कोणत्याही लोकशाही प्रधान असलेल्या देशांत ' विचार अभिव्यक्ती स्वातंत्र्य' चा पुरस्कार करणारी माध्यमे त्या लोकशाहीच्या प्रगल्भतेंच दर्शन घडवून सामाजिक विकासात आपलं मूल्य प्रस्थापीत करते..
मानवी विकासाच्या टप्यातील सामाजिक, राजकीय आर्थिक, भौगोलिक आणि सांस्कृतिक जन-संघर्ष हा लोकभिमुख करून न्याय हक्कासाठी व्यापक अर्थानं आपलं क्षेत्र विस्तारित करीत दिवसेंदिवस आपलं महत्व अधोरेखित करणारी माध्यमं, सर्व सामान्यांसाठी जेव्हा ती खुली होतांना त्याचा स्वैराचार होण्यापेक्षा स्वयं-शिस्तीत आली तर आजच्या काळात त्याचा प्रभावी वापर आपल्या व्यक्तीगत पातळीवर नं ठेवता त्यातून विचार अभिव्यक्ती साधून सामाजिक विकास आणि परिवर्तनात आपलं योगदान हे चिरंतन मानवी मूल्यांच्या उत्तम प्रतिष्ठेसाठी पोषक असतील.
अत्यधुनिक नवं तंत्रज्ञानयुक्त असलेली विश्वव्यापी समाज माध्यमं जसं कीं Facebook , Twitter,( आता X ),YouTube, WhatsApp, Blogs, Web Sites, Forums, Instagram आणि ईतर App Based Platforms वर विचार आणि माहितीचा 5 G / 6 G / 7 G च्या स्पीड नें होणारा झपाट्यानं प्रचार आणि प्रसार आजच्या काळात सर्वांनाच प्रभावीत करणारा आणि आपलं भाव विश्व अधिक समृद्ध करणारा आहे.
मागील दशकात Facebook नें Arab Spring ची केलेली क्रांती, Micro Blogging च्या Twitter आणि Blogs च्या माध्यमातून नेमकं आपली विचार अधिक प्रभावीपणे जन-माणसात रुजवून त्यातून साधलेली आपलं नेतृत्व मूल्य, YouTube च्या माध्यमातून आपल्या कौशल्यांना दिलेलं Monetize चं मूल्य आणि त्यातून साधलेली नवी अर्थक्रांती, Affiliated Marketing नें निर्माण केलेली नवी अर्थव्यवस्था, समाजवाद-भांडवलशाही, लोकशाही, नवं-उदारमतवाद ह्या वैचारिक विचार प्रवाहाला समाज माध्यमावरील मुक्त चर्चा मंथनातून मिळालेलं पाठबळ,Google Services नें व्याप्त केलेलें आपलं Digital Life, Blockchain तंत्रज्ञानावर होऊ घातलेली विश्वासहार्य आणि पारदर्शक नवी अर्थ-मूल्य व्यवस्था ई..आदी नवं क्रांतीयुक्त बदलाने आपलं जीवन विश्व प्रभावीत करून नवी मूल्य स्विकरण्यासाठी भागहीं पाडलेलं असताना.. आपण व्यक्तीगत पातळीवर ह्या समाज माध्यमाचं प्रभावी वापर करू शकलो का..? हा प्रश्न सर्वांनाच अंतर्रमुख करणारा आहे मित्रांनो..
आपण ह्याचा वापर सक्षमपणे करण्यास खरंच तयार आहोत का?
1) दैनंदिन जीवनात Social Media चा वापर वाढल्यानं त्याची सुयोग्य पद्धती आपणास माहिती आहे का?
2) Facebook, WhatsApp, YouTube, Blog आणि ईतर उपयोगी Social Media Platforms ची कार्य-प्रणाली , त्याची उपयोगिता मूल्य,त्याचा प्रभावी वापर, सुरक्षितता आणि उपद्रवी मूल्य संदर्भात आपलं स्व:प्रशिक्षण YouTube च्या मदतीनें आपल्या Productivity साठी वेळ देऊन आपण पूर्ण केलंय का?
3) व्यक्तीगत आणि व्यवसायिक पातळीवर ह्याचा प्रभावी वापर करतांना वेळेच्या मर्यादा आपल्या लक्षात आहे का?
4) Facebook हे ईतर Social Media Platform पेक्षा लोकप्रिय आणि प्रभावी का आहे? त्याचा आपणास वापर जमेल का?
5) प्रत्येक Social Media Platform ची व्याप्ती आणि स्वरूप विचारात घेता त्याचा आपणास पुरेपूर वापर करता येईल का?
6) आपली सक्रियता हीं सातत्याने Quality Content देते का?
7) विविध माध्यमावर आपली विचार अभिव्यक्ती मुक्तपणे मांडताना आपली Social ethics कशी आहेत..
8) अप्रत्यक्षरित्या परस्पर संवादात आपण टीका टीपण्यांकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोण व्यापक असतो का?
9) विविध माध्यमांवरील Community Guidelines आणि शिस्त आपण पाळता का?
10) Fake news, द्वेष-मुलक व्यक्तव्ये, कट्टर धर्मांधता, एकतर्फी विचार, दंगलीं उसळनाऱ्या पोस्ट्स, अविवेंकी विचार .. ई आदीना तुम्ही कसे प्रतीबंध करता?
11) प्रत्येक ठिकाणी व्यक्त होतांना आपलीं विवेकी भूमिका आपण कशी मांडता?
12) IT अधिनियमन आणि Cyber Security संदर्भात आपलं ज्ञान कुठं पर्यंत आहे?
13) Digital Tools चा वापर करण्यासाठी लागणारं कौशल्य आपणास विकसित करता येतं का?
14) व्यक्तीगणिक विविध प्रकारे आजच्या Social Media चा प्रभावी वापर तंत्र-कौशल्ये, करिअर शिक्षण, प्रशिक्षण, मार्गदर्शन, व्यावसायिक स्पर्धा, विचारांची आणि विविध समाजभिमुख उपक्रमाची देवाण-घेवाण ई.. आदी सकारात्मक पद्धतीने वापर केल्यास रचनात्मक कार्य करता येऊ शकते..
15) समाजमाध्यमें प्रभावीपणे वापरण्याचं कौशल्य आपण विकसित करू शकतो..
क्रमश:
वापर करताना काय काळजी घ्यावी?
लेख संपादन..
© विद्यार्थी मित्र प्रा. रफीक शेख,
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
www.vidhyarthimitra.com
Post a Comment