एक सुसंवाद- दहावीच्या विद्यार्थ्यांशी परीक्षा रद्द झाल्याचा पार्श्वभूमीवर...
🎓 प्रिय विद्यार्थी मित्रांनो,
अनपेक्षितपणे यंदा राज्य सरकारने ईतर राज्याच्या अपेक्षित निकालाप्रमाणे आपली ही दहावीची परीक्षा रद्द करून अनेक विद्यार्थ्यांच्या भावी भविष्यावर एक घातच केला आहे...
ह्या निर्णयाने मात्र गुणवान आणि गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांवर एक अन्यायचं होणार आहे..
सर्वसामान्यपणे सर्वांना पास निकष लावताना त्यांच योग्य मूल्यांकन होईलचं असं ही नाही.
वर्षंभर ह्या महामारीत प्रचंड दबावात ,अनिश्चिततेच्या सावटात,शाळा किंवा क्लासेस नियमितपणे नसतांनाही आपण सर्वांनी जे काही प्रयत्नपूर्वक चांगला अभ्यास केला त्याला अगदी मनापासून सलाम...
आपण ह्या विपरीत परिस्थितीत जो काही संघर्ष केला तो कुठंही वाया जाणार नाही, गरज आहे ते अर्जित केलेलं ज्ञान आपल्या आयुष्यात योग्य ते परीने त्याचा सुयोग्य वापर करून आपलं भावी भविष्य उज्ज्वल करा..🌹
दहावीची ही एक नाममात्र परीक्षा आपलं आयुष्य निश्चित करणार नाही, आयुष्याच्या जिवन-प्रवासांत आपणांस अश्या अनेक परीक्षाना तोंड द्यावं लागणार आहे हे विसरून कसं चालणार विद्यार्थी मित्रांनो...
आयुष्यात आपल्या प्रामाणिक आणि जिवापाड अथक प्रयत्नांना यशाचा सुंगध येण्यासाठी नव- नविन जीवन कौशल्य आत्मसात करण्यासाठी आपली धडपड नेहमीच कौतुकास्पद असेल ह्यात शंका नाही..
कोणत्याही प्रकारची परीक्षा आपली अंतिम गुणवत्ता सिद्ध करू शकणार नाही ,दहावी तर ट्रेलर आहे खऱ्या जीवनाचं पिक्चर अभी बाकी हैं..
आपणा सर्वांना पुढील भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा आणि सदिच्छा..🌹
🙏🏻 आपलाच स्नेहाकिंत शुभेच्छुक:
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख,
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
https://www.vidhyarthimitra.com/?m=1
🙏🏻🎓🙏🏻🎓🙏🏻🎓🙏🏻🎓
Post a Comment