जगात जर्मनी आणि भारतात परभणी..!
हिवाळ्यात 4℃ निच्चांकी तर उन्हाळ्यात 45.5 ℃ उच्चांकी तापमान विक्रमी नोंद घेणारं परभणी..!
महाराष्ट्र राज्यात मराठवाड्यात अग्रेसर असलेला हा आमचा जिल्हा.. ! तापमानावाढी सोबत राजकीय आडाखे बांधून औरंगाबाद आणि नांदेड जिल्ह्याच्या सक्षम राजकीय नेतृत्वापुढे विकासाच्या इच्छा-शक्तिचा अभाव आणि करंटेपणा असलेला माझा जिल्हा..
कसदार काळ्या मातीत आमचा स्थानिक शेतकरी राजा पांढरं सोनं, अव्वल दर्जाची ज्वारी,सोयाबीन,रब्बी तसेच खरीप हंगामातील अनेक पिकं घेणारा आमचा जिल्हा, कृषी-संशोधन विकास-संवर्धननासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेलं आमचं कृषी विद्यापीठ,नरहर कुरुंदकर ते बी. रघुनाथ साहित्यिकांचा वैचारिक वारसा लाभलेलं,स्वातंत्र्याची लढाई, मराठवाडा मुक्ती संग्राम,शैक्षणिक-सामाजिक-सांस्कृतिक-वैचारीक आणि साहित्यिक चळवळीचा एके काळी केंद्र असलेला परभणी जिल्हा..
भारतीय राष्ट्रीय कांग्रेस,शेतकरी कामगार पक्ष,शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस ह्या सर्व पक्षातील मात्तबर नेत्यांची जन-कार्य कर्मभूमी , विविध सामाजिक संघटना आणि स्थानिक जन-आघाड्यांचा दिवसेंदिवस वाढतच जाणारं प्रस्थ ह्या सर्वांमध्ये आज परभणीचा पाहिजे तेवढा खरा विकास आज कोसोदूर आहे..
सर्वंचं गोष्टीची उपलब्धता आणि जमिनीची सुपीकता मुबलक प्रमाणात असताना इथल्या नेतृत्वाला परभणी जिल्ह्याचा औद्योगिक विकास कधी करायचा आहे..हा प्रश्न मात्र अनुत्तरितचं आहे..!
ती सर्वं पक्षीय राजकीय वज्र्यमूठ फक्त एका शासकीय मेडिकलसाठी एक होऊ शकते तर इथला औद्योगिक अनुशेष भरुन काढण्यासाठी पुन्हां का एकत्र येऊ शकत नाही हे मात्र एक कोडं.?
दिवसेंदिवस परभणी शहराच्या विस्तारात भर पडतांना वाढणाऱ्या नागरी समस्या, खिळ खिळ झालेली इथली महापालिका, नागरी-व्यवस्था, तोट्यात गेलेल्या सूतगिरण्या, बंद पडलेल्या अवस्थेत असलेले काही खाजगी आणि सार्वजनिक उद्योग धंदे, प्रस्तावित नवीन औद्योगिक वसाहतीच्या भु -संपादनाचा विषय,रखडलेला राष्ट्रीय महामार्ग 222,बाह्य-वळण रस्ता, छोटे-मोठे आणि कुटीर उद्योगांची पीछेहाट, गुणवत्ता पूर्ण शिक्षण देणाऱ्या अनेक शैक्षणिक संस्था मधील राजकारण, त्या भरतीत अडकलेल्यांचं प्रश, क्षेत्र-विकास आणि नियोजनाचे भिजत पडलेले घोंगडं, वक्फ जमीनीचा प्रश्न...न संपणाऱ्या दुय्यम यादीतल्या प्रश्नांपेक्षा लोक-प्रतिनिधीनी किमान इथल्या मूलभूत प्रश्नांकडे तरी राज्य-केंद्र सरकारकडे शासन-प्रशासन दरबारी योग्य पाठपुरावा करण्यासाठी वेळ तरी काढावा..
आशा करूया की , नेतृत्व गाजविणाऱ्या राजकारण्यांना,कार्यसम्राट बिरुदावली लावलेल्या स्थानिक नेत्यांना, इथल्या जन-संवेदनना लक्षात येतील आणि गोर-गरीब, कष्टकऱ्यांना,सुशिक्षित बेरोजगारंना,कोरोना महामारीत रोजगार गमावलेल्यांच्या हाताना हक्कांच रोजगार मिळेल..😢
-एक जागरूक आणि संवेदनशील परभणीकर
@विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख,
डॉ. ए. पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी
#जगात_जर्मनी_भारतात_परभणी
CMOMaharashtra
Post a Comment