येत्या काळात तंत्रज्ञान हे शिक्षकांना पर्याय होईल अशी मांडणी काही विचारवंत करत आहेत...!
👉पण शिक्षण म्हणजे आत्मसात करणे, समजून घेणे,कृती करून बघने पडताळून बघणे,चिकित्सेअंती निर्णय घ्यायला शिकणं, आस्वाद घेणे, भावनिक-मानसिक समायोजन करणे, शेअरिंग करणं.... (ही यादी आणखी वाढवता येईल )
ह्या गोष्टी शिकवण्यात शिकण्याच्या प्रक्रियेचा तितक्याच पूरक देखील असतात. काही व्यक्तींना वाटतं स्मार्ट क्लास किंवा व्हर्च्युअल क्लासरूम द्वारे शिक्षण शक्य आहे त्यात हा सगळ्यात जिवंतपना असणार आहे का..?
👉प्रत्येक मुलांची शिकण्याची गती आणि पद्धत वेगळी असते ती समजून घेताना तंत्रज्ञान पुरे पडणार आहे का ?
हा प्रश्न उरतोच.
👉 शिक्षकांचा वैयक्तिक संवाद, कौतुक, समजून घेणे, इतर मुलांकडून प्रेरणा मिळणे, अशा अनेक गोष्टींचा उपयोग झालेला असतो. शाळेतआणि क्लासेस मदे सगळच गुडीगुडी घडत असही नाही कधी कधी चुकून उपेक्षा वाट्याला येते मुलांची भांडण, रुसवेफुगवे होतात या ही गोष्टी असतात, ज्या सामाजिक वातावरणाची चुणूक मुलांना दाखवतात. त्यायोगे भावनिक समायोजन करण्याची मुलांची तयारी होत असते.
👉इतके वैविध्यपूर्ण Interaction#Common Problems Faced By Students In e-Learning व्हर्च्युअल वातावरणात किंवा तथाकथित संपूर्ण तंत्रस्नेही पद्धतीने शक्य होईल का? तुम्हाला काय वाटतं...?
असो जे मला वाटतं ते मी व्यक्त केलं..
-आपलाच
विद्यार्थी मित्र प्रा. रफीक शेख,
Post a Comment