जपानमध्ये एक रेल्वेस्टेशन बंद करण्यात येणार होते..
तिथे फक्त एका प्रवाशासाठी एक अख्खी ट्रेन दिवसातुन दोन फेऱ्या मारत होती...आणि ती एकमेव प्रवासी होती...
एक शाळेत जाणारी मुलगी...!!!
कामी-शिराताकी हे स्टेशन जपान सरकार प्रवाशी नसल्यामुळे बंद करण्याच्या तयारीत होते.. पण अचानक त्यांच्या लक्षात आले की या स्टेशनवरुन रोज एक मुलगी शाळेत जाते... त्यामुळे प्रशासनाने शिक्षण पुर्ण होईपर्यंत स्टेशन आणि ट्रेन...
त्या एकट्या मुलीसाठी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला...रेल्वेने एकट्या प्रवास करण्याऱ्या मुलीला शाळेत जाण्यासाठी एक विशिष्ट वेळापत्रक जारी केले गेले. त्यानंतर एक अख्खी ट्रेन दररोज सकाळी आणि संध्याकाळी त्या एका मुलीसाठी धावत होती.
त्या मुलीचं शिक्षण पुर्ण झाल्यानंतरचं ट्रेन आणि रेल्वेस्टेशन बंद करण्यात आले...
ही आहे एका सरकारची देशाच्या नागरीकांप्रती असलेली वचनबद्धता....
देशातल्या लोकांना साक्षर बनवण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत तडजोड न करण्याची एकनिष्ठता...
त्यांच्या याच गोष्टींमुळे जापान आज जगातला सर्वात प्रगत देश आहे...
आणि आपल्या देशात बघा...
मुलांची संख्या २० पेक्षा कमी आहे म्हणुन शाळा विकायला निघालेत..
Post a Comment