*#सुशिक्षीतांच_मौन_हे_अशिक्षित_असण्यापेक्षा_दुर्दैवी_आहे!*
*या सगळ्या पोस्ट करताना मी प्रोफेशनली तुमच्या मतानुसार करेक्ट नसेलही कदाचित...!मलाही 'सेफ झोन' मध्ये खेळता आलं असतं कदाचित!!*
*मी ही निमुटपणे हे सगळं सहन करुन,पडद्यामागे राहुन ठरावीक वर्तुळासमोर मारल्या असत्या गप्पा सत्य असत्याच्या!*
*मी ही बोलण्याआधी करतो विचार अनेकदा या गोष्टींचा माझ्या करीअर वर होऊ शकेल अशा संभाव्य परिणामाचा!*
*अनेक जणांना वाटत असेलही हे केवळ विनोदी, हास्य-व्यंग किंवा तिरस्कार!*
*'तुम्ही लढा, आम्ही कपडे सांभाळतो' ही भुमिकाही सुरक्षित आणि व्यावहारिक आहे!*
*आपल्या बोलण्याने कोणाला काय फरक पडणार आहे हा विचारही चाटुन जातोच मनाला! वांझोट्या असु शकतात या सगळ्याच पोस्ट आणि लिखाण!*
*माझेच व्यवसाय बंधु मला ठरवतं असतील ही प्रोफेशनली ईम्याचुअर!*
*पण...एक शिक्षक म्हणून जेव्हा कधी मी विद्यार्थ्यांसमोर बोलत असेन तेव्हा अडखळणार नाही माझी जीभ कधीच किंचीतही!*
*कारण- शिक्षणक्षेत्रावरती जेव्हा उघड-उघड अन्याय होत होता तेव्हा माझ्यातली विद्या, माझी लेखणी मला बंड करायला लावत होती!*
*मला भारतरत्न डॉ.बाबासाहेबांची शिकवणं स्मरणात आणुन देत होती!*
*मी बोलतो .कारण-मी जिवंत आहे!मी सुशिक्षीत आहे!मी शिक्षक आहे!*
Post a Comment