माणूस म्हणून जगायचयं..... ,
जगाला जगा आणि जगवू द्या हे सांगायचयं..
जात ,धर्म , लिंग,वंश ,वर्ण ,प्रांत ,भाषा या
सर्व भेदांच्या पलीकडे
वैश्विक कल्याणांचा विचार मांडायचा आहे..
माणूस म्हणून जगायचयं..... ,
मानवतेचं मुल्य जपायचयं... !
जगाला जगा आणि जगवू द्या हे सांगायचयं..
इतिहासातून बोध घेत ,
द्वेषाची भिंत चिरून ,
समता, स्वातंत्र्य आणि बंधुता
याचं बीज रोपण करून,
जगण्याचं सूत्र विस्तारायचंय...
माणूस म्हणून जगायचयं.....!
झालं ते गेलं ,त्यांतून शिकवूया
मानव जात पुढे नेऊया ...
माणूस म्हणून जगायचयं...,
जगाला जगा आणि जगु द्या हे गुपीत सांगायचयं..
डावा ,उजवा ,जहाल ,मवाळ,ढोंगी,दलाल ,मलाल
ह्या खेळात न अडकता आणि न भडकता
उपेक्षित ,शोषित,दुर्लक्षित,वंचित ,अन्यायी,गरीब आणि कष्टकऱ्यांच्या उत्थानाला धावायचयं..
त्यांचं मर्म जाणून त्यांच्या संघर्षाला आणि जगण्याला अर्थ द्यायचयं ..
माणूस म्हणून जगायचयं..... ,
जगाला जगा आणि जगवू द्या हे सांगायचयं..
महापुरुषांच्या संघर्षातून प्रेरणा घेत ,
मानवी जीवनाला सुंदर आकार देत ,
जगणं सोयीस्कर आणि सुलभ करायचंय ...
मानवतेचे मानवी मूल्य जपत ,
माणूस म्हणून जगायचयं...,
आता थांबायचं नाही ,
भेटेल त्याला मानवी जगण्याचं .,
रहस्य सांगून त्याला प्रेरित करायचयं ,
जगायचंय , लढायचयं ,संघर्ष करीत
माणुसकीला मानवतेला जागवयाचयं
जन्मस्थान -पृथ्वी, वंश-मानवजात,
पक्ष-स्वातंत्र,धर्म-प्रेम ,
मानून सत्याची आणि मानवतेची कास धरत
पुढे जायचयं...
मानवी मूल्यांना जपायचयं... !
माणूस म्हणून जगायचयं..... ,
माणूस म्हणून जगायचयं..... ,
#विद्यार्थी मित्र प्रा. रफीक शेख ,
©सर्व हक्क सुरक्षित..
+919822624178
Post a Comment