पुरोगामी..?
बुद्धिवादी, विवेकवादी, विज्ञानवादी, समतावादी, सत्याची कास धरणारे, समाजातील अंधश्रद्धा मिटविण्यास पुढाकार घेणारे, गरीब-पीडितांना सर्वतोपरी मदत करणारे, देवा-धर्माच्याही पलीकडे गेलेले मानवतावादी लोक..!
पुरोगामीची सोप्प्या शब्दात व्याख्या करावयाची झाल्यास पुरोगामी म्हणजे वर्तमानाविषयी वैज्ञानिक दृष्टी असणारे लोकं...!
पुरोगामी शब्दाची एकच अशी व्याख्या करता येणार नाही पण शब्दशः अर्थ घ्यायचा तर 'पुरः' म्हणजे 'पुढे' आणि 'गामी' म्हणजे 'जाणारा', पुरोगामी म्हणजे पुढे जाणारा. पुरोगामी या शब्दाबरोबर इतर शब्द जोडले जातात, जसे की पुरोगामी विचार, पुरोगामी चळवळ, पुरोगामी पक्ष, संस्था, व्यक्ती, शक्ती इत्यादी. पण पुढे म्हणजे नक्की 'कुठे' हा प्रश्न आपल्याला पडायला हवा. रूढार्थाने 'पुरोगामी' शब्द सामाजिक, नैतिक, वैचारिक आणि मानसिक दृष्टीने प्रगत होणे या अर्थी वापरला जातो.
साधारणपणे पुरोगामी विचारांचे लोकं हे प्रगतीवादी, प्रयत्नवादी, सुधारणावादी, समतावादी आणि गतिवादी व सर्वसमावेशक विचार करणारे असतातं.ह्या विचारधारेचे लोकं कुठल्याही विषयावर तर्क लावून, त्या विषयांची चिकित्सा करून आपले मत ठरवणारे, बुद्धिप्रामाण्यवादी, पुढे बघून चालणारे, सहिष्णू, परोपकारी आणि धर्मनिरपेक्ष असतातं..
साहजिकचं पुरोगामी विचारांचे लोक दैववादी, मनुवादी, धर्मवादी, कर्मसिद्धान्तवादी, शब्दप्रामण्यवादी आणि कट्टर धार्मिक नसतातं. अखिल मानवजातीचं अधिक भलं कसं होईलं, या दृष्टीने पुरोगामी लोक सततं विचार करतं असतातं.
त्यांना हे माहीत असतं की, या जगात बदल हीचं एक शाश्वत गोष्ट आहे. बाकी सर्व मिथ्या आहे..!
ज्याचं अन्याय-अत्याचाराविरूद्ध रक्त सळसळतं, उसळून येतं, जुन्या चुकीच्या प्रथा-परंपरा मोडून काढण्याची धमक ज्याच्यात आहे, जे जे विज्ञाननिष्ठ नाही आणि जे समाजासाठी मारक आहे त्याच्याविरूद्ध जो पेटून उठतो तो पुरोगामी! याउलट ज्याला सत्य स्वीकारायचं नसतं, जो आपल्याच चुकीच्या भूमिकेवर आडून राहतो, दुराग्रह बाळगतो तोच कट्टरतावादी आणि खरा प्रतिगामी असतो, खरा दहशतवादी असतो. असा दहशतवाद स्वयंघोषित पुरोगामी वर्तुळात आणि परंपरावादी प्रतिगाम्यात दिसून येतो. यापैकी कोणीही परिवर्तनवादी नसल्यानं नितळतेचा हा प्रवाह दुर्गंधीकडं येऊन ठेपलाय. पुरोगामी परंपरेचं वाटोळं या दोन्ही प्रवृत्तीच्या अनुयायांनी केलंय.
- संपादित लेखन
Post a Comment