आपली प्रगल्भता आपल्या आयुष्यात येणाऱ्या कोणत्याही अनुभवाच्या एक टप्पा खालीच असते. आयुष्यातल्या अनुभवांचा उद्देशच मुळी असतो आपल्याला प्रगल्भता प्रदान करणं, हा. पण प्रत्येक अनुभवाबरोबर आपल्या प्रगल्भतेची पातळीच फक्त वाढत नाही; तर आपल्यासमोरच्या आव्हानांची पातळीही उंचावत जाते. आयुष्याच्या विकासाचा वर्तुळाकृती जिना असा वरवर चढत जातो.
आपण कितीही ज्ञानवंत असलो किंवा आपण कितीही आयुष्य पाहिलं असलं किंवा आपल्या क्षेत्रात आपण सर्वोत्तम असलो - आपण अगदी आयुष्याचा ज्ञानकोष असलो - तरी त्याला महत्त्व नसतं.
कोणतातरी धक्का, कुठलातरी उतार, कोणतीतरी ठेच... वळणावर कायम उभी असतात. चालू असलेला ओघ, आयुष्य अकस्मात अडवतं. ठीकठाक चाललेली लय बिघडवतं.
मात्र लक्षात ठेवा – विकासाच्या मानदंडावर, दहाव्या इयत्तेत नापास होणं हे आठव्या इयत्तेत पास होण्यापेक्षा उच्च श्रेणीचंच गणलं जातं.
एखादी स्थानिक टेकडी सर करण्यापेक्षा माऊंट एव्हरेस्टवरचा थोडक्यात हुकलेला विजय केव्हाही श्रेष्ठ मानला जाईल. प्रगल्भता जितकी जास्त, तितकं समोरचं आव्हान अधिक मोठं! अशा तऱ्हेनं आयुष्य तुम्हाला घडवत जातं.
दोन पावलं पुढे तर एक पाऊल मागं, असा आयुष्याचा प्रवास नसतो. असं फक्त तेव्हाच घडू शकतं जेव्हा माणूस त्याचं आयुष्य जाणीवपूर्वक जगत नाही किंवा अनुभवातून काहीच शिकत नाही.
ज्या माणसाला त्याची जागरूक संज्ञा प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकण्यासाठी प्रवृत्त करते, तो ट्रेम्पोलिन (ताणून बसवलेला स्प्रिंगसारखा पट) वर असल्याप्रमाणे जगतो. तो पडण्यासाठी उशी घेतो आणि उशी घेण्यासाठी पडतो, पण प्रत्येक आपटीसरशी त्याची उशी उंच उंच होत जाते. त्याची प्रगल्भता आणि त्याच्यासमोर ठाकणारी आव्हानं दोन्ही अधिकाधिक वाढत जातात.
तुमच्या यशाचं कारण काय? – ‘चांगले निर्णय’. चांगले निर्णय तुम्ही कशामुळे घेऊ शकता? - ‘जीवनातले अनुभव’. आयुष्यात तुम्ही अनुभवांची प्राप्ती कशाच्या द्वारे करू शकता? – ‘वाईट निर्णय’. आयुष्यातल्या अनुभवांच्या ट्रॅम्पोलिनवर उशा घेत मी प्रत्येक अनुभवातून वाढत राहातो.
प्रत्येक अनुभव मला काय हवं ते तरी देतो, किंवा मला हवं ते का मिळालं नाही, याचं ज्ञान तरी देतो.
ह्यापुढे एखादं अपयश तुम्हाला अंतर्यामी ढवळून गेलं तर फक्त लक्षात ठेवा - आयुष्यानं अनुभवाचा वेष घेतलेला एक गुरु तुमच्यासाठी पाठवलेला आहे. तो तुमच्या प्रगल्भतेत भर घालणार आहे.
तुमची सजगता त्या अनुभवातून तुम्हाला प्रगल्भ होण्यासाठीच फक्त साह्य करील असं नाही, तर तुम्हाला अंतर्यामीचा तोल सावरण्यासाठीही मदत करील.
अधिक मोठ्या आव्हानासाठी सज्ज व्हा...!
आपल्यासारख्या मर्त्य माणसांना चढण्यासाठी पडावं लागतं. आनंदाची गोष्ट अशी की प्रत्येक वेळेला चढून आपण अधिक उंची गाठतो.
लेखन- संपादन:
विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख,
🎓डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
https://www.vidhyarthimitra.com
Post a Comment