प्रिय विद्यार्थी मित्रांनो;
भारतात दर तासाला किमान एक विद्यार्थी आत्महत्या करतो . . . दर वर्षी हि संख्या हजारोंच्या घरात असते . . . 60 टक्के इंजिनिअर्स हे बेरोजगार आहेत . . . तर त्यातील केवळ 7 टक्के ग्रॅज्युएट्सकडे नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक स्किल्स असतात.
या सगळ्या मागचं महत्वाचं कारण म्हणजे चुकीच्या करिअर ऑप्शनची केलेली निवड...!
आज बदलत्या अत्याधुनिक आणि सुसज्ज टेक्नॉलॉजीमुळे करिअर्सच्या उत्तम संधी असतानादेखील, विद्यार्थी आणि त्यांचे पालक, हे करिअरचा पर्याय निवडताना अनेक चुकीच्या मापदंडाचा वापर करत “एखादं” करिअर निवडतात आणि मग विद्यार्थ्यांची शिक्षण पूर्ण करण्यापासून नोकरी मिळवण्यापर्यंत सगळीकडे घुसमट होते.
योग्य करिअर नेमकं निवडायचं कसं, या लाखो विदयार्थी आणि त्यांच्या पालकांच्या मनातील प्रश्नाला योग्य मार्गदर्शन मिळावं यासाठी डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम फाउंडेशन विद्यार्थी मित्र परिवारातर्फे दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी हा ऑनलाईन करिअर लेखमाला आणि समुपदेशन कार्यक्रम सुरु केला आहे.
करिअर निवडताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत आणि विविध पर्यायांचा विचार कशा प्रकारे केला पाहिजे यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तर तुम्हाला ह्या लेख मालिकेच्या माध्यमातून मिळतील असा विश्वास बाळगतो..
करिअर समुपदेशन आणि लेखमाला हा शैक्षणिक उपक्रम विद्यार्थी आणि पालक यांना करिअरची निवड करताना दोघानांही एकमेकांशी योग्यरीत्या सुसंवाद करण्याचे उत्तम कार्य करेल यात शंकाच नाही...!
विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन आणि समुपदेशन लेखमाला तसेच समुपदेशन ..
ह्या आणि अशा साऱ्या प्रश्नांवर...!🤔
करिअर मार्गदर्शन समुपदेशन लेखमालिकेत ..!
🎓अधिक माहितीसाठी संपर्क:
Post a Comment