मैत्रीच.. नातेवाईकांच.. व्यावसायिक ओळखींच... आणि हे इनर सर्कलच खरतर आपल्याही नकळत..
आपली स्ट्रेंथ असत... he/she or they are there!".. या एका जाणिवेनेच निसरड्या वाटांवरून धडपडलो... उतारावरून घरंगळलो तरि हे सर्कल येईलच.. आपल्याला उचलायला.. थांबवायला.. धरायला.. हा विश्वास असतो...
ज्याच हे इनर सर्कल स्ट्रॉग... तो खरा नशीबवान...
कारण हे इनर सर्कल.. तुम्ही एकटे असताना, जखमी असताना, चिखलानी बरबटलेले वा घाणिनी माखलेले असतानाही... तुमच्याबरोबर असत.. तुमच्यावर प्रेम करत.. तुमच असत...
आता हे इनर सर्कल काही अस रात्री सेट केल आणि सकाळी तयार झाल.. अस नसत...
तुमच्या बालपणापासून ते आज आत्ताच्या तुमच्या वागण्या बोलण्याचा अंश.. पाक म्हणजे हे इनर सर्कल... what you give others...it comes to you!
IF you have a strong inner circle.. means you are also a part of somebody's inner circle.. life reciprocates!...
कोणाची बालपणीची मित्रमैत्रीण ही त्या घट्ट बंधात असते.. कधी काका मामा मावशी .. कधी कलीग.. बॉस.. किंवा कोणिही... हे इनर सर्कल मधल्या व्यक्ती किंवा गिरूपशी आपण कधीही खोट बोललेलो नसतो.. जे आहे ते तस त्यांना माहित असत.. तिथे मुखवट्याची गरजच भासत नाही...
या इनर सर्कलमधल्यांशी रोज आपण नेट फोन किंवा तत्सम माध्यमातून संपर्कात असतोच अस नाही.. त्याची गरजही नसते.. १-२ महिने ते वर्ष.. संपर्कात नसतानाही.. एका फोनवर ते" लगेच कनेक्टही होतात आपल्याशी...
या इनरसर्कलला कधीही आपल्याबाबतीत शंका नसतात.. संभ्रम नसतो.. पैसे हवेत म्हटल तर का कशाला कधी परत? वगैरेची काहीही पडलेली नसते ह्यांना.. ओके.. एवढाच तो आश्वासक शब्द असतो..
या इनरसर्कलची, आपल्याला सुखाचे ग्लास किनकिनत" चीयर्स" म्हणताना कधीही गरज भासत नाही.. पण तहान लागली तर घोटभर पाणि हेच बनतात.. जे जगायला महत्वाचे!..
हे असे इनरसर्कल हवेच.. आपल्यालाही व आपणही कोणाचे तरी इनरसर्कल बनण्याचा प्रयत्न करावा...
डीप्रेशन, आात्महत्या, सायकीअँट्री डीसीजेस फिरकतही नाहीत अशा ठिकाणी.. जिथे हे इनर सर्कल असत...
जागे रहा.. सजग व्हा... या प्लास्टिकच्या फुलांमधे गंध शोधत बसू नका... खरा सुगंध शोधा... त्यासाठी दगडमाती चिखल काटे कुटे चे व्रण अंगावर सोसावे लागतात.. रणरणत्या उन्हातून चाललात की " इनर सर्कल" च्या सावलीच बन मिळत...
Post a Comment