प्रत्येकाच्या डिप्रेशनचे कारण अत्यंत वैयक्तिक असते. ज्याचं त्याला माहित असतं. प्रायव्हसी आणि सन्मान जपला पाहिजे. कोणाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल पुरेशी माहिती नसताना त्यावरही आपले मत असलेच पाहिजे असे काही गरजेचे नाही. साले आपण असे जिथे तिथे जज होऊन ज्याची त्याची अक्कल काढत असतो अन ते ही डिप्रेसिंग असते अनेकांसाठी...
जो माणूस जीव देतो, त्याला आधार पाहिजे असतो, सोल्युशन पाहिजे असते, मार्ग पाहिजे असतो, जे चालू आहे ते नको असते, सहन करण्याची क्षमता नसते, मन मजबूत नसते, काय करायचे ते कळत नसते, स्वत:च्या चुकामुळे हे भोगायला लागत आहे ह्याची जाणीव भयंकर खात असते, जरी आपली काही चूक नाही तरी सहन करावे लागते, खूप कारणे आहेत.
माणसाच्या मनात काय चालू आहे हे सांगणारे कोणतेही मशीन नाही.
कोणाशी तो बोलायला गेला तर शांतपणे ऐकून घेणारे कान नसतात. धीर देण्याच्या नावाखाली उपकार केल्याची भावना करणारे असतात, मन मोकळे करणे खूप कठीण असते.
तज्ञाकडे जा सांगणे सोपे असते, पण तशी काही आपल्याकडे सवय नाही. म्हणून म्हणतो कि आयुष्य खूप खडतर असते.
आहे तसे स्वीकारलेच पाहिजे. त्यासोबत हे सुद्धा लक्षात ठेवले पाहिजे कि प्रत्येक प्रश्नावर सोल्युशन मिळणार नाही.
पण ती सिच्युएशन टेम्पररी असू शकते. पोटभर अन्न आणि सुखाची झोप ह्याच्यापेक्षा जास्त महत्त्व जगात कोणालाही, कशालाही, कशाहीसाठी देऊ नये.
बाकी सगळ्या ह्या हरामी जगाने लादलेल्या अटी आहेत. आपलं जिवंत रहाणे आपल्यासाठी महत्त्वाचे असते. आयुष्याच्या खूप शक्यता असतात, असू शकतात.
मरणाची मात्र एकच असते. जीवन निवडा नेहमी.
जगाला फाट्यावर मारा..! मुक्त जागा, स्वच्छंद जागा..!
एवढं करूनही जर आलंच डिप्रेशन, तर बिनधास्त कॉल करा मला. मोकळं व्हा...!
एक माणूस, मित्र म्हणून नेहमी सोबत असेल तुमच्या...!
संकलन आणि संपादन:
विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख,
🎓डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
https://www.vidhyarthimitra.com
Post a Comment