महाराष्ट्रातील एक समाज प्रबोधक कीर्तनकार, सप्तखंजिरीच्या माध्यमातून ग्रामस्वच्छतेचा संदेश देणारे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतुन आणि संत गाडगे महाराज यांच्या विचारांनी प्रेरित होऊन महाराष्ट्रातल्या गावोगावी खंजिरी घेत आपल्या अनोख्या कीर्तनाच्या माध्यमातून ग्राम स्वच्छता, ग्राम-विकास, हगणदारी मुक्त गाव, एकात्मकता आणि राष्ट्र-बंधुता, अंधश्रद्धा, जातिभेद, व्यसनमुक्ती, घनकचरा नियोजन, स्त्री भ्रूणहत्या, शिक्षणाचे महत्त्व या विषयी जागरूकता निर्माण करुन महा-पुरुषांचे विचार जण माणसात पेरणारे सत्यपाल महाराज आज परभणीत..
त्यांची अनपेक्षित भेट आणि साधलेला अल्पसा संवाद मला प्रेरणादायी ऊर्जा देऊन गेली..
कोरोना काळापूर्वी मागे परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील कातनेश्वर येथे आमचे मित्र रितेश काळे ह्यांनी आयोजित केलेल्या एका व्याख्यान कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराजांची 'सत्यपाल कीं सत्यवाणी'कार्यक्रमात आपली भेट झाल्यानंतर आपण मला प्रत्यक्षात ओळखलं.. मी चक्क भारावलो महाराज..!
आणि आपण केलेलं आमच्या शैक्षणिक-सामाजिक सेवेचं कौतुक निश्चितचं आमच्या पंखाना बळ देणारं असेल..
ग्रामीण भागात संपन्न झालेल्या आपल्या अनेक कार्यक्रमांना माझी उपस्थिती असतेच.. आपल्या कार्यक्रमातून महापुरुषांच्या विचार-कार्य प्रबोधनाचं जे काम आपण हाती घेतलं आहे त्यास अगदी दिल सें सलाम..
पुरोगामी चळवळीत कार्य करताना अनेक स्नेहीं माणसांचा, मार्गदर्शक गुरु-मित्रांचा, स्वयं-सेवकांचा, विद्यार्थी मित्रांचा कळत नं कळतं आलेला संपर्क आणि त्यांतुन निर्माण झालेला स्नेह, एकमेकांची आस्थेनें केलेली विचारपूस,वैचारिक गोष्टीची केलेली अदान-प्रदान, एखाद्या कार्याला केलेलं मार्गदर्शन आणि पाठ-पुरावा, मदत, नि:स्वार्थ सहकार्य हें त्या व्यक्तीला समाजात रचनात्मक कार्य करण्यासाठी बळ देणारं असतंच, त्याशिवाय एक मानसिक आधारहीं खुप मोठं असतो मित्रांनो..
दिवसेंदिवस माझं विचार भाव-विश्व समृद्ध आणि व्यापक होतांना 'समाजमाध्यमं' च्या माध्यमातून आपल्या सारखे संवेदनशील आणि जागरूक वाचक मित्र वर्गहीं लाभतंय हें संचित केलेल्या भौतिक संपत्तीपेक्षा लाख मोलाचं आहे..
हें मी मानतो मित्रांनो..
तूर्तास बस एवढंचं..!
आपलाच..
-विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख..
एक संवेदनशील सह-प्रवासी..
डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
Post a Comment