********************************
११ एप्रिल : महात्मा ज्योतिबा फुले जयंती ********************************
जन्म - ११ एप्रिल १८२७
मृत्यू - २८ नोव्हेंबर १८९०
थोर भारतीय समाजसुधारक महात्मा ज्योतीबा फुले यांची आज जयंती. त्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ साली झाला. तर २८ नोव्हेंबर १८९० साली त्यांचे देहावसन झाले.
त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा.
महात्मा ज्योतिबा फुलेंनी १८४८ मध्ये पहिली, १८५१ मध्ये दुसरी आणि तिसरी मुलींची शाळा काढली.
महात्मा फुले शिक्षणाचे महत्व असलेले व स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा स्थापन करणारे पहिले भारतीय होत. १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा काढून, तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली.
अस्पृश्य मुलांसाठी पुण्याच्या वेताळपेठेत १८५२ मध्ये त्यांनी शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण ज्योतिबा आपल्या भूमिकेवर ठाम असत.
१८७३ मध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यांनी शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली.
समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.
सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली.
सतीची प्रथा, विधवा पुनर्विवाह, भ्रुणहत्या या समाज विघातक गोष्टींना त्यांनी विरोध केला. केवळ शाब्दिक विरोध न करता त्यांनी पुढाकार घेउन ‘बालहत्या प्रतिबंधगृह' ही संस्था सुरु केली.
वयाच्या ६० व्या वर्षी जनतेने त्यांचा सत्कार करून त्यांना ‘महात्मा' ही पदवी बहाल केली. डॉ. आंबेडकर हे ज्योतिबांना आपले गुरु मानत. गांधीजींनी ‘खरा महात्मा’ म्हणून त्यांचा गौरव केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांना ‘सामाजिक क्रांतिकारक’ म्हणत.
...महात्मा जोतिबा फुले यांचा जिवनपट:-
इ.स. ११ एप्रिल १८२७ - जन्म.
इ.स. १८३४ ते १८३८ - पंतोजींच्या शाळेत शिक्षण झाले.
इ.स. १८४० - सावित्रीबाईंशी विवाह.
इ.स. १८४१ ते १८४७ - स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये इंग्रजी शिक्षण घेतले.
इ.स. १८४७- लहुजी वस्ताद साळवे दांडपट्टा व इतर शारीरिक शिक्षण घेतले.
इ.स. १८४७ - थॉमस पेन यांच्या 'राईट ऑफ मॅन' या ग्रंथाचा अभ्यास.
इ.स. १८४८ - मित्राच्या विवाहप्रसंगी निघालेल्या मिरवणुकीत उच्चवर्णीयांकडून अपमान झाला.
इ.स. १८४८ - भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काम सुरू केले.
इ.स. १८४९ - वरील कारणांमुळे वडिलांशी मतभेद व गृहत्याग
सप्टेंबर ७, इ.स. १८५१ - भिडे वाड्यात व रास्ता पेठेत मुलींच्या शाळेची सुरुवात.
इ.स. १८५२ - पूना लायब्ररीची स्थापना.
मार्च १५, इ.स. १८५२ - वेताळपेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली.
नोहेंबर १६, इ.स. १८५२ - मेजर कॅन्डी यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकारतर्फे विश्रामबाग वाड्यात सत्कार.
इ.स. १८५३ - 'दि सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार मांग ॲन्ड अदर्स' स्थापन केली.
इ.स. १८५४ - स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी
इ.स. १८५५ - 'तृतीयरत्न' नाटकाचे लेखन.
इ.स. १८५५ - रात्रशाळेची सुरुवात केली.
इ.स. १८५६ - जोतीबांवर मारेकरी घालून हत्येचा प्रयत्न झाला.
इ.स. १८५८ - शाळांच्या व्यवस्थापन मंडळातून निवृत्ती घेतली.
इ.स. १८६० - विधवा पुनर्विवाहास साहाय्य केले.
इ.स. १८६३ - बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली .
इ.स. १८६५ - विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला.
इ.स. १८६४ - गोखले बागेत विधवाविवाह घडवून आणला.
इ.स. १८६८ - वडील गोविंदराव यांचा मृत्यू
इ.स. १८६८ - दुष्काळ काळात राहत्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.
इ.स. १८७३ - 'गुलामगिरी' ची लेखन
इ.स. १८७३ - सत्यशोधक समाजची स्थापना केली.
इ.स. १८७५ - शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध खतफोडीचे बंड घडवून आणले ( अहमदनगर).
इ.स. १८७५- स्वामी दयानंद सरस्वतींची पुण्यात मिरवणूक काढण्यास साहाय्य केले.
इ.स. १८७६ ते १८८२ - पुणे नगर पालिकेचे सदस्य होते.
इ.स. १८८० - दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध केला.
इ.स. १८८० - नारायण मेघाजी लोखंडे यांना 'मिलहॅण्ड असोसिएशन' या देशातील पहिल्या कामगार संघटनेच्या स्थापनेत साहाय्य केले.
इ.स. १८८२ - 'विल्यम हंटर शिक्षण आयोगा' समोर निवेदन दिले. यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली.
इ.स. १८८३ - 'शेतकऱ्याचा आसूड'चे लेखन
इ.स. १८८७ - सत्यशोधक समाजातर्फे नवीन मंगलाष्टकांची व नवीन पूजाविधीची रचना करून पुरोहिताशिवाय विवाह घडवून आणण्यास सुरुवात केली.
इ.स. १८८८- ड्यूक ऑफ कॅनॉट यांची भेट आणि सत्कार.
इ.स. १८८८ - मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने रावबहादुर वडेकर यांच्या हस्ते सत्कार करून 'महात्मा' ही पदवी प्रदान केली.
२८ नोव्हेंबर, इ.स. १८९० - पुणे येथे निधन झाले.
"महात्मा जोतिबा फुले" जयंती पर्यंत ही माहीती प्रत्येकाकडे पोहचलीच पाहीजे. त्यामुळे जास्तीत जास्त शेयर करा.
🏻.जय जोति...
महात्मा फुले यांच्या शिक्षणाचे महत्व पटवून देणाऱ्या काही कवितेच्या ओळी :
विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली ,
नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले ,
वित्ताविना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले !
महात्मा ज्योतिबा फुले ह्यांना विनम्र अभिवादन !💐
********************************
Post a Comment