🎓स्पर्धापरीक्षा विश्वात कठीण परीश्रम आणि निरंतर अभ्यासानं 'आपलं कर्तृत्व' सिद्ध करणाऱ्या तमाम विद्यार्थी आणि स्नेहीं मार्गदर्शक मित्रांसाठी यंदाच्या 'पोलीस भरती' च्या माध्यमातून पोलीस खात्यात नोकरीचं 'दिवा-स्वप्नं' सत्यात उतरविणाऱ्या प्रत्येक मेहनती विद्यार्थ्यांना अभ्यासाची योग्य दिशा आणि यशाचा शास्वत राजमार्ग निश्चित करणारं एक अभ्यासपूर्ण पुस्तक म्हणजे पोलीस भरती सुपर 30 सराव प्रश्न-पत्रिका संच होय..
हर्ष अकॅडमी इस्लामपूर,सांगली येथील आमचे स्नेहीं मित्र आदरणीय रवि बावडेकर आणि त्यांचे सहकारी आदरणीय प्रवीण वाघमारे सरांनी अत्यंत कमी वेळेत विध्यार्थ्यांची नेमकी गरज ओळखून महाराष्ट्रातील पोलीस भरती देणाऱ्या तमाम विद्यार्थ्यांच्या जीवापाड प्रयत्नांना यशाचा सुगंध देण्यासाठी जो सुंदर संकल्प ह्या मार्गदर्शिका पुस्तकाच्या माध्यमातून केलंय त्याला अगदी दिल सें सलाम..🌹
गेल्या दोन दिवसात ह्या पुस्तकाच सूक्ष्म वाचन-निरीक्षण करताना त्यांची प्रगल्भ मेहनत आणि समृद्ध अनुभवाची सुंदर जोड ह्या बाबी प्रकर्षाने जाणवते आहे..
गेल्या 20 वर्षांत झालेल्या 30 आदर्श नमुना प्रश्न-पत्रिकातील सुमारे 3000 प्रश्नांच्या परिपूर्ण विश्लेषणसह हीं मार्गदर्शिका विद्यार्थ्यांच्या हाती देतांना अभ्यासाची निश्चित योग्य दिशा, त्यांचं आकलन, कोणत्या क्षमतांनां विशेष भर द्यावा लागेल, नेमकं अभ्यासक्रम घटक,पोलीस भरतीची पूर्व तयारी करताना काय काळजी घ्यावी, नेमकी सुरुवात कुठून करावी, ग्राउंडवरील विशेष सूचना, प्रास्ताविक मध्ये हितगुज साधतानां दिलेला प्रेरणादायी मंत्र.
डॉ. दीपाली काळे ( पोलीस उपा आयुक्त, गुन्हेशाखा, सोलापूर शहर ) यांचा 'स्वप्न खाकीचे!' ह्या शुभेच्छा संदेशात स्पर्धा परीक्षा विश्वात करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलेला मोलाचा सल्ला आपला अंतिम विजय निश्चित करण्यासाठी किती महत्वपूर्ण असतो हें मनाला भिडतो.
आदरणीय रवि बावडेकरांनी आणि प्रवीण वाघमारे सरांनी संपादित केलेल्या ह्या मार्गदर्शक पुस्तकेला आमच्या लक्ष लक्ष हार्दिक शुभेच्छा.
धन्यवाद🙏🏻
🎓 पुस्तकासाठी संपर्क : wa.me/+919096965333
आपलाच विनम्र स्नेही मित्र :
विद्यार्थी मित्र प्रा. रफीक शेख..
डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
Post a Comment