ज्याप्रमाणे स्वातंञ्य दिनी महात्मा गांधी आणि स्वातंञ्य सैनीकांचा , महाराष्ट्र दिनी १०८ हुतात्म्यांचा , बालकदिनी बालकांसह जवाहरलाल नेहरुंचा गौरव होतो.
त्याचप्रमाणे प्रजासत्ताक दिनी गौरव व्हावयास हवा तो भारतीय प्रजासत्ताकाच्या महानायकाचा अर्थात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा..!
प्रजासत्ताक दिन म्हणजे या दिवसापासून भारतीय संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची अथक कार्यपुर्तता सार्थकी लागली..
मुळात आपण स्वातंञ्यदिन आणि प्रजासत्ताक दिन यामधील फरकच समजून घेतला.
प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात इंग्रजांची राजवट , स्वातंञ्य मिळवण्यासाठीचे लढे , हि माहिती सांगने अप्रस्तुत ठरते.
त्याऐवजी या दिवशी संविधान निर्मितीची पार्श्र्वभूमी, संविधानामुळे देशाची झालेली प्रगती , संविधान निर्मात्याचे योगदान मांडणे अपेक्षित आहे.
स्वातंञ्यदिनी ज्याप्रमाणे देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंञ्य सैनीकांच्या योगदानाचा गौरव होतो , त्याचप्रमाणे प्रजासत्ताक दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान निर्मितीचा गौरव होणे उचीत ठरते..
26 जानेवारी 1950 पासून राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झाली आणि देश सर्व प्रजेची सत्ता असणारा प्रजासत्ताक बनला..
प्रजासत्ताकोत्तर ७२ वर्षात देशात सर्वसमावेशी राज्यघटनेच्या बळावर देशाने जी अतुलनीय प्रगती केली आहे ती कौतुकास्पद आहे.
1950 चे इवलेशे लोकशाहीचे रोपटे आज जगात सर्वात मोठे संसदीय लोकशाहीवादी महावृक्ष म्हणून आदरणीय ठरत आहे.
राज्यघटनेमुळे देशात शैक्षणिक , सामाजिक , राजकीय , आर्थीक , सांस्कृतिक क्रांती घडुन आली आहे.
" एक व्यक्ती एक मुल्य " आणि राज्यघटनेतील मूलभूत अधिकारांमुळे सर्व भारतीयांना विकासाची समान संधी उपलब्ध झाली आहे.
राज्यघटनीय राजकीय अधिकारामुळे वंचित घटकांना ग्राम पातळीपासून राष्ट्रीय पातळीपर्यंत सत्तेत सर्वांना सहभागी होता आले आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून राज्यघटनेत समतावादी , मानवतावादी , बंधुत्ववादी कलमे समाविष्ट करून देशाला सर्वसमावेशी आधुनिक आकार दिला.
हि कलमे घटना समितीत मांडणे , त्यावर साधक- बाधक चर्चा घडवून आणणे , सदस्यांच्या शंकांचे समर्पक अभ्यासपूर्ण उत्तर देणे आणि सर्वसंमतीने कल्याणकारी कलमे मंजूर करून घेणे, हे महनीय कार्य बाबासाहेबांनी कुशलतेने पार पाडले त्यांच्या या अमुल्य योगदानामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे निर्माते म्हटल्या जाते.
त्यामुळे प्रजासत्ताक दिनाचे खरे महानायक ठरतात ते भारतीय राज्यघटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर ..!!
प्रजासत्ताक दिनी प्रजासत्ताकाच्या खऱ्या महानायकाला सन्मान देऊन संविधान रक्षणाची प्रतीज्ञा घेणे हाच खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचा सार्थक दिन ठरेल.
प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना खूप खूप शुभेच्छा..💐
जय भीम ! जय संविधान !! जय भारत !!!
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Post a Comment