पुस्तक समीक्षा: 21 Lessons for the 21st Century....21 व्या शतकासाठी 21 धडे
-लेखक: युवाल नोहा हरारी..
आपण कल्पित-कथा रचल्या
आपल्या प्रजातींनी एकत्र यावं यासाठी
आपण निसर्गाचं दमन केलं
स्वतःला शक्तिशाली होण्यासाठी
आता आपण जीवनाची पुनर्रचना करत आहोत
आपल्या अति रानटी इच्छांच्या पूर्ततेसाठी
पण आपण याहून अधिक
स्वतः ला ओळखलं आहे का ?
आपण लावलेले शोध आपल्यालाच असंबंध ठरवणार आहेत ?
मती गुंग करून टाकणाऱ्या आजच्या युगात माणूस म्हणजे नेमकं काय ,
याचा केलेला उलगडा म्हणजे एकविसाव्या शतकासाठी 21 धडे हे सुंदर पुस्तक...!
स्नेही मित्रांनो नमस्कार...
लॉकडाऊन काळात आम्हा सारख्या अनेक बुद्धिजीवी माणसांना वैचारिक खाद्य पुरवणार्या अनेक पुस्तकांचा परिचय आणि अभ्यास सहवास लाभला, या निमित्ताने काही ठराविक पुस्तकांच्या पलीकडे जागतिक पातळीवर साहित्य मानव संस्कृती, इतिहास ,समाजकारण ,राजकारण इत्यादी क्षेत्राशी संबंधित अनुकूल आणि प्रतिकुल बदल मानवाच्या भावी जडणघडणीत सातत्याने होत असतात.
विद्यमान अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या जलद प्रचार आणि प्रसारांमुळे मानवी जीवनात खूप सारे तांत्रिक, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक ,सांस्कृतिक, राजकीय, प्रादेशिक आणि इतर सर्व बदल आणि नवे प्रश्न निर्माण होऊ घातल्यामुळे वेळीचं त्या सर्वांचा परिचय आणि अभ्यास झाला तर येणाऱ्या दशकात मानवी जीवन अधिकाधिक सुकर आणि सुलभ होईल असं मला वाटतं.
सर्व बदलांची अनुकूलता साधून सर्वतोपरी प्रगती आणि विकासाच्या दृष्टीने मानवी पाऊल पुढे जात आहे.
या सर्वांशी जुळवून घेतांना मानवी क्षमता व त्यांच्या समोरील आव्हानां सामोरे जातांना काही कौशल्य आणि श्रम विकसित करण्याचा सुंदर परिपाठ आणि शाश्वत भाष्य इस्राईल येथील हिब्रू विद्यापीठातील जग प्रसिद्ध इतिहासकार आणि व्याख्याते युवाल नोहा हरारी या प्राध्यापकाने आपल्या लेखनातून भविष्याचा वेध घेताना आपणासमोर एकविसाव्या शतकातील 21 धडे या पुस्तकातून मांडला आहे.
त्यांनी लेखन आणि संपादन केलेली या अगोदर 'सेपियंस', 'होमो डेस' सह सर्वच पुस्तके भूतकाळातून वर्तमानात व भविष्याकडे वेध घेणारी बेस्टसेलर जागतिक दर्जाचे उच्च मानांकित साहित्य म्हणून विशेष ख्याती प्राप्त केले आहे.
माझ्या वाचनात आलेली ही इंग्रजी आवृत्ती आहे त्याचं सर्वप्रथम मराठीत समीक्षा आपल्या समोर ठेवतांना आजच्या काळात विद्यार्थी, शिक्षक, पालक ,राजकारणी नेते, सामाजिक कार्यकर्ते, डाव्या आणि उजव्या विचारसरणीचे कट्टर पुरस्कर्ते,सोशल मीडियावर एकमेकांना तज्ञ स्वरूपातील सूचनावजा सल्ले देणारे महाभाग , या सर्वांसाठी येणाऱ्या काळातील भाष्यनुसार आपलं वर्तन आणि विचार ठेवून प्रगल्भ आणि शाश्वत समाजनिर्मिती आणि शास्वत-वैश्विक विकासाठी ही सर्व कौशल्य आणि क्षमतांची आवश्यकता सर्वांनाच असेल असा मला विश्वास वाटतो.
ह्या पुस्तकात 21 महत्वाचे धडे एकूण 5 विभागात मांडणी करतांना तंत्रज्ञानामुळे भविष्यातील रोजगार संधी व त्यांतून निर्माण होणारे प्रश्न आणि त्याची उत्तरे, राजकीय आव्हानात-प्रखर राष्ट्रवाद,नागरी समस्या, धर्म-जातीतील स्थितंतरे,नागरी स्थलांतरांचा प्रश्न,ई.दहशतवाद,जागतिक युद्धे, मानवता, देव-संकल्पनेचे अस्तिव, न्याय, शिक्षण, सोशल मीडिया मुळे मानवी जीवनातील बदल, व्यक्ती आणि समाज यामधील विकास आणि बदल इ. मुळे भावी मानवी जीवन चक्र बदलताना आत्मसात करायची कौशल्य आणि क्षमता या संदर्भात सुंदर मार्गदर्शन आणि विवेचन दिलं आहे..
हे पुस्तक प्रत्येकांनी वाचायला हवं, येणाऱ्या सहस्त्रकांमध्ये आपलं जग कसं असेल?
माणसाची विचारपध्दती, त्याचं वर्तन, आणि त्याची बलस्थानं आणि त्याचा भविष्यकाळ यांबद्दलच्या आपल्या सगळ्या समजुतींना आव्हान देणारं विचारप्रवर्तक पुस्तक आहे..
अणूयुद्ध पर्यावरणाशी संबंधित संकटाने उलथापालथ घडवणारा तंत्रज्ञान यापासून आपण आपलं संरक्षण कसे करणार आहोत?
खोट्या बातम्यांची साथ किंवा दहशतवाद्यांचा धोका यांचं आपण काय करणार आहोत?
आपण आपल्या मुलांना काय शिकणार आहोत ?
युवाल नोआ हरारी आपल्या पुढील तातडीच्या समस्यांची थरारक सफर आपल्याला ह्या पुस्तकातुन घडवतात.
आपल्याला सातत्याने गोंधळात टाकणाऱ्या बदलाला सामोरे जाताना व्यक्तीश: आणि सामूहिकपणे आपले लक्ष केंद्रित करणं हेच एक आव्हान आहे..!
हे आव्हानच या नव्या अल्हाददायी पुस्तकांची गुंफण करणारा सोनेरी धागा आहे..
आपण निर्माण केलेल्या जग जाणून घेण्यासाठी आपण खरंच सक्षम आहोत का ?
समिक्षक : विद्यार्थी मित्र प्रा. रफीक शेख
Post a Comment