5) नियमितपणे वर्तमानपत्र वाचणे:
आजच्या काळात आपल्या अवती भवती घडणाऱ्या सर्वच प्रकारच्या घटनांचा आपणास वेध घेता येणं आवश्यक आहे मित्रांनो,म्हणून आपल्या घरी येणाऱ्या काही दर्जेदार वर्तमानपत्रात दैनिक लोकसत्ता, The Hindu,सकाळ, पुढारी, दैनिक लोकमत, पुण्यनगरी , The Times of India ई. आदी वर्तमानपत्रातील संपादकीय लेख अवश्य वाचा.
शक्य असल्यास काही मासिकेही वाचा.
5) पर्यटन स्थळाला भेट देणें:
निसर्गाच्या सहवासात आनंदाचे क्षण घालविण्याची आणि नवनवीन कला, संस्कृतीविषयी जाणून घेण्याची माणसाची मुलभूत प्रवृत्ती पर्यटनाचा मूळ आधार आहे. धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटनाला तेवढेच महत्व आहे. आज वेगवान दळणवळणाच्या साधनाने जग जवळ आले असताना देशाबरोबरच बाहेरचे जग जाणून घेण्याच्या माणसाच्या ओढीने हे आपण प्रेक्षणीय स्थळे अवश्य पाहावीत
सुट्यात विशेष बाब म्हणजे हवा पालटासाठी एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी, ऐतिहासिक स्थळांना ग्रुप करून भेट देणे आणि आयुष्याच्या जीवनप्रवासाचा आनंद घेण्यासाठी सक्षम बनणे.
6) व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रयत्न करणे:
कौटुंबिक -सामाजिक मूल्य , समाज -संस्कृती यांचं देहभान ठेऊनच विद्यार्थ्यांची देहबोली , आचरण , विचरणं , वेशभूषा , Attitude ई. महत्त्वपूर्ण घटक विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासात भर टाकतात , आपण सर्वांनी याचा विचार अवश्य करावा.
7) छंद जोपासणे..
8) आवडता खेळ सवडीने खेळणे..
9) अत्यावश्यक जीवन कौशल्ये आणि सॉफ्ट स्किल्स आत्मसात करणे.
10) प्रगत तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी काही तंत्रस्नेही टुल्स कौशल्य पूर्वक हाताळता येण्यासाठी शॉर्ट टर्म प्रशिक्षण YouTube च्या माध्यमातून शिकणे.
11) दरदिवशी नवं तंत्र कौशल्य शिकणे.
12) मोबाईल फोनचा शैक्षणिक पूरक अध्ययनांसाठी 'स्मार्ट' वापर करण्याचं कौशल्ये विकसित करणं.
13) दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या काही बाबी शास्त्रशुद्ध पणे शिकणं..
14) दहावी आणि बारावी परीक्षेनंतर असणाऱ्या सर्वं स्पर्धा परीक्षाचीं माहिती मिळवणे.
15) लोकं संवाद क्षमता विकसित करण्यासाठी अवती भवती होणाऱ्या सामाजिक कार्यात सहभाग नोंदवुन नवीन मित्र जोडणे.
16) स्वतःचा आचार , आहार , विचार आणि वर्तन काल सुसंगतपणे ठेवण्यासाठी दररोज नव्या गोष्टीचा शोध घेणे आणि त्या अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करणे.
आणि ...
17) शैक्षणीक आणि प्रेरणादायी Web Series ,YouTube Documentary , काही शॉर्ट फिल्म्स पाहणे..
18) ई. आदी योग्य आणि सकारात्मक बाबी.
आजच्या या स्मार्ट काळात प्रत्येक जण सुज्ञ आहे ,आपल्या निर्णय क्षमतेच्या कुंवती प्रमाणे काळानुसार योग्य पाऊले उचलण्यास सक्षम आहे, आपणास वर दिलेल्या बाबी ह्या सर्वांना अपेक्षित लागू होतीलच याची शास्वती कोणी देऊ शकणार नाही मित्रानो परन्तु याहीपेक्षा अजून बऱ्याच चांगल्या गोष्टी आपण करू शकता याचा मला पूर्ण विश्वास आहे, तरी आपल्या या सुट्यांचा आपण आपल्या भावी करिअरच्या दृष्टीने निश्चितच सदुपयोग कराल अशा शुभेच्छसह अनेक आशिर्वाद आपणांस.
आपल्या भावी उज्ज्वल करिअर साठी हार्दिक शुभेच्छा आणि सदिच्छा..
आपलाच स्नेहाकिंत शुभेच्छुक :
विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख ,परभणी.
🔰 Mentor | Educator | Motivator | Guide
"Stay Hungry and Stay Foolish."
"Nurturing Potential Through Education"
A Foundation For Education , Knowledge and Development
आदरणीय सर
खूप छान मार्गदर्शन केलेत आपन, बऱ्याच विध्यार्थ्यांना वाटत की आपण या सुटी चा उपयोग केला पाहिजे,करण्याची खूप eccha असते but काय करावे हे समजतच नाही,आपण केलेल्या अमूल्य या मार्गदर्शनामुळे विध्यार्थ्यांना नक्कीच उपयोग होईल,
Post a Comment