आमचा रंग 'माणुसकी' बरं का..!
"रक्तदान हेच जीवनदान आहे..."
आमच्या कोचिंग क्लासेस व्यवसायिक क्षेत्रातल्या गुरुतुल्य आणि आदरणीय जिजी ह्यांच्या हाकेला तत्परतेने साद देत त्यांच्या कामी आलो हें माझं भाग्य समजतो मित्रांनो..
वाशीम स्थित असलेल्या एका वरिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य भट्टड सर.. हें जिजीचे काका.. गेल्या दोन दिवसांपासून अस्वस्थ.. एका जखमेंनें रक्तस्त्राव झाल्यानें त्रस्त होते..त्यांना बाहेरून रक्त पुरवठा करणं गरजेचे होते.. त्यांना हवं असलेले रक्त उपलब्ध होते पण Exchange केल्यानंतरचं..
आज रंगपंचमी असल्यानं सर्वत्र शुकशुकाटचं.!
डॉक्टरांनीं रक्त आजचं लागेल असं कळविण्यात आल्यानें आज दुपारी आपल्या उदार मनाने आणि हिम्मतीने जिजीनें आमच्या Coaching Resources ग्रुपवर पोस्ट टाकली..
आज रंगपंचमी (होळी) निमित्त सुट्टी असल्याने मी ही एका मित्रांकडे सदिच्छा भेटीला आलो होतो.. तिथं मित्रांकडे शैक्षणिक-सामाजिक गप्पात रंगताना मी व्हाट्सअप उघडलं तर मला त्यांची पोस्ट दिसली आणि मी लगेंच जिजींनां फोन करुन कळवलं.. मी अर्ध्या तासानें हॉस्पिटल मध्ये आलो आणि सर्वं सोपस्कार पार पाडून रक्तदान केलं.
रक्तदान करतांना जिजीं नें माझं खुप कौतुक केलं आणि सध्याच्या शैक्षणिक घडामोडीवर प्रकाश टाकत लॉकडाऊन नंतरचा विध्यार्थी खुप बदलला जात आहे.. त्यांच्यातली निरंतर शैक्षणिक प्रगती खुंटल्याचीं खंत व्यक्त केली.. आणि आम्ही करीत असलेल्या शैक्षणिक-सामाजिक कार्याचीं दखल घेत शुभेच्छासह आशीर्वादही दिला आहे..
परभणीच्या शैक्षणिक कारकिर्दीत जिजींचं खुप नाव आहे.. गेल्या तिन दशकांपासून विद्यार्थ्यांना कोचिंगच्या माध्यमातून अविरतपणे आणि समर्पित भावनेंनें ज्ञानदानाचं कार्य अगदी प्रामाणिकपणे करत आहेत..
जिजीं मला छोटा भाऊ मानतात.. आम्हीं एकाच क्षेत्रात काम करतो पण जिजींनं मला प्रतिस्पर्ध्यापेक्षा सस्नेह सहकार्य करीत नेहमीच माझ्या विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाला आवर्जून येतांत ह्याचं मला सार्थ अभिमान वाटतो..
आपण नेहमीच मलाही मार्गदर्शन करतात.. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मी ही आपल्याचं पाऊलांवर पाऊल टाकत.. विद्यार्थ्यांशी अगदी समरूप होतो.. त्यांच्या विचार भावविश्वा चा आणि अंतरंगाचा शोध घेतांना कालसुसंगत जीवन-मूल्य आणि कौशल्यें विकसित करताना आपल्या क्षमतांचा कस कसा विकसित करावा हें मी आपल्याकडूनचं शिकलोय जिजीं..
मधू-बोली,विन्रम स्वभाव,वक्तशीरपणा, अखंड परिश्रम, संस्कार-शिस्त,कौटुंबिक सौख्यांपेक्षा आपल्या कर्तव्याप्रती संवेदनशील आणि सजगता, विद्यार्थ्यांच्या जीवापाड प्रयत्नांना यशाचा सुगंध लावणारी आपली हातोटी.. ई.. आदी गुण आम्हांस नेहमीच प्रेरित करतात..
कोचिंग व्यवसायिक क्षेत्रातल्या आपण एक आदर्शवृत्त समाजभिमुख शिक्षक आहात जिजीं.. आपलं कार्य आम्हां सर्वांना नेहमीच प्रेरणादायी राहिलेलं आहे..
आम्हांस आपला सार्थ अभिमानचं जिजीं..!🙏🏻
आज आपल्या हाकेला साद देत मी आपल्या कामी आलो ह्याचं मला समाधान वाटलं..
आपलं स्नेह-आशीर्वाद आणि प्रेम असंच कायम पाठीशी असू द्या आदरणीय जिजीं..
काही चुकल्यास आपल्या ह्या छोट्या भावास क्षमा करा.. 🙏🏻
🎓 आपलाच विनम्र स्नेही आणि आभारी..🙏🏻
#विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख..
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
https://www.vidhyarthimitra.com
Post a Comment