"जो द्रव्य वाढवितो तो काळजी वाढवतो, परंतु जो विद्या वाढवितो, तो मान वाढवतो."
आमचा खरा सन्मान पुस्तकांनेच,जी आम्हांस वैचारिक खाद्य सोबत जीवन संघर्षात नेहमीच प्रेरणा देणारे आणि त्यातूनचं आयुष्याला खऱ्या अर्थाने सक्षम आणि अर्थपूर्ण करणारे..
पुस्तकातूनचं मस्तक सशक्त होते ,पुस्तकांच्या सानिध्यात राहणाऱ्याचे मन अगदी निर्मळ आणि त्याचा सहवास हा अविश्रांत ज्ञानाचा झरा आहे.
आज वालुर येथें एका फैमिली कार्यक्रमा दरम्यान सहारा कॉम्प्युटर्स चे अफजल खान आणि युनिक क्लासेसचे अब्दुल रहेमान या दोन्ही सरांनी यथोचित आदरातिथ्य करीत एक प्रेरणादायी पुस्तक भेट देऊन जो काही सन्मान केला त्याबद्दल आपलं हार्दिक आभार..
या दरम्यान आपणाशी मनमोकळ्या गप्पा करताना आपल्या संवादात ग्रामीण भागातील शिक्षण आणि सामाजिक स्थितीवर आपलं भाष्य हे अगदी मन वेधक होतं..
आपल्या सारखे नव-तरुणाई प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करीत स्वतःला सिद्ध करण्याची जी प्रामाणिक तळमळ आणि जिद्द दिसतंय त्याला अगदी मनापासून सलाम आणि भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा आणि सदिच्छा..
📚 आपलाच स्नेहांकित शुभेच्छुक:
#विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख, परभणी.
Post a Comment