गुनहगार हूं... तेरा मैं ऐ जिंदगी...!
खुद ही को खुद से....
वाहकिफ़ किये...अरसा बीत गया...!
कुठे व्यक्त व्हायचं आणि कधी समजून घ्यायचं...
हे कळलं तर आयुष्य 'भावगीत' आहे....
किती ताणायचं आणि कधी नमतं घ्यायचं....
हे उमजलं तर आयुष्य 'निसर्ग' आहे...
किती आठवायचं आणि काय विसरायचं...
हे जाणलं तर आयुष्य 'इंद्रधनू' आहे...
किती रुसायचं आणि केव्हा हसायचं....
हे ओळखलं तर आयुष्य 'तारांगण' आहे...
कसं सतर्क रहायचं आणि कुठे समर्पित व्हायचं....!
हे जाणवलं तर आयुष्य ' नंदनवन' आहे....
कुठे ? कधी ? किती ? काय ? केव्हा ? कसं ?
याचा समतोल साधता आला तर...,आयुष्य खूप सुंदर आहे..!
म्हणून म्हणतो मित्रांनो..
आयुष्य एकचं आहे जगणं विसरू नका म्हणजे झालं..!🌹
#From Creative Zone..!
Post a Comment