तुमच्या अहंकाराच्या बाॅम्ब वर्षावात जगणं उद्ध्वस्त झालेली ही लहानगी कुठे निघाली आहे? 😲
हे कसले कागद आहेत तिच्या हातात? काय कोरले आहे या कागदांवर? आणि ती लिपी नेमकी कोणती आहे?
या कागदांवर कुठे सापडेल का करुणेचा डाग...?😢
आता कुठे असतील हे कागद बनवणारे हात? जीवन मरणाच्या संघर्षातही नेमके काय सांभाळू पाहाते आहे ही मुलगी जिवापाड?
ऐकू येतो का तुम्हाला तिचा आकांत? आजूबाजूला सडलेल्या प्रेतांचे खच, आणि कानठळ्या बसवणारे कर्णकर्कश आवाज त्यातून वाट शोधत कुठे निघाली आहे ती..?😢
ती नव्हे माझ्या वंशाची, मुलखाची आणि धर्माचीही
तरीही प्रेमाची एकसमान भाषा आहे तिच्यात या कोलाहलातही..
या इतक्या दूरवर मला ऐकू येतोय तिचा आकांत
सुरु होण्याआधीच जगणे हरवलेला तिचा प्रवास...
आणि तरीही तिच्यासाठी काहीही करु शकत नाही माझा समाज जो 'विश्व-बंधुत्व' च्या पोकळ घोषणा आणि प्रचंड दैववादी समाज आजही 'पौरलौकिक' मिथ्यात स्वतःच्या धार्मिक अस्मितांच्या बेढीत अडकून स्वतःचं अस्तित्व संपवायला निघालायं..हे हीं त्याला कळेना..😲
थांबणार कां...! हे युद्ध तांडव..! जो हानी करतोय अखिल मानवतेची आणि त्याच्या चिरंतन मूल्यांची..!😫
क्रमश:
एक संवेदनशील माणूस..
#विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख,
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विध्यार्थी फाउंडेशन, परभणी.
#worldwar, #SavePalestineSaveHumanity, #savechildrenpalestine, #savepalestine
Post a Comment