जागतिक महामारी कोरोना काळात ह्या विपरीत परिस्थितीत आजचा माणूस ,खरंच माणूस आहे?🥴
जागतिक पातळीवर गेल्या दिड-वर्षापासून शासन, प्रशासन, जनता आणि प्रत्येक घटक ह्या जागतिक संकटाला आप-आपल्या परीने तोंड देतांना आणि त्यावर मात करतांना सर्वत्र दिसतोय..
मात्र भारतात चित्र थोडंस विपरीत जाणवतंय ह्याचं शोक करावं तेवढ कमीच..!🙄
केन्द्र-राज्य , शासन-प्रशासन,राजकारणी-जनता,
आमदार-खासदार, नेता-लोकं, कर्ता-कार्यकर्ता, वरिष्ठ-कनिष्ठ, श्रीमंत-गरीब, मध्यमवर्ग-गरीब, भांडवलशाही-साम्यवादी-उदारमतवादी-लोकशाही, डावे-उजवे, धर्मांधता- धर्मनिरपेक्षता,सहिष्णू-असहिष्णू , वेदना-संवेदनशीलता, कट्टरता,धार्मिकता ई.. आदी बाबतीत विविध माध्यमाद्वारें सत्ता- वाद-प्रतिवाद ह्या सगळ्याच्या स्वार्थमय गर्दीत कोरोना सुनामीत मानवता-माणुसकी आणि त्याचं मानवी मूल्य वाहून गेली की काय हे छळणारी वेदना टोचत असते..😢
मानवी जीवनाचा हा व्यक्ती केंद्रित स्वार्थमय प्रवास आपल्या विनाशास आमंत्रण देणारं तर ठरणार नाही..ना?
जागतिक महासत्तेची स्वप्नं पाहणारी, जगातील सर्वात मोठी लोकशाही असल्याची पोकळ आरोळी ठोकनारी इथली सत्ता (ती कोणत्याही विचार किंवा पक्षाची का असेना) ह्या महामारीची साथ प्रतिबंध आणि ईलाज करतांना नाईलाज दिसत आहे..😰
स्वतःच्या स्वार्थाला दूर सारून , समाजाचा आणि मानवतेचा अग्रक्रमाने आणि प्राधान्यानें मानवतावादी चिरंतन मूल्यांचा विचार करणारी माणसं किंवा संस्थाचं ह्या संकटातुन मुक्त करता येण्यासाठी त्यांची प्रामाणिक धडपड प्रत्ययास येत आहे...
सर्व-सामान्य जनतेच्या सामाजिक-स्वास्थ,आर्थिक आणि मानसिक प्रश्नांचा पाठपुरावा समाज-माध्यमाच्याद्वारे शासन-प्रशासन दरबारी मांडतांना प्रचंड विषमता आणि द्वेष-मूलक गोष्टीना तोंड देतांना नाहक संघर्षाची ठिणगी पडताना अनुभव येत आहेत..
का नाही आपणच आपल्या जवळपास च्या प्रत्येक गरीब आणि गरजूंना शक्य होईल तेवढी मदत करावी.. आणि माणुसकी जपावी..!
एका ठिकाणी वाचलं होतं...!
"दुस-याचं हिसकावून खाणा-याचं पोट कधी भरत नाही आणि वाटून खाणारा कधी उपाशी मरत नाही. !!"
मग् मित्रांनो आपण माणसं आहोत,
माणसाने माणसाशी माणसासम वागलं तरंच मानवी-मुल्य साखळीतुन अनेक संभाव्य संकटं सहज धुडकावून लावू शकतो असं मला वाटतं..
#nolockdown
#कोरोनाच्याव्यथाआणिकथा
#revolution
-एक मानवतावादी 'माणूस'
#विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख..
Post a Comment