खुश हूँ अपनी छोटी सी ,
पर सच्ची कामयाबी से...
कदमों की रफ़्तार धीमी जरूर है
पर जितनी है..
अपने जमीर के साथ है..!!
गेल्या दोन दशकाच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यक्षेत्रात स्वतः ला सिद्ध करीत आज विविध सामाजिक संघटना आणि संस्थांत आपल्या कार्य कर्तृत्वाचं यशस्वी दीप प्रज्वलित ठेऊन, आजपासून नव्या स्वरूपात हे नेतृत्व शिक्षण, कला , साहित्य,लेखन,समीक्षा, राजकारण,आणि समाजकारणात आपल्या अस्तित्वाची दखल घेण्यासाठी सक्षम आणि सज्ज आहे..
एसके क्लासेस विद्यार्थी मित्र परिवार,डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, राजहंस एज्युकेशन,एसके लाईफ फाउंडेशन, दि स्पिरिट ऑफ जिंदगी फाउंडेशन परिवाराने आणि एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्र यांनी शैक्षणिक आणि सामाजिक कार्यक्षेत्रात माझ्या अखंड, समर्पित आणि प्रामाणिक कार्याची दखल नेहमीच घेऊन माझ्या कार्य कर्तृत्वास #विद्यार्थीमित्र म्हणून दिलेली ओळख आणि सन्मान विविध स्तरावर वावरताना गौरवांकीत आणि आनंद देणारी आहे.
आपण सर्वांनी आमच्या रचनात्मक शैक्षणिक-सामाजिक कार्याचा वेळोवेळी केलेलं अभिनंदन आणि दिलेल्या शुभेच्छा ह्या नेहमीच आम्हांस आमच्या कार्यात सदैव दीपस्तंभासारखे मार्गदर्शक आहेत..
आपणा सर्वांचा स्नेह आणि प्रेम असंच राहू द्या, चुकलो तर अवश्य कळवा बरं..!
कोणताच माणूस परिपूर्ण नसतो, त्याची सतत धडपड त्याला नेहमीच घडवित असते, फक्त त्याला आकार देणारा गुरू सक्षम असला पाहिजे...
आपणा सर्वांच्या सदैव ऋणातचं...!🙏🏻
आपलाच स्नेहाकिंत आभारी :🙏🏻
🎓 विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख ,परभणी.
Post a Comment