ब्रिटिश राजवटी विरुद्ध स्वातंत्र्य समर उभारणारे, रॉकेटचा अविष्कार करणारे,भारतीय युद्धनितीचे प्रगत सेनानी, शेरे-ए- म्हैसूर टिपू सुल्तान यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..! 🙏🏻
टिपू सुलतान हे त्या मोजक्या राज्यकर्त्यांमधून आहे जो इंग्रजांसमोर एक शूर योद्धा म्हणून उभा राहीला,निडरतेने इंग्रजांविरुद्ध लढला आणि लढता लढता शहीद झाला..!
टिपू सुलतानला आज ब्राह्मणवाद्यांकडून,आरएसएसकडून आणि भाजपाकडून विरोध होण्याचं कारण इतकंच आहे की सगळ्यात अगोदर इंग्रज आपल्या भूमीसाठी वाईट आहेत,त्याचं इथे राज्य निर्माण होणे हे आपल्या सगळ्यांसाठीच व आपल्या भूमीसाठी
अहितकारक आहे.
सगळ्यांनी एकत्र येऊन त्यांच्याविरुद्ध लढलं पाहिजे. ईस्ट इंडिया कंपनीच वाढणं धोकादायक आहे आणि त्यासाठी टिपू सुलतानांनी स्वतःहा पुढाकार घेऊन मराठ्यांना व निजामला पत्रव्यवहार करून हे सांगितलं. त्यांनी स्वतः इंग्रजांच्या विरुद्ध युद्ध केले,इंग्रजांच्या नाकी नऊ आणले.भूमीसाठी अन्यायाविरुद्ध लढता लढता रणांगणात शहीद झालें मात्र माघार घेतली नाही,इंग्रजांसमोर झुकले नाही..!
टिपू सुलतान म्हणजे एक आदर्श प्रजाहितवादी,प्रचंड दूरदृष्टी असणारा राज्यकर्ता होतें .शेतकऱ्यांसाठी त्या काळी नवनवीन व शेतकरी हिताचे धोरण त्यांनी त्यांच्या राज्यात राबवले.अस्पृश्यते विरुद्ध लढले,जातीधर्माच्या नावाने कधी भेद केला नाही.मंदिरांना देणग्या दिल्या , गोरगरिबांसाठी कल्याणकारी योजना त्यांनी राबविल्येल्या होतें..
त्यांच्या राज्यात त्यांनी सविस्तर सर्वेक्षण आणि वर्गीकरणावर आधारित भू-महसूल यंत्रणा तयार केली,ज्यामुळे कर पद्धत सुधारली गेली ज्याने राज्याच्या संसाधनाचा मार्ग विस्तृत झाला.त्यांनी शेतीचे आधुनिकीकरण केले, पडीक जमीन विकसित करण्यासाठी कर खंडित केला, सिंचन पायाभूत सुविधा बांधल्या आणि जुनी धरणे दुरुस्त केली,कृषी उत्पादन व रेशीम संवर्धनास चालना दिली.
त्यांनी व्यापाराला आधार देण्यासाठी नौदल बांधले आणि कारखाने उभारण्यासाठी “राज्य कमर्शियल कॉर्पोरेशन” ची स्थापना केली. म्हैसूरचे चंदन, रेशीम, मसाले, तांदूळ आणि गंधक यांचा व्यापार केल्यामुळे त्यांच्या राजवटीत व परदेशातही जवळपास 30 व्यापार चौकी उभारण्यात आल्या होत्या.
टिपू सुलतानांनी आपल्या सैन्याची पुनर्रचना केली, नवीन तंत्रज्ञान वापरले,युद्ध मैदानावरील ते उत्कृष्ट स्टॅटर्जी मेकर होतें. त्यांनी सर्वप्रथम युद्धात रॉकेट तंत्रज्ञानाचा मोठा वापर केला.म्हणूनच त्यांचा मिसाईलमॅन म्हणून देखील गौरव केला जातो.
मात्र विशिष्ट विचारधारेच्या तथाकथित लेखकांच्या हातून काल्पनिक आणि असंबद्ध इतिहास लिहला गेला.ज्यामध्ये टिपू सुलतानला सगळ्या बाजूने बदनाम करून सोडणारा इतिहास लिहला गेला.आणि पुढे ब्राम्हणवादी संघटनाकडून त्याचा प्रचार-प्रसार केला गेला. बहुजनांच्या डोक्यात कट्टरता रुजवणाऱ्या संघाच्या मार्फत देखील त्याचा प्रचार-प्रसार केला गेला आणि आजही केला जातोय.
" मात्र खोट्या लोकांनी सत्याला नाकारलं म्हणून सत्य कधी खोटं ठरत नाही हे देखील लक्षात घेतलं पाहिजे!"
तो माणूस म्हणून महान होता, राज्यकर्त्या म्हणून महान होता,योद्धा म्हणून महान होता आणि धोरणकर्ता म्हणून महान होता..!
मोठ्या महापुरुषांच्या जयंती ही विचाराच्या आदान प्रदानाने व त्यांच्या प्रचंड पराक्रमी इतिहासाच्या उल्लेखाने व समाजात त्यांचे महान विचार पसरवून साजरी करावी. त्यांच्या विचाराप्रति असणारी श्रद्धा ही त्यांचा इतिहास वाचून त्यांना अभिवादन करावे. भारत देशातील पवित्र भूमी विषयी हजरत टिपू सुलतान ची असणारी प्रचंड श्रद्धा व त्यासाठी हजरत टिपू सुलतान इंग्रजांशी केलेला प्रचंड संघर्ष हे वाचणे व चिंतन करणे आजच्या काळात खूप महत्वाचे..
आजादी की आग थी दिल में और जंग का इरादा था
शेरों सी ललकार थी उसकी खून में उबाल ज्यादा था..|
टिपू सुलतानच्या कार्याबद्दल आम्हांस प्रचंड अभिमान आहे..!❤️
जयंतीदिनानिमित्त स्मृतीस विनम्र अभिवादन!🙏🏻
#विद्यार्थीमित्र
Post a Comment