प्राच्यविद्या पंडीत कॉम्रेड शरद पाटलांच्या सौत्रांतिक मार्क्सवादी तत्वज्ञानावर आधारित सामाजिक क्रांती करणाऱ्या 'मानव मुक्ती मिशन' परिवाराचे सदस्य आणि पुरोगामी साहित्याचा अभ्यास करणारे, मंठा तालुक्यात शेती करणारे सर्वं सामान्य शेतकरी आणि आमचे स्नेहीं मित्र मा. भगवान शिंदे ह्यांनी सर्वहाराचा मुक्तीदाता- मलिक अंबर हें ऐतिहासिक चरित्र पुस्तक संपादन केले आहे..
मागे एका सदिच्छा भेटीत आमचे मार्गदर्शक मित्र मा. नितीन सावंत सरांनी मला हें पुस्तक भेट दिलं.
सध्या मे महिन्याचा शेवटचा आठवडा प्रचंड उकाडा असल्याने घरातच वाचनांचा मनसोक्त आनंद घेतोय मित्रांनो..
माननीय विराज कुंदा फुला ( सौत्रांतिक मार्क्सवादी अभ्यासक, पुणे ) यांची लक्ष वेधी प्रस्तावनाचं कोणत्याही वाचकाला हें पुस्तक वाचायला भाग तर पाडतेच.. पण ऐतिहासिक संदर्भात भूतकाळातल्या नोंदीत वर्तमानाला प्रभावीत करुन भविष्याला हेरते..
आफ्रिकन देश इथियोंपिया (अबस्सीनिया) इथल्या ओरोमा ( ओरोमा म्हणजे : Free Born People - मुक्तछंदी, स्वतंत्र ) हबसी जमातीत जन्मलेला एक तरुण त्याचे नाव 'चापू'..
तिथल्या युद्धजन्य आणि नरक यातना असलेल्या परिस्थितीत आपली मुलं बाळे तरी ह्यातून मुक्त व्हावी म्हणून मुलांना गुलाम म्हणून विकल्या जाणाऱ्या देशात मलिक अंबरचा जन्म सन 1548 चा..पण तो मध्य आशियाई देशांत गुलाम म्हणून विकला गेला.
इराकचीं राजधानी बगदाद येथील मिर कासिम अल-बगदादी यांच्या हातात येमेन येथें 80 डच गिल्डरला ( 38 यूरो डॉलर ) खरेदी केल्यानंतर त्यांनी त्याला इस्लाम धर्माची दिक्षा देऊन, युद्धजन्य कौशल्यांत निपुणता, व्यवहार कौशल्य, युद्धनीती, राज्यकारभार, शेती आणि व्यवसाय प्रशिक्षण देऊन चापूला 'अंबर' ही ओळख दिली..
भारतात दक्षिणेत अहमदनगरच्या निजामशाहीच्या सुलतानचा प्रधान चंगेजखानच्या सेवेत तो रुजू झाला.. चंगेजखान नें त्याच्या शासन, प्रशासन, रयत आणि शेतसारा वसुल करण्याच्या नव्या पद्धती.. ई.. आदी गुणांमुळे तो निजामशाहीचा निष्ठावंत बनला.. गोवळकोंडा आणि विजापूरच्या सुलतानांसाठी आपलं युद्ध-कौशल्य पणाला लावल्याने विजापूर दरबारीं त्याला 'मलिक' ही पदवी मिळाली.. आता तो मलिक अंबर झाला..
निजामशाही मोगलांच्या अधीपत्याखाली येताना कुमकुवत बनलेली असताना त्याला नवं जीवनदान देत.. त्याला प्रभावशाली नेतृत्व प्रदान करणारा हा मलिक अंबर दिल्लीत असलेल्या बलाढ्या अकबरालाही अस्वस्थ करुन सोडतोय..
प्रशिक्षित घोडदौड, युद्ध सुसज्जीत सैन्यदळ 'गुरीला वार' ह्या नव्या युद्धनितीचा वापर करत 'निजामशाहिला' अभेद्य करीत मुघलांना दक्षिणेत पायही रोऊ देत नाहीं..
महाराष्ट्राच्या राजकीय आणि भौगोलिक जडण-घडणीत मलिक अंबरचं योगदान खुप महत्वपूर्ण मानलं जातं.. आदिलशाही आणि निजामशाहीत वावरताना त्याने केलेला ह्या मातीचा आणि मराठी माणसाचा अभ्यास, सर्वंसामान्य जनताभिमुख केलेली नवीन महसूल कर पद्धत, जमीन धारणा, नवीन खडकी शहराची निर्मिती (आताच औरंगाबाद ), अजिंक्य जंजिरा किल्याची निर्मिती, सुफी ज्ञान परंपरा, कला, साहित्य, शिक्षण, युद्ध प्रशिक्षण कला, निजामशाहीचा मुख्य वजीर तें अनेक शहराचा शिल्पकार, वास्तू शास्त्री, युद्ध शास्त्री, नहर निर्माता, जलतज्ज्ञ, सर्वंधर्म समभाव मानून व्यक्तीगुणांना महत्व देणारा ई.. आदी बाबी आणि मराठ्यांना एकत्रित करुन त्यांच्यात स्वातंत्र्याची ऊर्जा देऊन त्यांना दरबारीं आपलं स्थान देऊन त्यांना आपलंस करणारं दूरदृष्टी नेतृत्व..
वेरूळच्या भोसले राजे घराण्यांशी असलेली आपली घनिष्ठ मैत्री आणि सिंधखेडचे लखोजीं जाधव यांच्यात रोटी-बेटी नातं निर्माण करण्यात आपलं सिहाचा वाटा देतं 'स्वराज्य' निर्मितीचं स्फूरण देऊन आपली ऐतिहासिक सिद्धता देणारं कर्तृत्व..ज्यानं मराठ्यानां गनिमी युद्धनीती शिकवली, आदिलशाही आणि निजामशाहीत सरदारकी आणि मणसबदारीं देऊन त्यांना नेतृत्व प्रदान करीत आपलंस केलं..
आजच्या परिवेशात मलिक अंबरचं योगदान दुर्लक्षित करुन कसं चालेल?
मलिक अंबर - सर्वहाराचा मुक्तीदाता.. हें पुस्तक सध्याच्या वैचारिक प्रवाहाला एक नवी दिशा देऊन जातं आणि इतिहासाला वैचारिक अधिष्ठान देतं..विराज कुंदा सरांनी प्रस्तावनेत उल्लेखीत केलेल्या 'कल्चर ऑफ सांयलेन्स'ला 'क्रिटीकल कॉन्शसनेस' कसा तोडतो हें पुस्तक वाचल्यावरचं कळेल मित्रांनो..
मला ह्या पुस्तकानं खुप प्रभावीत केलंय.. ह्या पुस्तकाने सामाजिक व आर्थिक सर्वहारा जातीच्या लोकांना एक नवं सामर्थ्य आणि वैचारिक बळ देण्याचं काम केलं आहे..
ह्या पुस्तकाच्या निर्मिती आणि प्रकाशन प्रक्रियेच्या वेदनेत 'मानव मुक्ती मिशन' परिवाराला ज्या दिव्यांना तोंड द्यावं लागली ह्याची मला पूर्ण कल्पना आहे..
जातवर्गस्त्रीदास्यांच्या मुक्ती लढ्यात मानव मुक्ती मिशन ही संघटना 'अब्राह्मणी बहूप्रवाही विधायक' साहित्य निर्मितीच्या संकल्पात महापुरुष, महामानव आणि ऐतिहासिक युग पुरुषांच्या चारित्र्य विचार संवर्धनाच्या माध्यमातून विवेकी आणि विज्ञाननिष्ठ विचारांतुन 'सामाजिक क्रांती ' नक्कीच साकारेल ह्यात शंकाचं नाहीं मित्रांनो..
धन्यवाद..🙏🏻
-एक सौत्रांतिक मार्क्सवादी अभ्यासक
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख..
https://www.vidhyarthimitra.com
📚पुस्तक खरेदीसाठी संपर्क :
Post a Comment