प्रत्येक वेळेस तुम्हाला लोकांची साथ मिळेलच असे नाही..!
मनातले शब्द आणि शब्दातले मौन ऐकण्याची कला साघ्य केली की,नात्यातला जिव्हाळा आणि जिव्हाळ्याचं नातं दोन्हीही जपता येतात. ज्यांना काळजावरचे घाव आणि डोळ्यातील भाव कळतात. त्याच नात्यांना खरा अर्थ असतो, बाकीची नाती म्हणजे केवळ माझी माझी म्हणून वाहिलेली व्यर्थ ओझी आहेत.
कोणतेही नवीन नातं बनवताना नेहमी मेहंदीच्या पानांसारख बनवावं जे स्वतःचे जीवन कुस्करून दुसऱ्यांच्या आयुष्यात रंग भरणार असाव. सुंदर आयुष्य सहज घडत नसतं तर ते जाणीवपूर्वक घडवावं लागतं ते म्हणजे प्रार्थनेतून, माणुसकीतून, प्रेमातून, त्यागातून आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कृतीतून घडत असतं. स्वभाव हा फ्री हॉटस्पॉट सारखा असला की, कोणत्याही पासवर्डची गरज पडत नाही, लोकं आपोआपच कनेक्ट होतं जातात. कारण, प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगला असण महत्त्वाचं आहे.
दुःखाचे डोंगर कोसळले तरी आयुष्याने पुन्हा सावरायला शिकविले , सुखाचे पडणारे हळुवार चांदणे आयुष्याने पुन्हा पाहायला शिकविले, फुलाच्या वाटेवरचा प्रीतीचा गंध आयुष्याने पुन्हा घ्यायला शिकविले, आपल्यासारखी गोड माणसे भेटली आणि आयुष्याने पुन्हा जगायला शिकविले. कोणत्याही व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंत करु नका आणि त्या व्यक्तीला समजून न घेता गमावु पण नका. कारण त्यांची काळजी हृदयात असते, शब्दात नाही आणि राग शब्दात असतो, हृदयात नाही. झुका तितकंच जितकं बरोबर आहे.कारण, विनाकारण झुकण्याने सुध्दा आपली किंमत कमी होत जाते आणि समोरच्याचा अहंकार वाढत जातो.
प्रत्येक वेळेस तुम्हाला लोकांची साथ मिळेलच असे नाही, कधीकधी एकटे पण लढावे लागते पण असे लढा कि साथ न देणारे पण हात जोडून प्रणाम करतील. भले ही स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल पण माझ्यामुळे कोणाचे नुकसान व्हायला नको. ही भावना ज्या माणसाजवळ असते तोच माणूस योग्य अशा प्रगतीच्या वाटेवर असतो.
मधावर पहिला नैतिक हक्क हा फुलांचा असतो पण मध चोरून पोळ्यांमध्ये साठवणाऱ्या मधमाश्यांना त्याचे श्रेय दिले जाते समाजातही असेच असते प्रामाणिकपणे काम करणारे उपेक्षित राहतात आणि वांग्याचा भोपळा करून श्रेय घेणारे प्रसिद्ध होतात प्रशंसा ही चेहऱ्याची नव्हे तर चारित्राची व्हायला हवी. कारण चांगला चेहरा सजवायला काहीशी मिनिटे लागतात. पण चांगले चारित्र बनवायला संपूर्ण आयुष्य खर्च करावे लागते.
ज्या माणसाला सतत शुभ आणि आशावादी विचार करण्याची सवय असते त्याचे मन नेहमी आनंदाने व उत्साहाने भरलेले राहते आणि उत्साही मनाच्या माणसाला नेहमीच यशप्राप्ती होते. म्हणून सकारात्मक, आशावादी आणि आनंदी विचार यशस्वी व सुखी जीवनाची गुरुकिल्ली आहे. धावणाऱ्या वेळेसोबत बदलत गेलं की आयुष्यातील बऱ्याच गोष्टी स्थिर राहतात, कष्ट आणि संकट हे मनुष्याला शिक्षण देणारे श्रेष्ठ गुण आहेत जे धैर्याने त्यांना सामोरे जातात, ते यशस्वी होतात.
प्रेम व आनंद देणार्या व्यक्ती आपल्या सहवासात असणे ही निसर्गाची एक देणगी असते, आणि अशा व्यक्ती लाभणे हे आपल्याच सुस्वभावाची अनमोल परतफेड असते. प्रत्येक व्यक्तिने कर्म कसे असावे? व त्याचे फलस्वरूप काय? देव कधीच नशीब लिहित नाही, आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर आपले विचार, आपला व्यवहार, आपली कर्मच आपले नशीब लिहितात. नीती व नियत योग्य असेल तर कधीच वाईट होत नसते. समोरची व्यक्ती आपल्यावर विश्वास ठेवते, हिच आपल्या जीवनातील सर्वात मोठी सफलता आहे.
दु:ख भोगणारी व्यक्ती, आयुष्यात पुढे जाऊन कदाचित सुखी होऊ शकेल, पण दुःख देणारी व्यक्ती आयुष्यात पुढे जाऊन कधीही सुखी होत नाही. माणुसकी मनात असते, परिस्थिती मध्ये नाही. परमेश्वर मात्र कर्मच पाहतो, मृत्यू पत्र नाही. तुम्ही कितीही मोठे बुद्धिबळातील खेळाडू असाल, पण सरळ व्यक्ती सोबत केलेले कपट तुमच्या वाईटाचे सर्व दरवाजे खुले करते.
जीव गेल्यानंतर शरीर स्मशानात जळते आणि नाते संबंधातील प्रेम गेल्या नंतर माणूस मात्र अंतर मनातुन जळत राहतों, जीवनातील स्वार्थ पूर्ण झाल्यानंतर आणि शरीरातील श्वास निघून गेल्यावर, कुणीही कुणाचीच वाट बघत नाही.
जे पाहिजे ते मिळवूनच थांबायचे, ही कदाचित सफल माणसाची निशाणी असेल, पण जे मिळाले ते हसतमुखाने स्वीकारून जगणे ही सुखी माणसाची निशाणी आहे ईश्वर जेव्हा देतो तेव्हा चांगलेच देतो आणि देत नाही, तेव्हा अधिक चांगले मिळवण्याचा मार्ग दाखवतो. पण जेव्हा प्रतीक्षा करायला लावतो तेव्हा तो सर्वात उत्तम, सर्वोत्तम फळच. देतो. हे आपले चरण फक्त मंदिरा पर्यंतच घेऊन जाऊ शकतात. परंतु चांगले ईश्वर आचरण तर परमात्म्या पर्यंत घेऊन जाते.
सर्वप्रथम आपण व आपल्या कुटुंबाच्या जीवनाची व आरोग्याची काळजी सुचनांचे, नियमांचे व कायद्याचे पालन करा. एकमेकांना अडचणीत आणु नका, त्यापेक्षा मदत करा, जमत नसेल तर निदान गप्प तरी बसा, नकोत्या उठाठेवी करू नका.
-लेख संकलन आणि संपादन:
विद्यार्थी मित्र प्रा. रफीक शेख
Post a Comment