधात्मक क्रांतीच्या माध्यमातून मानवी उत्पत्तीचा कालखंड ,त्याची उत्क्रांत अवस्था ,ज्ञानप्राप्ती, विविध धर्म संकल्पनांच्या माध्यमांतून 'ईश्वरी' व्यवस्था , धार्मिक दंतकथा ,पुराकथा , आदम आणि ईव्ह ,विविध नैसर्गिक समस्या ,पूर ई.. आदी बाबीतून जुळवाजुळव करून नव नवं समाजनिंर्मिती बाबत प्रमाण विचार मांडलेला आहे.
दुसऱ्या भागात -विविध कृषीक्रांती,राजकीय क्रांती,इतिहासातील प्रदीर्घ संघर्ष , पिरॅमिडचं बांधकाम , युद्ध आणि लढाईतून एकमेकांना न्याय देतांना झालेला अस्तित्व संघर्ष ई.. बाबतीचा रोचक इतिहास समोर येतो..
तिसऱ्या भागांत - माणसाचं एकीकरण करतांना ,इतिहासाची दिशा ,चलन-व्यवहार क्रांती , आप आपली प्रादेशिक अस्मिता जपत उदयास आलेली टास्मानियन ते बेबोलीयंन ,हमुराबी सहिंतेतून निर्माण झालेली बेबंद दैववादी साम्रज्यशाही ,धर्म-संकल्पना व त्यांतून निर्माण होणारे कालबाह्य कायदे ,आपलं प्रभुत्व प्रस्थापित करतांना त्यांच्यातील युद्ध-संघर्ष ई.. आदी बाबींशी निगडित साहसी वर्णन दिसतें.
चौथ्या भागात- अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशात जातांना विविध शोध , विज्ञान आणि साम्राज्य यांच्या हातमिळवणीतून निर्माण झालेला संघर्ष ,औद्योगिकरणातून निर्माण झालेली साम्रज्याशाही, यांतला प्रादेशिक संघर्ष ,औद्योगिकीकरणाचं बाळ बेबंद भांडवलशाही यांतून निर्माण होणाऱ्या दूरागामी संघर्ष ,उद्योग आणि निरंतर क्रांतीतून बोध घेत मानवी जीवन दिवसेंदिवस सुखी करत 'होमो सेपिअन्स' भविष्यात आपल्या विध्वंसाकडे कसा मार्गक्रमण करीत आहे,याचं सुंदर भाष्य प्रकट होते.
ह्या पुस्तकांतील प्रत्येक प्रकरणांची रोचक मांडणी करतांना प्रादेशिक प्रश्न समस्यांना गौण स्थान देतांना अखिल मानवजातींच्या उत्क्रांतीपासून ते आजतयागत संघर्ष आणि प्रगतीचं मुल्याकंन करतांना पाश्च्यात्यांच्या ज्ञान-जिज्ञासेला झुकतं माप दिलं आहे, आइन्स्टनवर खूप ठिकाणी उपरोधिक टीकाही प्रगलभ वाचकांचं लक्ष वेधतं,भारतीय परीपेक्षात जन संघर्षाच्या पलीकडे धार्मिक धांभिकतेचा ज्वलन्त प्रश्न मांडणारी ,मानवजातीच्या कल्याणासाठी असलेला शाश्वत विचार घेऊन चालणाऱ्या जागतिक नेतृत्वाबद्दल कुठेतरी शंका निर्माण करते.
ह्या पुस्तकाचं मनसोक्त वाचन आणि चिंतन करतांना इतिहास पुनर्जीवित होऊन आपल्या अस्तित्वासाठी प्रश्नचिन्ह निर्माण करतं..
सेपिअन्स-मानव जातीचा अनोखा इतिहास ; भूतकाळातून आपलं अस्तित्वाचा शोध घेण्यासाठी भावी जीवन अधिकाधिक समृद्ध करण्याच्या जिज्ञासेपोटी एकदा तरी हे पुस्तक अवश्य वाचावं..
पुस्तक समीक्षक आणि लेखन संपादन :
विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख,
🎓डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
https://www.vidhyarthimitra.com
Post a Comment