परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालूक्यातलं, करपरा नदीवर निवळी येथील मातीच्या धरणाच्या पायथ्याशी, राष्ट्रसंत श्री. नृसिंह पाचलेगांवकर मुक्तेश्वर महाराजांची जन्मभूमी, वारकरी संप्रदाय आणि संत परंपंरेंतील भक्तीभाव असलेलं, निजामकालीन राज व्यवस्थेत हिंदू-मुस्लिमांच ऐक्यभाव सुखानं नांदत असलेला ग्रामीण भाग , देवकर-देशमूख नावानं नावजलेलं आमचं छोटंसं गाव म्हणजे पाचलेगाव...!
आमच्या मागील अनेक पिढ्यानं पिढ्याचं 'वतन' असलेलं मूळ गाव.. पण माझा जन्म परभणीचाचं..!
निजामकालीन रजाकाराच्या हिंदू-मुस्लिम दंगलीत मराठवाडा पेटलेला असताना आमच्या गावी मात्र इथल्या बंधू-भाव सलोंख्यानं मुस्लिमांना आपलंस करून त्यांनी कुठंही स्थलांतर होऊ नं देता गावच्या मातीशी एकनिष्ठता ठेऊन आपली सर्व कुटूंब इथं सुरक्षित राहण्यासाठी गावकर्यांनी जी साथ दिली...ती आमच्या अनेक पिढ्या कधीच विसरू शकणार नाहींत..
आमचे मोठे चुलत काका-बंधू आणि वडील बंधूनी शेतमजुरी आणि छोट-मोठे घरगुती उद्योग करून जिंतूर, वालूर, मंठा आणि बोरी आठवडी गाव बाजारात आपली वेगळी ओळख ' पाचलेगावकर मुस्लिम ' म्हणून निर्माण केली ह्याचा आम्हांस नेहमीच सार्थ अभिमान आहे.
1972-73 च्या भीषण दुष्काळानं मराठावाडा होरपळतं असताना आमच्या कुटुंब कुणब्यांनं पोटा-पाण्याची भूक आणि रोजगारासाठी परभणी गाठली आणि इथंच स्थिरावलीत पण आमच्या कुटूंबातील प्रत्येक सदस्यांचा स्नेह आजही गावाशीच जोडल्यानें आमची नेहमीच गाव-भेट असतेच..
शैक्षणिक-सामाजिक कार्यक्षेत्रात व्यस्ततेंनें गेल्या बऱयाच वर्षांनं आज गावाकडे आजी सोबत येण्याचा योग आला.
आमची थेट भेट बाबा रुस्तुम देवकर (देशमुख) काकांच्या घरी ही नेहमीचीचं ठरलेली..
त्यांनी आमचं केलेलं यथोचित आदरतिथ्य आणि पाहुणचाराने मी भारावलो..!
बाबा रुस्तुम देवकर यांच्या कौटुंबिक स्नेहात माझ्या वडिलांचं बालपण गेलं, वेळोवेळी त्यांनी आमच्या कुटूंबाला साथ दिली, आज त्यांच्याशी मनं मोकळ्या गप्पात वडिलांचा संघर्ष आणि आजोबांच्या कॅन्सर ट्रीटमेंट मध्ये आमच्या कुटूंबाचें झालेले बेहाल, दुष्काळाच्या झळा, कौटुंबिक अंतर्गत संघर्ष,गावातील वातावरण, ईतर नातेवाईकांची रितसर भेट, त्यांचं सुख-दुःख,कौटुंबिक नाते-संबंध जपताना मान-सन्मान आणि माझी शैक्षणिक आणि सामाजिक प्रगती .. ई.. आदी संदर्भात दीर्घ चर्चा मुक्तेश्वर आश्रमाला सदिच्छा भेट देतांना झाली..
जि. प. केंद्रीय प्राथमिक शाळेच्या बाजूला स्व.किसनरावजी सरनाईक सार्वजनिक वाचनालयाला भेट देतांना तिथं ग्रंथपाल रमेश देवकर यांची भेट झाली. त्यांच्याशी चर्चा करताना आजकलच्या मुलांना विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची गोडी लावून, विविध उपक्रमाच्या माध्यमातून पुस्तक वाचनाचं महत्व पटवून देण्यासाठी शालेय स्तरांवर गावात 'पुस्तक-वाचन' कार्यक्रमांच आयोजन करण्याचा प्रयत्न करत आहेत असं त्यांच्याकडून कळालं.. मी गावकरी या नात्याने माझं जे जे काही योगदान देता येईल तें ही मला नक्कीच कळवतील असा विश्वास त्यांनी मला दिला.
आजच्या गाव भेटीनं...मी मात्र सुखावलो..!
देवकर कुटूंबानें दिलेला स्नेह आणि पाचलेगावकर ही ओळख सर्वधर्म समभाव आणि सहिष्णू संस्कार आम्हांस नेहमीच सार्थ अभिमान असलेली आहे मित्रांनो.
आपलाच विनम्र :
#विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख..
Post a Comment