🎓 "संविधानिक व्यवस्थेचे मूल्य किती उदार आणि महान जरी असले तरी राबविणाऱ्या यंत्रणेच्या स्व:स्वार्थमुळे त्याला ग्रहण लागल्याशिवाय राहत नाही.."
जागतिक शिक्षक पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिह डीसले गुरूजीनें आपल्या तंत्रस्नेही अभ्यास कौशल्य कर्तृत्वान अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा सुबक आणि सुंदर वापर करून बारकोड प्रणालीचा अध्ययन-अध्यापन क्षेत्रात नवं-शैक्षणिक क्रांती घडवून आणल्या बद्दल जागतिक स्तरावर त्यांच्या ह्या कार्याचा गौरव आपण सर्वांनी पाहिला आणि मन भरभरुन त्यांचं विविध समाज माध्यमावर कौतुकही केलं..
गेंड्याची कातडी पांघरून बसलेल्या ह्या कागदी घोडं नाचवींनाऱ्या ह्या व्यवस्थेनं गेल्या काही दिवसांपासून विविध राष्ट्रीय पातळीवरच्या वर्तमानपत्रातून त्यांची जी नाहक ससेहोलपट मिरवत 'त्यांच्या कर्तृत्वाचा शिक्षण विभागाला काय फायदा..!' ह्या अपप्रचारनं उलट व्यवस्थेचाच नाकर्तेपणाचं आजकाल सोशल मीडियावर हास्य-विनोदाचा विषय सर्वत्र चर्चेतून दिसतोय.. असं मला वाटतं..
ज्ञान-तंत्र कौशल्य आणि अनुभव संपन्न शिक्षकाना कितीही दाबल तरीही त्यांचं कर्तृत्व सिद्ध झाल्याशिवाय राहत नाही हे मात्र खरंय..
पोकळ व्यवस्थेने निरर्थक असलेल्या बाबींवर आपला अमूल्य वेळ खर्च करण्यापेक्षा खूप साऱ्या रचनात्मक आणि प्रयोगात्मक बाबींवर आपलं लक्ष केंद्रित करावं.. ऑनलाईन शिक्षणात खूप साऱ्या त्रुट्या आहेंत आणि खूप साऱ्या गोष्टी शिक्षकांना प्रशिक्षण द्यायाच्या बाकी आहेंत हे दिसत नाही का..?
ऑनलाईन शिक्षणाचा वापर फक्त कागदोपत्रीच काम-चलाऊचं असल्यानं त्याची ज्ञान-व्यवहारीकता शून्य आहे हे 'असर' ने आपल्या अहवालात दाखवून दिलंय ह्याकडे शिक्षण विभागाला रणजितसिंह डीसले गुरुजींपेक्षा दुसरं काही दिसत नाही असं दिसतंय..
जागतिक दर्जाचे शिक्षक रणजितसिंह डीसले गुरुजींचं तंत्र-स्नेही ज्ञान कर्तृत्व सिद्धता समजण्याइतकी आपली कुवत आणि क्षमता पुरेसी नाहींये हे मात्र खरंय..!
©विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख..✍🏻
एक तंत्र-स्नेही शिक्षक
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
https://www.vidhyarthimitra.com/?m=1
Post a Comment