आनंद हा मानसिक असतो. तो बाह्य गोष्टीत न शोधता आपल्यामध्ये शोधा….
प्रत्येक व्यक्तीची आनंदाची परिभाषा वेगळी असते त्याचा आदर करा…….
जीवनात लहान सहान गोष्टीतून आनंद शोधण्याचा प्रयत्न करा .……
सतत तणावाखाली राहून मानसिक संतुलन ढळू देऊ नका………
खेळ ,करमणूक,गायन ,छंद ,वाचन ,संवाद आणि इतर गोष्टीसाठी चांगला आणि दर्जेदार वेळ द्या ……… !
आपल्या दैनंदिन कामाचे गुलाम बनून जीवनातील आनंद उपभोगण्याची इच्छा संपू देऊ नका………
आपल्याकडे जे आहे त्यावर संतुष्ट राहा,कारण सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडत नसतात………
आयुष्यात दु:ख ,त्रास होतच असतो,त्याचं प्रमाण कमी कसे करता येईल ते शोधून पहा आणि आयुष्याकडे सकारत्मक दृष्टीने पहा………
जगण्याचा आनंद हा आपल्या अवती-भवतीचं असतो, त्याला फक्त शोधता आलं पाहिजे...
भविष्यात होणाऱ्या बदलाची काळजी करत न बसता तो बदल स्वीकारण्याची तय्यारी करा, भविष्याच्या चिंतेने वर्तमान बिघडू देऊ नका……
आयुष्यात ' सुखाची हिरवळ ' बघायची असेल तर , ' दुःखाचे डोंगर ' ओलांडावेच लागतात हे विसरू नका ,त्याचा स्वीकार करा.
कोरोना काळ हा सर्वसामान्य आणि महत्वाकांक्षी व्यक्तींसाठी संघर्षाचा काळ आहे ,ह्या काळात येणाऱ्या भविष्याची आणि आपल्या अपेक्षित व निश्चित यशाची बीजे पेरण्याचा सर्वात उत्तम काळ आहे,लक्षात असू द्या प्रयत्न करणारे जिंकत नाही ,जिंकणारे प्रयत्न सोडत नाही.
ह्या वेळेच महत्व जाणून घ्या , वेळ आंधळा आहे म्हणून आपण लंगडे होऊ नका ,म्हणजे वाईट परिस्थिती आज आहे उद्या नाही.
कोणतेही काम हातात घेतांना आवड आणि आत्मविश्वास असेल तर ती कधीच अवघड होत नाही.
आपल्या आवडीच्या कामात व्यस्त राहा………
आपल्या दुःखाचे भांडवल न करता दुसऱ्याचे दु:ख जाणून घेण्याचं प्रयत्न करा. आपोआप तुमचे दुःख कमी होईल……. !
इतरांशी आपली तुलना किंवा बरोबरी करत नशिबाला दोष न देता स्वत:ला भाग्यशाली समजून जीवनाचा आनंद घ्या……
कुणाकडून फार अपेक्षा ठेऊ नका म्हणजे अपेक्षा भंगाचे दुःख होणार नाही ………
आपल्या चिंता ,आपले दुख आपल्या पुरते ठेवा ,त्याचा बाऊ करू नका……
प्रत्येक गोष्टीत , प्रत्येक प्रसंगात प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या .......
आपल्यात असलेल्या क्षमता ओळखा . स्वतः वर विश्वास ठेवा……
विद्यमान परिस्थितीबद्दल खंत व्यक्त करत बसण्यापेक्षा आयुष्याच्या ओंजळीत जे काही आहे ,त्याबद्दल भरभरून कृतज्ञता व्यक्त करा.
Post a Comment