प्रिय पालकांनो..🙏🏻
जागतिक महामारी कोरोनाच्या सावटा त असुरक्षिततेच्या वातावरणात गेल्या दोन वर्षापासून शाळा-महाविद्यालयिन शिक्षण ऑनलाइनच्या गोंधळात आपल्या पाल्याच्या अभ्यासक्रमाच्या पूर्तता करण्यासाठी संबंधित यंत्रणा कुचकामी आणि कमी पडल्यानं साहजिकच जागृत आणि सर्वसामान्य पालकांवर त्यांच्या भविष्या संदर्भात काही अंशतः ताण पडलेला दिसतोय हे खूप साऱ्या पालकांनी आपल्या भावना व्यक्त केल्याचं आढळुन आलंय..
कोरोना काळात मोबाईलचा वापर शिक्षणासाठी पूरक म्ह्णून न करता तो पर्याय स्वीकारल्यानं त्याचे दिर्घकालीन विपरीत परिणाम सध्यास्थितीत जाणवत असून विशेषतः ग्रामीण भागात शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनिनी बाहेर फेकल्यानें अनेक सामाजिक गंभीर समस्या येत्या काळात आपणांस दिसेल..
सध्या स्थितीत ग्रामीण आणि शहरी भागातील दहावी-बारावी बोर्ड परीक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना असणारी चिंता कदाचित त्यांचं योग्य समुपदेशन न झाल्यानं ह्या समस्यात आणखीनच भर पडते की काय हा गंभीर प्रश्न आपणां समोर असेलचं मित्रांनो..
आपल्या मुलाची क्षमता आणि बुद्धीमत्तेचं आकलन नीट नसणाऱ्या काही पालकांना संभ्रम अवस्था नक्कीच असेल..
परिक्षा तोंडावर आली असताना पालकांनी काय करावं व काय करू नये याविषयी काही गोष्टी सुचवावेसे वाटतं..
आपल्या मुलांना समजून घेताना त्यांच्या आवडी-निवडी, अभ्यासाची सध्यास्थिती, शाळा-महाविद्यालय अभ्यासक्रम नियोजन-पुर्तता, त्यांची मित्रमंडळी, अभ्यास-प्रगती, परीक्षेचं वेळापत्रक, पुर्व तयारी, पेपर-सराव, प्रात्यक्षिक परीक्षा,मोबाईल फ़ोनचा वापर, गेमिंग टायम,सोशल मीडियावर आपल्या मुलांची सक्रियता , त्यांची वेशभूषा, आहार-आचरण... अभ्यासाचं नियोजन..ई आदी संदर्भात मनमोकळेपणाने त्यांच्याशी सकारात्मक संवाद करावा.. जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास वाढेल.. आणि पालक आपल्या सोबत असल्यानें ते ही जागरूकतेने कोणत्याही प्रकारचा ताण न घेता ह्या परीक्षेला निश्चितपणे सामोरे जातील ह्यात शंकाच नाही मित्रांनो...
🔰 पालकांनी काय करू नये.... ❌
1 - सकाळी उठल्या बरोबर "परीक्षा तोंडावर आली आहे आणि यांना झोपा सुचताहेत" असं म्हणू नये..
2 - चहा नाश्ता झाल्याबरोबर लगेच "चला आवरा आता, कालची रिव्हीजन करा" असं म्हणणं टाळावं.
3 - जेवताना अभ्यासाचा विषय टाळावा. शेजारचा मुलगा/मुलगी किती वाजता ऊठतो/ऊठते हे वारंवार सांगू नये.
4 - लावलेल्या ट्यूशन क्लासच्या फी चा आकडा, आई-वडीलांनी घेतलेले कष्ट हे दिवसभर ऊठता-बसता सांगू नये.
5 - मुलगा/ मुलगी टिव्ही समोर थोड्या वेळ बसल्यास त्यांच्यासमोर डोळे मोठे करून येरझाऱ्या घालू नयेत.
6 - मुलाला/मुलीला रात्री अभ्यास करताना झोप येत असल्यास "मी दहावीत/बारावीत असताना पहाटे तीन वाजेपर्यंत अभ्यास करत होतो" असं खोटं सांगू नये.
7 - थोडा वेळ मुलांनी मोबाईल हातात घेतला तर हिसकावून घेऊ नये.
8 - दिवसभर अभ्यासाचा जप टाळावा.
🔰 काय करावे....✔️
1- सर्वप्रथम शांत रहाण्याची प्रॅक्टीस करावी.
2 - मुलांच्या आवडीचा स्वयं पाक करावा.
3 - मुलं अभ्यास करताना थोडं सोबत बसावं. (आपलं व्हाँटस्अँप आणि फेसबुक बाजूला ठेवून)
4 - अधून मधून प्रेमाने "मला माहीत आहे, तू यशस्वी होणारच..!" किंवा "काळजी करू नकोस, मी तूझ्या सोबत आहे..!" असं म्हणावं.
5 - अभ्यासाच्या मध्ये गंमतीजंमती सांगून वातावरण हलकं-फुलकं ठेवावं.
6 - एखादा पेपर कठिण गेल्यास त्यावर चर्चा करत न बसता पुढच्या पेपरच्या तयारीला लागावं.
7 - परिक्षा संपल्यानंतर आपण सुट्टी त कशी-काय मज्जा करणार आहोत याची स्वप्न रंगवावीत.
8 - सरतेशेवटी "हर बच्चे की अलग रफ्तार होती है" हे लक्षात ठेवावं. दहावी/बारावी ची परिक्षा हा आयुष्याचा एक टप्पा आहे, आयुष्य नाही हे लक्षात ठेवावं..
💁♂मुलांच्या स्वप्नपूर्तीसाठी पालकांनी काय काळजी घ्यावी..?
आपल्या पाल्याला उत्तम गुण मिळून तो आयुष्यात यशस्वी व्हावा, अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. अर्थात त्यात काही चुकीचे नाही; मात्र हे यश मिळवण्याच्या संदर्भातील सर्व संकल्पना पालकांना सुस्पष्ट असायला हव्यात. मुलांच्या या स्वप्नपूर्तीसाठी पालकांनीही पुरेसा वेळ दिला पाहिजे. पालक आणि मुले यांच्यातील संवाद आयुष्याच्या यशात महत्त्वाचा ठरतो.
🧐 पालकांनी या गोष्टींची काळजी घ्यावी :
▪ पाल्यावर अधिकार गाजवू नये; तर त्याच्याशी मैत्री करावी.
▪ प्रत्येक कृती करण्यास प्रेमाने सांगावे.
▪ पालकांनी आपली भूमिका सांगतांना आपली कृती तपासावी.
▪ मुलांकडून खूप अपेक्षा असतात. त्या टाळाव्यात म्हणजे मुलांवर ताण येणार नाही.
▪ मुलांना पैशांपेक्षा प्रेम महत्त्वाचे आहे. हे तत्त्व नेहमी लक्षात घ्यावे.
▪ पाल्यासाठी स्वतःचा जास्तीत-जास्त वेळ द्यावा.
▪ मुलांच्या सर्व समस्या शांतपणे ऐकून घ्याव्यात.
▪ स्वतःची चूक झाली असल्यास ती मुलांसमोर मान्य करावी.
▪ प्रत्येकाची प्रकृती ही निरनिराळी असल्याने पालकांनी आपल्या मुलाची तुलना कधीही दुसर्या मुलाबरोबर करू नये.
▪ मुलांसमोर त्यांच्याविषयी नकारात्मक बोलू नये. यामुळे बालमनावर परिणाम होऊन त्यांच्याशी जवळीक साधता येत नाही.
▪ घरातील इतरांसमोर मुलांचे दोष सांगितले जातात, असे कृत्य टाळावे.
▪ आपला पाल्य काय करत नाही, हे सांगण्यापेक्षा तो काय चांगले करतो, ते इतरांना सांगावे.
आपल्या मुलाना समजून घेणारे आपणच आहोत म्हणून कोणत्याही प्रकारचा ताण न घेता किंवा देता ही ह्या परीक्षा सुरळीतपणे पार पडेल अशी आशा बाळगूया मित्रांनो..
धन्यवाद..
🔰आपलाच स्नेहाकिंत शुभेच्छुक:
विद्यार्थी मित्र प्रा. रफीक शेख, परभणी..
🎓 डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
Post a Comment