भारतीय सिनेश्रुष्टी सो कॉल्ड 'बॉलिवूड'ला भारतीय समाज चित्रणाचा एक प्रतिबिंब-आरसा मानलं जातं, पण गेल्या दशकापासून उजव्या विचारसरणी कडे झुकलेला ह्या चित्रपट ट्रेंडला 'जयभीम' नंतर 'झुंड' हा खऱ्या अर्थाने डावा ठरत आता खऱ्या अर्थाने चित्रपटाचा विषय सामाजिक संवेदनशीलतेंच प्रगल्भ भान ठेऊन वंचित, शोषित आणि अन्यायी-गरीब सर्वहारा वर्गाचा सर्वोतोपरी संघर्ष चित्रण करणारा एक नवं क्षितिज बहुजनांच्या समोर येतंय ही उल्लेखनिय बाब मनाला स्पर्श करून जाते..
नागराज मंजुळे ह्यांनी प्रस्थापित चित्रपटाच्या सर्वं विषयांना खो देत नेहमी प्रमाणे भारतीय चित्रपटाला इथून पुढे सामाजिक विषयांनाचं प्राधान्य क्रम देत चित्रपट निर्मिती होणं का आवश्यकचं आहे हे आपल्या दर्जेदार सिने कृतीतुन सिद्ध करत एक नवा आदर्श निर्माण केलंय असं मला वाटतं..
जगाच्या अनादी काळापासून ते आजतागायत कुठं ना कुठं शोषण होतंच आहे,फक्त स्थल-काळ परत्वे त्याच स्वरूप वेगळं असू शकतं, प्रस्थापित उच्चभ्रू समाजाकडून स्वतःच्या व्यक्ती केंद्रित हितांसाठी समाजाची वर्गवारी जात-पात आणि कामावरून करीत त्यांचं पिढ्यानपिढ्या धार्मिक- आर्थिक-मानसिक-सामाजिक शोषण करीत त्यांच्या वर आपलं अधिकार लादून त्यांना अपंग करण्याचं काम येन केन प्रकारे आजही गेल्या हजारो वर्षांपासून आव्ह्यात पणे चालू आहे..ह्या अन्यायामुळे खुप ठिकाणी सामाजिक प्रश्न उभे राहून 'माणसाला माणूस' म्हणून जगण्याचे सर्व हक्क हिरावून घेतल्यानं ह्या जगातुन न संपणारा सामाजिक संघर्ष उभा राहतो..
जागतिक पातळीवर ह्या अन्याय-शोषणाला विरोध करणाऱ्याला सामाजिक संघर्षाची खरी प्रेरणा मार्क्स, फुले, चे-ग्वेरा,डॉ. बाबासाहेब आंबेडकरचं देऊ शकतात हे निर्विवाद सत्य..
'झुंड' हा चित्रपट पाहतांना त्यातला आशय इथल्या समाज व्यवस्थेला एक चपराक देऊन सर्वसामान्यांच्या जीवन-संघर्षाचं संवेदनशील चित्रण इथल्या नवं-अभिजनांना आपलं सामाजिक-भान आणि कर्तव्याची आठवण करून देतोय,ओलीस धरलेल्या आणि भ्रष्ट्राचाराने बरबटलेल्या लोकशाही-समाज व्यवस्थेने सर्वं सामान्यांचं जगणं ही किती अवघड केलंय हे छोट्या छोट्या दृश्यानं लक्ष वेधलं..
निसर्ग दत्त गुण-संपन्न गुणवत्ता ही कधीच विशिष्ट वर्गाची मक्तेदारी असूचं शकत नाही, ती कुठं ही जन्म घेऊ शकते, फक्त तिची योग्य ओळख करून त्याला प्लॅटफॉर्म मिळवण्यासाठी 'विजय बोराडे' सर सारखे संवेदनशील शिक्षक-गुरू आवश्यक असतात.. पण ही व्यवस्था त्यांना तिथं पर्यंत जाऊ देत नाही हे दुर्दैव..
माझ्या सारखा एका संवेदनशील शिक्षक जो शैक्षणिक-सामाजिक कार्य क्षेत्रात कार्य करतांना मलाही खूप सारे असे अनुभव आले पण मी त्यांना सलाम करीत पुढे मार्गक्रमण करीत आहे ह्याचा मला आनंद आहे, सामाजिक विषयावर बेतलेले अनेक चित्रपट मला नेहमीच पथ-प्रदर्शित आणि मार्गदर्शक राहिले आहेत हे मी इथं आवर्जून नमूद करतो मित्रांनो..
आशा करूया की भारतीय सिने-जगत आपली कात टाकत दिवसेंदिवस अत्याधुनिक नवं-तंत्रज्ञान स्विकारत दाक्षिणात्य चित्रपटाकडून काही नवे धडे घेत नव्या प्रादेशिक विषयांना प्राधान्यक्रम देऊन साचेबंद विषयाना खो देत आपल्या खोपडीतुन झापड उघडत सामाजिक विषय आशयांना चित्रण करीत इथला खरा समाज वास्तव रुपेरी पडद्यावर आणू शकेल ज्यानं वंचितांच, उपेक्षितांचं, शोषितांच्या, अन्यायी, गरिबांच्या जगण्याला एक नवी ऊर्जा देऊन त्यांना दिशा देऊ शकेल..
'झुंड' चित्रपट सर्वार्थाने आपलं वेगळं पण जपत सर्वांना संघर्ष करण्याची प्रेरणा देऊन जातं.. ह्या अस्सल चित्रपट संकल्पनेला क्रांतिकारक सलाम..
जयभीम..! जय संविधान..!!
©विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी..
खर तर एका comment मध्ये याच उत्तर नाहीये. पण तरीही नागराज मंजुळे यांना त्यांचा कार्याला सलाम....आणि आमचे रफिक सर यांना सुद्धा त्यांचा लेखा बद्दल धन्यवाद देतो...
धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल..
Post a Comment