लेखमाला भाग-1 ✍🏻
(साहित्य म्हणजे काय?,ते का लिहलं जातं..?साहित्य का वाचावं.?
त्याचा जगण्याशी काय संबंध?)
हल्ली सोशल मीडियावर खूप सारी तरुण पिढी असतात पण ते अभ्यासक्रमाची पुस्तकेचं नीट आणि व्यवस्थित वाचीत नाही ( केवळ परीक्षेपुरता अभ्यास करून पास) तर आयुष्य आणि जगणं व त्याचा प्रवास अत्यंत अर्थपूर्ण आणि समृद्ध करणारे साहित्याचा अभ्यास करीत नाही असा आरोप करणे हे साफ चुकीचं आहे आणि हे मी व्यक्तिश:फेटाळून लावण्याचं धाडस करतो आहे..
क्रमिक पुस्तकांच्या आणि साहित्याच्या ही पलीकडे आजच्या तरूण पिढीचं सोशल मीडियाच्या विचारपीठावर दिवसेंदिवस वाचन आणि प्रगल्भता ही वाढलेली दिसून येत आहे..
माझ्या सारख्या अश्या अनेक नवं-साहित्यिक प्रेमींनी त्यांना योग्य प्रतिसाद आणि दाद देऊन मार्गदर्शन केलं तर येणाऱ्या काळातही विशेषत:मराठी सह ईतर भाषेत ही दर्जेदार आणि जीवन उपयोगी ,प्रबोधनात्मक सर्वोत्तम साहित्य कला कृती जन्मास येऊ शकते असा मी ह्या लेख मालिकेच्या माध्यमातून एक क्रांतिकारक विचार व्यक्त करतोय..
📚 साहित्य म्हणजे काय..?
मानवी मूल्यांचे जतन , संवर्धन करणारा महान आविष्कार म्हणजे साहित्य होय..
मानवी जीवनव्यवहार विषयक चित्रण, विवरण, अर्थनिर्णयन, भाष्य अशा स्वरूपाच्या भाषिक अभिव्यक्तीस स्थूल मानाने ‘साहित्य’ असे संबोधिले जाते.
जीवनव्यवहाराचे भावनिक, आध्यात्मिक, बौद्घिक अशा विविध अंगांनी घडविलेले सर्जनशील, वैचारिक, कल्पनात्मक, वास्तव अशा भिन्न-भिन्न स्तरांवरचे सर्वांगीण, सम्यक दर्शन साहित्यातून वाचकांस प्रतीत करणे आणि त्याला प्रेरित करून त्याच्या जगण्याला एक नवी दृष्टी प्रदान करण्याचं कार्य साहित्य करत..
‘लिटरेचर’ या इंग्रजी शब्दाला मराठीमध्ये ‘साहित्य’ वा ‘वाङ्मय’ हे पर्याय सामान्यतः समानार्थी म्हणून वापरले जातात. ‘Littera’ या मूळ लॅटिन शब्दापासून ‘लिटरेचर’ हा शब्द निर्माण झाला.
📚 साहित्य का लिहलं जातं..?
मानवी आयुष्यातील प्रसिद्घी, यश, कीर्ती, मानसन्मान,प्रेरणा, धनप्राप्ती, मतप्रचार, सामाजिक सुधारणा, दुष्ट रुढींचा नाश, हितोपदेश, प्रबोधन,राष्ट्रभक्ती व देवभक्ती अशी विवीध उद्देश साध्य करण्यासाठी लेखक प्राचीन काळापासून आजतागायत साहित्यनिर्मिती करीत आलेलं आहेत..
साहित्य लिहतांना कोणी ह्याला आयुष्यचं प्रतिबिंब मानतें, कोणी तर ह्याला मानवी जीवनाची चिकीत्सा तर कोणी साहित्याला जगण्याचं मर्म मानतात..
ज्याचं वाचन प्रचंड आणि प्रगल्भ आहे तो ही त्याच्या प्रेरणेतून आणि लेखनातून साहित्य निर्मिती करून आपली प्रतिभा सिद्ध केली की तो लेखक म्हणून प्रसिद्ध होतो..
📚 साहित्य का वाचावं..?
मानवी आयुष्यातील मनोरंजन, विरंगुळा, दैनंदिन जीवनातील ताणतणावापासून सुटका, स्वप्नरंजन, उद्बोधन, जिज्ञासातृप्ती, ज्ञान व माहिती मिळविणे, दैनंदिन समस्यांवर तोडगा शोधणे, अशा अनेकविध कारणांसाठी आणि त्यांतून मिळणाऱ्या मानसिक आणि आध्यात्मिक आनंदा साठीही साहित्याचे वाचन करावं..
साहित्य विशेषतः कविता, नाटक, कथा, कादंबऱ्या, लघु-कथा, लेख,समीक्षा , संशोधन ई. विभागात असते..
लेख क्रमश:
लेख क्र.2 ( साहित्याचे प्रकार)
✍🏻 लेखन आणि संपादन:
#विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख,
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
https://www.vidhyarthimitra.com
Post a Comment