तुम्ही लोकशाहीचे चार स्तंभ ऐकले असतील, ज्यावर आपल्या देशाचे संविधान,आपली लोकशाही टिकून आहे.
अगदी त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातील कोणत्याही कामातील यश हे गुणवत्ता, बुध्दिमत्ता, प्रेरणा, विश्वास, श्रध्दा या पाच स्तंभांवर आधारित असते. ज्यामुळे तुम्ही आम्ही यश संपादन करु शकतो.
याचं विश्लेषण करायचंच झाल तर, असे पहा की माणूस यशस्वी कसा होतो? त्याच्या गुणांमुळे, माणूस गुणवान कसा होतो ? त्याच्या बुध्दिमत्तेमुळे, माणूस बुध्दिमान कसा होतो?
अभ्यास केल्यामुळे माणूस अभ्यास का करतो? त्याच्यात असलेल्या प्रेरणांमुळे, माणसांत प्रेरणा कुठून येतात? त्याच्या मनातल्या दृढ विश्वासातून, श्रध्देतून.
आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल, प्रगती करायची असेल, तर काही गोष्टींचा अंतर्भाव आपल्या व्यक्तिमत्वात करणं अनिवार्य आहे. मग कार्यक्षेत्र कोणतेही असू देत, उद्योग-व्यावसायिक, शैक्षणिक किंवा सामाजिक...
यशाच्या या पाच स्तंभांच्या आधारे तुम्ही तुमचे कोणत्याही कार्यक्षेत्रातले यशोशिखर सर करु शकता.
Post a Comment