नाशिक जिल्ह्यातील निफाड,न्या. महादेव गोविंद रानडे यांचं जन्मस्थळ, महाराष्ट्राचा कोलिफॉर्निया,काळी, रेगुर आणि तांबडी मृदेचं त्रिवेणी संगम, सिंचन समृद्ध पट्ट्यात द्राक्ष शेती,वायनरी उद्योग प्रक्षेत्र, गुळ उद्योग, शेतीवर आधारित छोटे मोठे लघु उद्योग, कृषी आधारित सेवा उद्योगांची प्रसिद्ध बाजारपेठ , ड्रायफ्रुट वर्गवारीतला बेदाणा, दुग्ध संकलन प्रक्रिया केंद्र, मनमाड जवळील नागापूर येथील ऑईल रिफायनरी उद्योग, निफाड सहकारी साखर कारखाना,तेल गिरण्या,तालुक्यात ओझर येथे मिग विमानाचा (HAL) कारखाना, नांदूर-मधमेश्वर येथील पक्षी अभयारण्याला महाराष्ट्राचे भरतपूर अशी ओळख निर्माण असेललं,कादवा व गोदावरी नद्यांचा संगम असलेला सुजलाम ग्रामीण परिसर,आशिया खंडात प्रसिद्ध असलेला लासलगांवचा कांदा-लसूणची प्रमुख कांदा बाजार पेठ,काही भागात शुद्ध शाकाहांऱ्यासाठी उत्तम आणि फ्रेश भाजीपाला ह्या क्षेत्राची ओळख..
असलेल्या तालुक्यात श्रीराम क्लासेस निफाडनें आयोजित केलेल्या विद्यार्थी मार्गदर्शन कार्यक्रमासाठी श्री. उल्हास पाटील सरांनी त्यांच्या फार्म हाऊसवर मुक्कामाला आणलं..
ह्या निमित्ताने नाशिक जिल्ह्यात निफाड तालुका परिसरात येण्याचा योग आला..
सरांच्या द्राक्ष बागेत फेरफटका मारताना थोडंसं कोकण आठवलं..
इथली हिरवळ आणि गार वातावरण मन प्रफुल्लीत करतोय..
आपलाच..
-विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख..
एक संवेदनशील सह-प्रवासी..
डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
Post a Comment