माझं आयुष्य आणि भविष्य उज्वल असण्याचं सामर्थ्य मला आपल्या सारख्या अनेक जीवलग, सन्माननीय, आदरणीय , गुरुतुल्य,स्नेही विद्यार्थी, पालक आणि पवित्र हृदयी लोकांमुळेच मिळते आहे..!
काल माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्वांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष दिलेल्या प्रेम:पुर्वक शुभेच्छा आणि सदिच्छा ह्या मला जगण्याला बळ देणाऱ्या आणि सामाजिक बांधिलकी जपत शैक्षणिक-सामाजिक सेवा कार्यात सदैव मार्गदर्शक आहेत...
शुभेच्छांच्या अक्षरशः पाऊसाने मन अगदी भारावुन गेलं, नि:स्वार्थ निरपेक्ष आणि प्रामाणिक कार्याची आपण सर्वांनी घेतलेली दखल आणि व्यक्त केलेला स्नेह हा अवर्णनीय आहे..
असंच प्रेम कायम असू द्या... कुठं चुकत असेल तर त्याची कल्पना नक्कीच द्या... आपणं सर्व आहात म्हणून आयुष्य आनंदी व समाधानी आहे... ही केवळ औपचारिकता नाही तर ह्रदयातून आलेली भावना ह्रदया पर्यत पोहचावी हीच इच्छा...
कालचा वाढदिवस माझ्यासाठी एक उत्सव होता.. आपण सर्वांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल आपले हार्दिक आभार मित्रांनो...
हार्दिक धन्यवाद..!
आपलं स्नेह आणि आशीर्वाद सदैव पाठीशी असू द्या..!
Post a Comment