'व्हर्टिकल विद्यापिठं' शिक्षण क्षेत्रातील अनियंत्रित भांडवलशाही महागडी शिक्षण व्यवस्था 'बहुजनांच्या लेकरांना' उच्च शिक्षणापासून कोसोदूर ढकलून त्यांचं भावी भविष्य अंधःकारमय करणारी खाजगी व्यवस्था दिवसेंदिवस त्यांना देशोधडीला लावणारीचं आहे..
आजमितीस भारतात शासकीय, निम्म-शासकीय, केंद्रीय, अभिमत, खाजगी, तांत्रिक, नवं-तांत्रिक, आधुनिक, एकल, स्वयं-अर्थशासित आणि प्रस्तावित असलेल्या UGC Recognized आणि DEC मान्यताप्राप्त असलेली 1158 + विद्यापिठं ( ugc approved universities : https://tinyurl.com/mw9d6r93) असताना हीं खाजगी 'व्हर्टिकल विद्यापिठं' चीं दुकानदारीं फक्त भांडवली नफा कमाविण्यासाठीचं कां?
ह्या खाजगी दुकानांची Permit Licenses फक्त उद्योजक, भ्रष्ट राजकारणी आणि शुद्ध व्यवसायिक नफ्यांवर आपलं अस्तित्व असणाऱ्या बांडगुळानां देऊन कोणतं शैक्षणिक-सामाजिक हितं जोपासली जाणार हें हीं प्रश्नाकींतचं..
'व्हर्टिकल विद्यापिठं' हें व्यवस्थेच्या ' शिक्षण गुणवत्तेवर ' सर्वात मोठं अपयश आहे..
भारतीयांच्या घटनात्मक शैक्षणिक-सामाजिक मूल्यांच्या सर्वोतोपरी विकासासाठी ' शिक्षणाच्या राष्ट्रीय करणाची' खरी गरज आहे असं मला वाटतं मित्रांनो..
#विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख,
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
Post a Comment