वाचणं हे पेरणं असतं..तर लिहिणं म्हणजे उगवणं,
उगवण्याची चिंता करीत..बसण्यापेक्षा पेरणी सुरू करा,
एक दिवस तुमचं उगवलेलं धान्य..लोक पेरणीसाठी घेऊन जातील...
पुस्तकांच्या सहवासात शांत आयुष्य वेचण्यासारखा दुसरा आनंद नाही.”
डोळ्यांनी दिसतं आहे तो पर्यत वाचत राहायचं,जे वाक्य समजलं नाही तो परत वाचायचं,वाचलेलं अक्षरशः जगायचं,पुस्तकातील पात्राला स्वतःशीच रिलेट करायचं, जणू तो पात्र आपणच आहोत,पुस्तकातील सुखा दुःखाच्या प्रसंगात आपण सुद्धा सहभागी व्हायचं.
पुस्तक वाचणे म्हणजे एका भन्नाट अफलातून प्रवासाला जाणे होय त्यामुळे आपण ज्याप्रकारे एखाद्या प्रवासात इतर ठिकाणाचा अनुभव घेतो तसंच अनुभव पुस्तकात घेत राहायचं.
ज्याकाळातील आपण पुस्तक वाचतोय मनाने त्या काळात जाऊन यायचं जणू आपण त्याकाळात वावरतोय अशी भावना मनात आणायची.आपल्या कल्पनेने पुस्तकातील तो विश्व आपल्या आजूबाजूला निर्माण करायचं,पुस्तक वाचत असताना पूर्णपणे त्यामध्ये हरवून जायचं,आजूबाजूचं भान विसरून वाचत राहायचं.वाचताना कोणताही पूर्वग्रह मनात ठेवायचं नाही त्या पुस्तकातून जास्तीत जास्त चांगलं काय घेता येईल हे बघायचं.
वाचन झाल्यानंतर त्यावर विचार करायचं, आपण वाचलेलं इतरांना सांगायचं,समाजाशी रिलेट करायचं आणि वाचलेलं,समजलेलं ते ते समाजात शोधायचं प्रयत्न करायचं.
“पुस्तके ही काळाच्या विशाल सागरातून आपणास घेऊन जाणारी जहाजे होत.”
याप्रकारे वाचन मी करत असतो तुम्ही सुद्धा एकदा करून बघा वाचनाचा जबरदस्त आनंद येईल...
#वाचत_रहा...
#काळजी_घ्या ...
#सुरक्षित रहा...
📚 एक पुस्तक प्रेमी आणि वाचक:
#विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
Post a Comment